Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
बटाट्याचं धिरडं.. ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपवासाचे पदार्थ » बटाट्याचं धिरडं.. « Previous Next »

Bee
Monday, March 05, 2007 - 10:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा एक नविन आणि सोपा मेनू ह्यावेळी बहिणीने तिच्या लेकीसाठी केला. तिला त्यावेळी उपास होता म्हणून तिलाही नविन असे काही करावे लागले नाही. चार पाच मोठे बटाटे कचकच किसून घ्यावे. त्यात मीठ आणि लाल किंवा हिरवी मिर्ची घालून तो किस एकजीव करावा. बटाट्याचा किस लगेच काळसर होतो म्हणून खूप मोठा किस आधीच करुन ठेवू नये. बटाटे आकारानी मोठे घेतले की त्यात रस जास्त असतो. मीठ घालून तो किस आणखीनच पातळ होतो. मग गॅसवर एक चमचा तेल पसरवून त्यावर धिरडे करावे. वरतून झाकण ठेवण्याची गरज नाही. छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपुस भाजून घेतलेले हे धिरडे चवदार होतात.

Lalitas
Monday, March 05, 2007 - 12:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बटाटे अर्धवट उकडून किसावे व बीने सांगितल्याप्रमाणे धिरडं किंवा थालिपीठ बनवून पहा..... पाणी सुटायचा प्रश्न येत नाही व कीस मोकळा राहातो. दाण्याचं कूट व जिर्‍याची पूड घातली तर आणखी चविष्ट लागते.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators