Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
फोडणीचा पिट्टा ब्रेड

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » फोडणीचा पिट्टा ब्रेड « Previous Next »

Aditih
Friday, October 12, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


साहित्य:
४ होल व्हीटचे पिट्टा ब्रेड
१ मोठा कांदा चिरून, ४ हिरव्या मिरच्या, लिंबू, कोथिंबीर
शेंगदाणे १/२ वाटी
तेल चार चमचे
मीठ, साखर चवीनुसार
मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता(असल्यास)

कृती:

पिट्टा ब्रेडचे हाताने तुकडे करावेत व मग मिक्सर मधुन बारीक करुन घ्यावेत.
तेल तापवून त्यात शेंगदाणे खरपूस तळावे. ते तेलातून बाहेर काढुन पिट्टा ब्रेड च्या चुर्यावर पसरावेत.
तेलात मोहरी, हिंग, हळद , कढिपत्ता , मिरच्या घालून खमंग फोडणी करावी.
त्यात कांदा घालावा, सोनेरी होईपर्यंत परतावा.
मग तळलेले शेंगदाणे , पिट्टा ब्रेडचा चुरा, व चवीनुसार मीठ, साखर त्यात घालावे. एक वाफ आणावी.

लिंबू पिळावे. कोथिंबीरीने सजवावे.
फोडणीच्या पोळीसारखंच दह्याबरोबर मस्त लागतो हा पदार्थ.

ज्यांना फोडणीची पोळी, भाकरी आवडते पण देशाबाहेर असल्याने मिळत नाही त्यांनी जरुर करा. देशाबाहेर असलो आणि नोकरीही करत असलो की आवश्यक तेवढ्याच पोळ्या केल्या जातात. मग पोळ्या ऊरल्या म्हणून फोडणीची पॊळी कधी करणार. म्हणून हा त्यातल्या जवळ जाणारा पर्याय.

पोहे करायची सवय असतेच. त्यामुळे एकट्या राहण्यार्या पुरुषांना देखील जमेल हे करायला.


Dineshvs
Saturday, October 13, 2007 - 5:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ोडणीची चपाती करताना, मी मिक्सरमधे चुरा करण्यापेक्षा कात्रीने बारिक लांब पट्ट्या कापुन घेतो. त्या खुप छान दिसतात. थोडा वेळ जातो खरा.
मला सुरीनेदेखील, अश्या पट्ट्या कापता येतात.


Aditih
Saturday, October 13, 2007 - 9:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पट्ट्या कापायची कल्पना छान आहे दिनेशदा. फक्त जरा वेळेचाच प्रश्न. पण सवय झाली की ते ही पटपट जमेल.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators