Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 23, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through October 23, 2007 « Previous Next »

Rupali_county
Wednesday, October 10, 2007 - 6:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दा कान्दा लसुन सूका मसाल्याची रेसिपि द्याल क प्लीज? एका मैत्रिनिने दिला आहे हा मसाला, प्रविन चा सूका कान्दा लसून मसाला. एकदम टेस्टी आहे, घरि कसा बनवायचा?? कूणी सान्गेल का? मसाले च्या बिबि वर नाहिय हि रेसिपि.

धन्स
रुपाली


Miseeka
Wednesday, October 10, 2007 - 1:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सेलरी आणलि आहे full bunch तर त्याचे काय करु मह्नजे ती जास्त प्रमाणात वापरता येइल? सुप करुन झाले त्यात थोडिच लागते आता उरलेल्या सेलरी चे काय करायचे आहे?सध्या बारिक काप करुन freezer मधे ठेवलि आहे.

Prady
Wednesday, October 10, 2007 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सेलेरी स्टफ करता येईल. सेलेरीच्या दांड्याच्या खळग्यात क्रीम चीज,गाजराचा कीस,थोडा क्रश्ड पाईनॅपल,थोडा ग्रीन ओनिअन असं मिश्रण भरता येईल. आपल्या आवडीप्रमाणे अशी बरीच फिलिंग करता येतील. स्टार्टर म्हणून छान आहे.

Dineshvs
Thursday, October 11, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, संध्याकाळी लिहितो.
सेलरी, कुठल्याही भाजीत घालता येते. लांब तुकडे असतील तर बर्फ़ाच्या पाण्यात ठेवुन क्रंची करायचे आणे क्रीम डिप मधे बुडवुन खायचे.
त्याचे काहि बारिक तुकडे कोरड्या मिठात मिसळुन घट्ट झाकणाच्या बाटलीत भरुन फ़्रीजमधे ठेवायचे. काहि दिवसानी मीठ त्याचा सगळा स्वाद शोषुन घेते व सेलरी सॉल्ट तयार होते. ते सुपमधे, पिझ्झावर, टोस्टवर वैगरे घालुन खाता येते.


Dineshvs
Thursday, October 11, 2007 - 11:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपाली, कोल्हापुरी मसाला, इथे लिहिला आहे
/hitguj/messages/103383/54830.html?1192101326

Karadkar
Thursday, October 11, 2007 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mods, लालुने पण कांदा लसुण मसाल्याची कृती लिहिली होती त्याची लिन्क आता page not found अशी एरर देतेय पहाणार का?

Karadkar
Thursday, October 11, 2007 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/93126.html?1169674338

ही घ्या! चटणी खाली काय ठेवलिय ती? नावात चतणी आहे म्हणुन? हलवाहलवीचे बघणार का जरा

Rupali_county
Friday, October 12, 2007 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स दिनेश दा आणि कराडकर.. हलवाहल्व करायला वेळच नाही आजकाल (:

रुपाली


Zee
Friday, October 12, 2007 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही दिवसा पुर्वी, इथे मला मसूराचा एक नविन प्रकार वाचायला मिळाला होता. त्यात मसूर शिजवुन मग त्यात चिन्च ओल खोबर अस घालुन उकळायचे होते. आणी वरुन फ़ोडणी होती.ती रेसीपी आता शोधली तर आता सापडत नाहीये. कोणी सान्गेल का ती रेसेपी कुठे लिहिली आहे ते.

Ami79
Saturday, October 13, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी मुळ्याच्या शेंगा आणल्या आहेत. पण त्याची भाजी कशी करावी ते मला कोणी सांगेल का?

Dineshvs
Sunday, October 14, 2007 - 8:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधारण गवारी आणि फ़रसबीची भाजी करतो तशीच करायची.
या शेंगा वाफ़वुन त्यात दहि घालुन, वरुन फ़ोडणी देऊन कोशिंबीरही करता येते.
यालाच डिंगर्‍या म्हणतात. कदाचित या नावाने ती भाजी असेल इथे.


Ami79
Sunday, October 14, 2007 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदा. करुन पाहते

Manuswini
Tuesday, October 16, 2007 - 9:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, मला तेलपोळीची रेसीपी सांगाल का? ही नक्कीच गुळ पोळी पेक्षा वेगळी असते. आईने थोड्या दिवसापुर्वी देशातून पाठवल्या(विकतच्या होत्या) पण जबरी लागल्या. कुरुमकुरुम करत मी संपवल्या.
आईने कधी तेलपोळी केल्या नाहीत घरी, फक्त पुरणपोळी नी गुळपोळी घरी केलेली असायची आमच्याकडे. तेव्हा तेल पोळी कशी करतात ते सांगा?


Sunidhee
Tuesday, October 16, 2007 - 11:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झी मी एक मसूर ची भाजी भोपळ्यात टाकली होती काही. तिच का पहा.

Dineshvs
Wednesday, October 17, 2007 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेलपोळी, पुरणपोळीचाच प्रकार आहे कि. फक्त त्यात कणीक जास्त मऊ भिजवावी लागते. लाटताना अजिबात पिठ न घेता, फक्त तेलावर लाटतात. तसेच ती अगदी पातळ लाटावी लागते. असे लाटायला खुपच कौशल्य लागते.
अशी तेलावर पातळ लाटलेली पोळी, लाटण्यानेच उचलुन तव्यावर अलगद सोडतात. भरपुर तेल असल्याने व पातळ लाटल्याने ती लवकर भाजली जाते व कुरकुरीत लागते.
हि पोळी लाटायला एक सपाट पत्रा मिळतो.


Manuswini
Thursday, October 18, 2007 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थक्स दिनेशदा, मी करून बघेन

Deepant
Monday, October 22, 2007 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोटेज चीज म्हणजे पनीर का?
'स्मॉल कर्ड कोटेज चीज ' वापरुन काय करत येईल?
please tell me.

Ami79
Tuesday, October 23, 2007 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/133483.html?1193115733

मी इथे एक शंका उपस्थित केली आहे. कृपया नीरसन कराल का?

Dineshvs
Tuesday, October 23, 2007 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपान्त, स्मॉल कर्ड कॉटेज चीज वापरुन कुठलीही पनीरची डिश करता येईल. ग्रिल वैगरे करता येईल. इथे आहेतच सगळ्या क्रुति.

Deepant
Tuesday, October 23, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थंक्यु दिनेशदा,काल मी काॅटेज चीज वापरुन तुमच्या पद्धतीने पालक पनीर केले,खुप छान झाले.पण पनीर थोडे विरघळले.
ह्या पनीरच्या घट्ट वड्या कशा करता येतील? प्लीज सांगाल का?



चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators