Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 25, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » Looking For Recipes » Archive through July 25, 2007 « Previous Next »

Dineshvs
Friday, July 13, 2007 - 4:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुपरमॉम, पनीरचा साखरभात चांगला होतो. केशरी रंगाच्या साखरभातात, पांढरे पनीरचे क्युब्ज छान दिसतात. पनीर तळायचे वैगरे नाही, तसेच वापरायचे. इतरप्रकारच्या मसालेभातावरही तसेच क्युब्ज पसरवता येतात. किंवा पनीर लांबट किसुनही सजावट करता येते. पनीरमधे थोडा मैदा घालुन मळुन त्याचे गोळे करुन, रसगुल्ले करता येतात, व तेही साखरभातावर पसरुन देता येतात.
स्नेहा, जर फ़्रीजचे तपमान नीट असेल तर वरणाची डाळ आठवडाभर सहज राहते. त्यात पाणी कमी असावे. झाकण नाही ठेवले तर डाळ सुकत जाते. पण वाया जात नाही.
भाज्या किंआ इतर कुठलाही पदार्थ पुर्ण थंड करुनच फ़्रीजमधे ठेवावा. नुसत्या भाज्या शिजवल्या असतील, तर दोन तीन दिवस टिकतात. तयार भाज्या, ग्रेव्हीवाल्या वैगरे असतील, तर थंड करुन फ़्रीजरमधे ठेवाव्यात. त्याही आठवडाभर राहतील. पण अगदीच निकड असल्याशिवाय अश्या तयार भाज्या ठेवु नयेत.
फ़्रीजमधेही पदार्थ आंबु शकतो, वा त्याला बुरशी येऊ शकते. त्यामूळे वापरण्यापुर्वी, नीट बघुन, वास घेऊन पहावा.


Sneha1
Friday, July 13, 2007 - 5:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanx , दिनेशदा.. आठवडाभरासाठीच करून ठेवायचे आहे...

Leenas
Monday, July 16, 2007 - 10:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रवा उत्तप्प्याची रेसिपी आहे का ऑलरेडी कुठे इथे?

Prachee
Tuesday, July 17, 2007 - 2:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ragada pattisechi recepie havi hoti.... kuni madat karu shakel ka???

Ksmita
Tuesday, July 17, 2007 - 11:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prachee ,इथे पहा रगडा पटीस रेसिपी
/hitguj/messages/103383/79976.html?1078514770

Ksha
Wednesday, July 18, 2007 - 12:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिल्लीला गोलगप्पे देताना ते एक प्रकारचं वेगळं मिश्रण घालतात त्यांत. गरम गरम असतात एकदम आणि थोडेसे गोडसर.
कुणाला माहिती आहे का ते मिश्रण कसं तयार करायचं ते?


Supermom
Wednesday, July 18, 2007 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks नलिनी, दिनेश.
प्रचंड घाई झाली या वेळेस. मग साधा भाज्यांचा पुलावच नेला करून. पण पनीरचा साखरभात अन नलिनीने लिहिलेला बटाटा भात बेहद्द आवडला. दर शुक्रवारी असतेच पार्टी.त्यामुळे माझं पाककौशल्य दाखवायला भरपूर वाव आहे.


Akshitija
Wednesday, July 18, 2007 - 6:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ksha u will get same gol gappas in Pune too.Its basically ragada from ragada pattice. I have tried this couple of times & tastes exactly like the one you mentioned.

Shmt
Thursday, July 19, 2007 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे थोडासा इडली रवा उरला आहे. त्याचे मी काय करु शकते इडली सोडुन. त्याचा ढोकला करता येइल का?
धन्यवाद



Malavika
Friday, July 20, 2007 - 4:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इडली रव्याचा उपमा करत येईल. नेहमीसारखाच करायचा. फ़क्त रवा भाजुन घ्यायचा नाही.

Meghdhara
Monday, July 23, 2007 - 4:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चॉकलेट बनवायची रेसिपी मिळेल का?

मेघा


Meghdhara
Monday, July 23, 2007 - 4:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

क्ष यू पी दिल्लीत त्या चटणीला सौंठ म्हणतात. आपण भेळेसाठी जी खजुराची चटणी करतो तशीच असते ती.
मी आमचूर जीरा पावडर चाट मसाला साखर थोडं तिखट अशी केली होती..

मेघा


Dineshvs
Monday, July 23, 2007 - 3:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेधा बाजारात मिळते तसे चॉकलेट घरी करता येत नाही. कारण त्यात काहि खास पदार्थ घातलेले असतात. पण बेसिक कृति म्हणुन अनसॉल्टेड बटर, पिठीसाखर आणि अर्थातच कोको पावडर वापरुन चॉकलेट्स करता येतात.
सर्व घटक आपल्या आवडीप्रमाणे. बटर सॉफ़्ट करुन त्यात साखर व कोको मिसळायची. हवा तो इसेन्स घालायचा, साधारण मऊसर मिश्रण झाले कि त्याची चॉकलेट्स करुन फ़्रीजमधे ठेवायची.
हि अगदी बेसिक कृति, वेळ मिळाला कि खास कृति लिहीनच.


Savani
Monday, July 23, 2007 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघधारा,
ही लिंक बघ. इथे मूडीने बरेच चॉकलेट्स चे प्रकार दिलेत.

/hitguj/messages/103383/115705.html?1157550791

Me_mastani
Monday, July 23, 2007 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाउंड केकची रेसिपी कोणाला माहित आहे का?

Zakki
Tuesday, July 24, 2007 - 12:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

होऽऽऽऽ. अग्गदी सोप्प्पी आहे.
आम्ही घरी बरेचदा करून पाहिली, पण खालील रेसिपि सर्वात बेष्ट.

जवळच्या ग्रोसरीच्या दुकानात जा. तिथून पैसे देऊन घेऊन या. स्वस्त नि मस्त.



Shonoo
Tuesday, July 24, 2007 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी जॉय ऑफ़ कूकिंग मधली Pound Cake रेसिपी वापरलीये. चांगले होतात. पण सर्व साधारण ग्रोसरी मधे सहज मिळतात पाउँड केक त्यामुळे झक्कींची रेसिपीच जास्त वापरली जाते आमच्याकडे :-)

Me_mastani
Tuesday, July 24, 2007 - 4:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थ्यांक यु शुनु. तुझी रेसिपी क्रुपया देशिल का?

Princess
Wednesday, July 25, 2007 - 4:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेंगदाण्याचे पाकातले लाडु कसे करायचे?

Karadkar
Wednesday, July 25, 2007 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Princess, you can get some info here ....

/hitguj/messages/103383/46717.html?1139308770


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators