Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
शेवळाची भाजी ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » शेवळाची भाजी « Previous Next »

Dineshvs
Friday, June 01, 2007 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवळाची भाजी.

पहिल्या पावसानंतर रानात शेवळाची भाजी उगवते. खरे तर त्यासारख्या दिसणाया अनेक वनस्पति असतात, त्यामुळे स्वतःचे डोके लढवुन, कुठलेही कोंब खायचे नसतात.

बाजारात या कोंबाबरोबर आवळ्यासारखी दिसणारी काकडं नावाची फळे मिळतात.
याचा कोंब घेऊन खालचा काळा पडलेला भाग काढुन टाकायचा. याची वरची गडद रंगाची सालही काढुन टाकायची. या साली सोडवुन घ्यायच्या. आत एक पांढरा कोंब असतो, तोही खाजरा असतो. तोही खात नाहीत.
हि साले कापताना खुप काळजी घ्यावी लागते कारण याला खुप खाज येते. हि बारिक कापत जायची व तशीच चिंचेच्या पाण्यात टाकायची. थोडावेळ पाण्यात ठेवुन द्यायची. काकडं वाटुन त्याचा रस काढुन घ्यायचा.

या भाजीत, खिमा, करंदी किंवा सोडे घालतात. शाकाहारी करायची असेल तर भिजवलेली चण्याची डाळ घालतात.

बारिक कापलेला कांदा परतुन त्यावर हि भाजी परतायची. मग त्यावर काकडांचा रस घालुन भाजी शिजवायची. यात कांदा खोबर्‍याचा मसाला चांगला लागतो. नाहीतर आपल्या आवडीप्रमाणे घालावा. खाज पुर्ण जाण्यासाठी शिजतानाही चिंच घालावी लागते. मग ती घोटुन घेतात.
खिमा, करंदी सोडे वैगरे जे काहि घालायचे असेल ते आधी परतुन थोडे शिजवुन भाजीत घालायचे. काहि जण डाळीचे पिठ पेरतात. अशी पिठ पेरुन केलेली भाजी वापरुन, रुमाली वड्याही करतात.


Sharmila_72
Tuesday, June 05, 2007 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर दिनेशनी सांगितल्याप्रमाणे तो कोंब काढावा लागतो. त्याबरोबरच त्याखालचा शेन्दरी भाग पण काढावा लागतो.

Swa_26
Tuesday, June 05, 2007 - 6:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण बाहेरच्या साली आणि मधला सफेद कोंब याच्या मधील भाग घ्यायचा ना?

Dineshvs
Tuesday, June 05, 2007 - 7:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, हो हो तेच घ्यायचे.


Swa_26
Thursday, June 19, 2008 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा... ती काकडं जर नसतील तर काय घालु शकतो ह्यात आपण??

Dineshvs
Thursday, June 19, 2008 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती नसतील तर भरपूर चिंच घालता येते. कापून थोडावेळ चिंचेच्या पाण्यात भिजवुन, पिळून घ्यावीत आणि नेहमीप्रमाणे शिजवावीत.

आता आपल्याकडे ऊन नसते, पण हि भाजी सुकवूनही ठेवतात.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators