Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 27, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through August 27, 2007 « Previous Next »

Suparna
Tuesday, August 14, 2007 - 11:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खवा भाजून केलेले घरगुती पेढे पण एकदम मस्त लागतात.

Nandini2911
Tuesday, August 14, 2007 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खूप शोधलं तरी मिळत नाही आहे. मला अळू वडीची रेसीपी हवी आहे :-(

Madat_samiti
Tuesday, August 14, 2007 - 3:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे आहे-
अळूवडी   




Rupantar
Wednesday, August 15, 2007 - 4:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

please help me getting some healthy recipe for my husband( age-30) suffering or recovering from Influenza-A.


Dineshvs
Wednesday, August 15, 2007 - 1:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रुपांतर, सर्वात आधी डॉक्टाराना विचारुन घ्या, कि काय खाल्लेले चालेल आणि काय टाळायला हवे.
त्यानुसार आम्ही सर्वच योग्य त्या पाककृति लिहु वा सुचवु.


Ami79
Thursday, August 16, 2007 - 5:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी. काही दिवसांपुर्वी मी कलौन्जी विकत आणले.
ते नेहमीच्या फोडणीतही वापरले. पण मला त्याची चव उग्र वाटली,. म्हणजे पदर्थात लगेच लक्षात येण्यासारखी. ती तशी वाटु नये या साठी काय करावे किंवा कोणत्या पदार्थात ते वापरावे?


Prady
Friday, August 17, 2007 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कलौंजी नान लाटताना त्यावर लावतात. बंगाली लोकांच्या पाचफोडण मधेही असते. जिरं, बडीशेप,कलौंजी,मेथीदाणा,मोहोरीचं अनुक्रमे २:१:१:१:१ असं प्रमाण असतं.

Chakali
Friday, August 17, 2007 - 4:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

rupantar,
tumhi tumchya Misteranna Mugale (मुगाळं) karun deu shakata.tumhala tyachi kruti khalil link var milel
http://chakali.blogspot.com/2007/08/mugale-recipe.html

Chakali.

Sneha1
Tuesday, August 21, 2007 - 7:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी honewdew melon आणले, पण ते कच्चे निघाले.त्याचे आता काय करावे हे कुणी सांगू शकेल काय?

Madhusut
Saturday, August 25, 2007 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार!
grill/bbq करण्यासाठी कुणी व्हेज रेसेपी सांगेल काय? भारतीय पदार्थ असल्यास अधिक उत्तम!!

Anjalisavio
Sunday, August 26, 2007 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/50131.html?1155834379

मधुसुत, इथे पहा.

Shyamli
Sunday, August 26, 2007 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वेंधळेपणाच्या बीबीवर लिहिण्यासारखच आहे खरंतर पण तिकडे पोस्टुन काही प्रश्ण सुटणार नाही म्हणून इथे.....

चहाच्या बरणीत मोहरी भरली

लक्षात आल्यावर वेगळं करायला गेले तर अजूनच मिसळलं गेलं
आता हे वेगळ कसं करायच? काही करता येइल का?हे निवडायच म्हणजे अवघडच प्रकारे..............





Nalini
Sunday, August 26, 2007 - 11:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली, मोहरी वेगळी करणे अतिशय सोपे आहे. एक मोठे ताट घ्यायचे आणि त्यात हा एकत्र झालेला प्रकार मुठभर घ्यायचा. मग ते ताट थोडेसे तिरके पकडायचे आणि हाताने जागच्या जागीच हा एकत्र प्रकार हलवायचा. ताट तिरके(तिरपे, कानोडे) असल्याने मोहरी वाट काढुन घरंगळत खाली येणार.
हा प्रयोग यशस्वी झाला तर नक्की कळव.


Deepa_s
Monday, August 27, 2007 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल अर्धा किलो डाळीचं पुरण केल. पोळ्या चांगल्या झाल्या. इथल्या टिप्स खूप उपयोगी पडल्या. पण ८ पोळ्या केल्या आणि कंटाळा आला. उरलेल्या पुरणाचं काय करता ये ईल?

Vidyasawant
Monday, August 27, 2007 - 5:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नारळाच्या करंज्या कशा करायच्या?

Psg
Monday, August 27, 2007 - 5:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा, कडबू कर! :-)

विद्या ही घे लिंक करंज्यांची

/hitguj/messages/103383/92017.html?1130721099

Vidyasawant
Monday, August 27, 2007 - 8:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम अग ओल्या नारळाच्या करंज्या हव्या होत्या.

Psg
Monday, August 27, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विद्या त्या लिंक वर आहे ओल्या नारळाच्या करंज्यांची रेसिपी गं. 'प्रिया'ने डीटेल लिहिली आहे.. नाहीतर 'गोडवा- दिवाळी फ़राळ्- करंज्या' बघ.. ५-६ अर्काईव्ह आहेत.

Vidyasawant
Monday, August 27, 2007 - 10:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स पूनम, अग गव्हाच्या करंज्या होत्या मझ्या डोक्यात सो मी पुर्ण रेसिपी वाचलीच नाही रवा मैदा बघुन तशीच सोडली.

Anjalisavio
Monday, August 27, 2007 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठि काय काय पदार्थ खायला द्यावे. माझ्या भावाचा मागच्या रविवारी मोठा अपघात झालाय. त्यामुळे त्याचे हिमोग्लोबिन चे प्रमाण खुपच कमी झालय.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators