Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
खेकडा.

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » मासे आणि इतर जलचर » खेकडा. « Previous Next »

Sassulya
Tuesday, January 30, 2007 - 12:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे अमेरिके मधे Wild Crab छान मिळ्तात. क्रुपया काहि receipes इथे पोस्ट करा.

Manuswini
Tuesday, January 30, 2007 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही घे खेकड्याचा झणझणीत रस्सा

खेकडा घेताना नेहमी मादी घ्यावी(आजीची टीप, ती पुर्ण शाकाहरी होती पण तिच्या गोवेकरी मैत्रिणीने दीलेली ही टीप.)
त्यावर काळ्या रेषा असतात.
मादी ही साधारण भरलेली असते.खेकड मेलेला घेवु नये.
५ खेकडे,
२ मोठे कांदे,
आले लसुणाची paste
गरम मसाला + कोथींबीर paste ,
हळद,
मिठ,
मालवणी वाटण ( सुखे खोबरे, कांदा,लसुण भाजुन वगैरे वगैरे)मागे मी कुठे तरी मालवणी कोंबडीत 'वाटण' कसे करायचे दीले होते, तसेच वाटण तयार करुन ठेवावे.

२) खेकड्याचे डांगी तोडायचे knowledge असेल तर स्वःता तोडा वा एक प्रकारचा इथे हतोडा मिळतो तो माझा भाऊ वापरुन जिंवंत खेकड्याचे डांगे तोडतो वेगळे.
३) बाकी parts म्हणजे लहान लहान पाय वेगळे करावे.(काय म्हणतात ते माहीत नाही त्या पायांना)

डांगे धुवुन हळदीच्या पाण्यात नुसतेच उकडावे(मी तरी उकडुन मग special hamemr ने तोडुन खाते).

४) खेकड्याची पाठ हवी तर काढावी आम्ही काढतो नी फेकतो व खेकडे धुवुन घेतो. आत मध्ये मगज मिळते जर खेकड्याची मादी भरलेली असेल तर.
खेकड्याचे लहान लहान पाय धुवुन mixie मध्ये juice काढावा व बाजुला ठेवावा.
५) खेकड्याला हळद, गरम मसाला, कोंथीबीर paste , लाल तळुन मिरच्यांची केलेली pastE लावुन ठेवावी.

मुळ कृती: तेल टाकुन चांगल्या भरपुर प्रमाणात घेतलेला कांदा छान तळावा. मग आले नी लसुण pastE तळावी, मग खेकडे टाकुन सुकेच परतावे.

५ मिनीटाने गरम पाणी जरासे टाकुन खोलगट झाकण ठेवुन त्यात पाणी ठेवावे नी तो पर्यन्त शिजलेल्या डांग्यावर ताव मारावा एक पेपर पसरुन हातोडा हातात घेवुन डांगे तोडत आजु बाजुला घाण करुन फस्त करावे. :-)

मध्ये मध्ये पाण्याएवजी मग लहान लहान पायाचा केलेला juice गाळुन घेवुनच टाकुन खेकडा शिजत आला का बघावे.

मग वाटण लावावे.

बारीक कापलेली कोथींबीर टाकुन तांदूळाची भाकरी हा रस्सा खावा.

डांगी oven मध्ये पण ग्रिल्ल करु शकतो butter टाकुन.

वातण कसे करावे ते ही खालील link आहे त्यात तिखट कोंबडी म्हणुन आहे त्यातलेच प्रकारचे वाटण करावे,
/hitguj/messages/103383/93122.html?1163315921




Shonoo
Tuesday, January 30, 2007 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्या इथे maryland Blues मिळतात. ते जवळपास मुम्बै, गोवा कारवार इथल्या खेकड्यांसारखे असतात. dungenes crabs म्हणून मिळतात त्यांचे डांगे फार मोठे असतात आणि मुख्य बॉडी मधे फार काही नसतं.

इथल्या चायनीज किंवा इटालियन दुकानात boys व girls अशा वेगवेगळ्या टोपल्या असतात्- she crabs चा भाव ही जास्त असतो. जिवंत ( उचलल्यावर हालचाल करणारे) बघून घ्यावेत.

घरी गेल्यावर एका मोठ्या घट्ट झाकणाच्या पातेल्यात भरपूर पाणी घालून त्यात खेकडे बुडवून ठेवावेत. This will send them to the big blue ocean in the sky.

मग त्याचे मोठे डांगे तोडून वेगळे करावेत. मोठे डांगे हातोडीने वा एखाद्या दगडाने जरासे ठेचावेत म्हणजे मसाला मुरतो. बारीक डांगे तोडून त्यांचा शेवटचा टोकेरी भाग तोडून टाकून द्यावा. खेकड्याची पाठ काढून आत त्याचे gills असतात ते काढून टाकून द्यावेत. पाठीमध्ये लाख असते ती अलगद हाताने काढून एका वाटीत ठेवावी. व पाठ टाकून द्यावी.

फोडणीच्या पळीत थोडे तेल तापवून त्यात सुक्या बेडगी मिरच्या ( एका नारळवाटीला साधारण दहा बारा तरी लागतील ) एक चमचा धणे परतून घ्यावे. गॅस बंद करून पाव चमचा हळद घालावी. गार झाल्यावर एका नारळवाटीच्या खोबर्‍याबरोबर बारीक वाटावे.

मोठ्या पसरट भांड्यात हा मसाला उकळायला लावावा. उकळी फुटल्यावर एक दोन कोकमे घालावी, मीठ घालावे आणि साफ करून ठेवलेले खेकडे घालावेत वा परत झाकून एक्-दोन उकळ्या येऊ द्याव्या.
एखादी उकळी आल्यावर वरून हलकेच पाठीतली लाख घालावी म्हणजे ती आमटी मधे विरघळून जाणार नाही.

अर्धा कांदा, एक इंचभर आले आनि दोन्-चार हिरव्या मिर्च्या बारीक चिरून तेलात आधी आले, मग मिर्च्या आणि शवटी कांदा घालून कांदा म उ होईपर्यंत तळून घ्यावे.

खेकडे घातल्यावर एक्-दोन उकळीत शिजतात. लगेच तळलेला कांदामिरची अलं त्यात घालून झाकण ठेवावे.

ताबडतोब गरम भाताबरोबर खावे.

साधारण ८-१० मध्यम खेकड्यांना एवढा मसाला पुरेल.

थोडी आमटी व निदान एखादा डांगा पाठवून द्यावा :-)


Chandya
Tuesday, January 30, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथल्या कोरियन दुकानात साफ केलेले खेकडे शीतपेटीतील ( frozen ) पॅकमध्ये मिळतात. ते वापरुन केले तर चांगले होतील का? कारण हे जिवंत खेकडे साफ करण्याचे प्रकरण जरा कठीण दिसतयं आणि रेसिपी वाचून तर तोंडाला नुसते पाणी सुटलेयं. :-)

Dineshvs
Tuesday, January 30, 2007 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चान्द्या, साफ केलेले खेकडे वापरुन ती मजा येत नाही. खेकडे तसे भितीदायक वाटत असले तरी, खाताना फार टोचत नाहीत. त्या नांग्या काढल्या तर अगदीच निरुपद्रवी प्राणी तो.
कुठे सॉफ़्ट शेल खेकडे मिळाले तर चव घेऊन बघा, हे खेकडे पारदर्शक कवचाचे असतात. आणि कवचासकट खायचे असतात.
तळटिप : मी पुर्ण शाकाहारी आहे.


Shonoo
Tuesday, January 30, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी एकदा frozen soft shell crabs आणून ते blackening spice लावून तळायचा प्रयत्न केला होता. शेवटी सगळं टाकून द्यावं लागलं.

Soft shell crabs इथे साधारण एप्रिल-मे महिन्यात मिळतात तेंव्हा ताजेच आणून खावेत.

रेग्युलर खेकडे मी कधी फ़्रोजन आणले नाहीत. पण ताजे आणून साफ करणे काही तितकसं कठीण नाही. एखाद्या इटालियन दुकानात ताजे खेकडे घेतले की ते वाफ़वून द्यायची सोय असते ( म्हणे). तसे करून घेऊन, मग घरी नेऊन पुढे भारतीय पद्धतीने करून बघता येईल.

नाहीतर मग पै,नाडकर्णी, शानभाग, कामत अथवा चित्रे, वर्टी, मोहिले इत्यादी मित्र-मैत्रिणींकडून जेवणाचे आमंत्रण मिळवावे :-)


Asami
Tuesday, January 30, 2007 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्या इटालियन दुकानात ताजे खेकडे घेतले की ते वाफ़वून द्यायची सोय असते ( म्हणे). तसे करून घेऊन, मग घरी नेऊन पुढे भारतीय पद्धतीने करून बघता येईल. >> चिवट नाही का होत तसे शिजवले तर ?

Chandya
Tuesday, January 30, 2007 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, मग कधी बोलवताय? :-)

मी जे फ्रोजन पाहिलेत ते बहुदा मग soft shell crabs असावेत. ते बरेच पांढरे शुभ्र होते पॅक मध्ये.

मला खर तर फक्त रस्सा खूप आवडतो (सर्दीवर नामी ईलाज). पण मला आणि आमच्या होम मिनिस्टरांना हे साफ करण्याची कला अवगत नाही. पण आता तुमचे पाठबळ आहे तर एकदा करुन पाहु. (डांगा पोस्टाने पाठवु का? :-) )


Shonoo
Tuesday, January 30, 2007 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटतं की वाफ़वलेले खेकडे लगेच घरी नेऊन करून पाहिले तर फार चिवट होऊ नयेत. मला जेंव्हा ताजे खेकडे कुठे मिळतात ते माहित नव्हतं तेंव्हा मी दोन चार वेळा असे वाफ़वलेले खेकडे आणलेले.



Manuswini
Tuesday, January 30, 2007 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

soft shell crabs चविला horrible वाटले, एकदा मी आणि भाऊ baltimore गेलो होतो famous blue fin restaurant मध्ये तिथे हे soft sheel crabs order केले.

order करताना waiter म्हणाला बहुतेकांना आवडत नाहीत, तेव्हा बघा तुम्ही, आम्ही म्हटलो बघुया तर खरे आणि चांगले दोन order केले $25 ला.(किंमत अशीच लिहिते कारण चव धव नसलेले हे खेकडे एवढे महाग का कळत नाही. फेकुन दीले.
मी नेहमी chiense market मधुनच आणते. frozen कधीच खाल्ले नाहीत.

काय करायचे, दोन tongs घ्यायचे, एक डांगा एक tongs ने पकडायचा नी दुसर्‍या tongs ने दुसरा डांगा पिरगळायचा..
सर्व दोरे आधी तोडायचे नाहीत.

आणि लहान लहान पाय धुवुन वाटुन गाळुन त्याचा रस वापरायचा नाहीतर पाणी टाकुन शिजवले खेकडे तर पांचट होते हा माझा अनुभव आहे. कारण एक्द मला ते सर्व लहान पाय वाटायला कंटाळा आला सरळ पाणी टाकुन शिजवले.

नक्कि करुन पहा, थोडी मेहनत आहे. पण थंडीत हा रस्सा दुसर्‍या दिवशी गरम भाताबरोबर खाल्ला तर थंडी गायब.



Lalu
Tuesday, January 30, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>आणि लहान लहान पाय धुवुन वाटुन गाळुन त्याचा रस वापरायचा नाहीतर पाणी टाकुन शिजवले खेकडे तर पांचट होते
हे अगदी बरोबर आहे. :-) पांचट पेक्षा, असा रस घातला की चव चांगली येते.
हे लक्षात राहण्याचे कारण म्हणजे लहानपणी मी मदतीच्या नावाखाली किचनमध्ये कडमडत असताना एकदा ते पाय फेकून दिले होते
आमच्यात मटणाचा मसालाच वापरतात या रश्श्याला. चन्द्या, इथे काही अमेरिकन ग्रोसरी स्टोअर्स मधे ताजे घेतलेले खेकडे साफ करुन देतात. विचारुन बघ.


Manuswini
Tuesday, January 30, 2007 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु तेच म्हणायचे होते मला, चव निघुन जाते पाणी भरपुर घातले तर.

मी फ्कत किंचीत गरम पाणी सुरवातीला घालते आणि पहीली पाच एक मिनीटे तेलावरच खंमग परतते.

शूनू,
तु ते भरपुर पाण्यात उकळवुन ते पाणी टाकुन देते?

actually मला वाटते खेकडे एवढ्या भरपुर पाण्यात उक्ळवायची गरज नसते.
राग मानु नकोस पण माझे एक opinion


खेकडे, तिदर्‍या, मुळे किंचीत टोप्पत पाणी ठेवुन पाच मिनीटे वाफ़वले तरी चालतात. कारण त्या पाण्यात त्याची एक खारट चव उतरुन जर ते पाणी फेकले तर बेचव लागते. एक माझे मत.


Shonoo
Tuesday, January 30, 2007 - 7:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे! छे!! खेकडे उकळायचे वगैरे नाहीत!!!!!!!!!!!!

जिवंत खेकड्यांचे डांगे तोडायला भिती वाटत असेल तर गार पाण्यात किंवा थोड्या कोमट पाण्यात बुडवून ठेवले की खेकडे मरतात. मग लगेच डांगे तोडून साफ करून घ्यायचे. ते बुडवून ठेवायला घेतलेलं पाणी टाकून द्यायचं!

खेकडे खोबरं आणि सुक्या मिरच्यांच्या वाटणातच शिजतात.



Bee
Wednesday, January 31, 2007 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे ही कृती वाचून मला घरी आली :-)

शोनू तू काय काय उपद्व्याप करत असतेस :-)


Dineshvs
Wednesday, January 31, 2007 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खेकडे वाफेवरहि पटकन शिजतात. शिजले कि त्यांचा रंग केशरी होतो.

Neelu_n
Wednesday, January 31, 2007 - 9:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा छान :-) वाचुनच तोंडाला पाणी सुटलं.
>>नाहीतर मग पै,नाडकर्णी, शानभाग, कामत अथवा चित्रे, वर्टी, मोहिले इत्यादी मित्र-मैत्रिणींकडून जेवणाचे आमंत्रण मिळवावे :-)

तर मग शोनू कधी यायचे जेवायला तुझ्याकडे :-)

Shonoo
Wednesday, January 31, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी

घेरी म्हणायचंय का तुला? नारळ सोलणे दुकानात मिळतो तसला नव्हे, झाडावरून नुकताच उतरवलेला, फणस चिरून त्याचे गरे काढणे, रोजच्या जेवणाला केळीची पाने तोडून आणणे, विहीरीचं पाणी काढून आणणे या सर्वांपेक्षा किती तरी सोपं आहे खेकडे साफ करणे.

एखाद्या अभारतीय माणसाला अगदी अलिकडे पर्यंत घरातली जमीन शेणाने सारवली जात असे हे सांगून पाह्यलंस का कधी? अभारतीय जाउ दे, एखाद्या दिल्लीकराला सांगून बघ!

सगळा सवयीचा प्रश्न आहे!



Bee
Thursday, February 01, 2007 - 2:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो घेरीच म्हणायचं होतं :-)

काम कठिणच नाही म्हणत मी पण जिवंत खेकडा आणि ते डांगे वगैरे नावे वाचून मला भरवसा नाही बसला की मी शोनूचे पोष्ट वाचत आहे. फ़ारच बहादुर म्हणायला हव तुला. इथे सिंगापोरमधे मी मांस विभागात पाय ठेवतो आणि भल्या मोठ्या टोपलीतले खेकडे बघतो. त्यांचे पाय.. तुझ्या भाषेत डांगे बांधून ठेवलेले असतात. बाजूला स्वेटर ज्यानी विणतात तशी एक सुई ठेवलेली असते. चिनी बायका येतात, त्या खेकड्याला सुईने टोचतात आणि मग काय ते ठरवतात की कुठला खेकडा उचलायचा. माझे पाय हा प्रकार बघुन लगेच फ़ळफ़ळावळ विभागाकडे वळतात. नंतर तिथेच बाजूला एक fish-tank विक्रेत्याचे दुकाण आहे, ह्याच बायका मला तिथेही दिसतात आणि मला प्रश्न पडतो की हा प्रकार नक्की काय आहे, एकीकडे जेवणासाठी खेकडे विकत घ्यायचे, एकीकडे fish tank बघायचा विकत घ्यायचा, माशांची सेवाश्रुशा करायची.. सगळा प्रकार अजब न्यारा.. :-)


Shonoo
Thursday, February 01, 2007 - 3:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळा सवयीचा आणि विश्वासाचा प्रश्न शेवटी. आपल्या कडे नाही का जमीन सारवायला शेण चालत असे नव्हे लागतच असे. पण अगदी आपल्या सारख्या हाडामासाच्या माणसाचा स्पर्शच काय सावली सुद्धा अंगावर पडली तर विटाळ होत असे!

आता तुला मी अगदी मोठेपणाने सांगतेय खरं पण बर्‍याच मागे eat drink man woman नावाचा तैवानी चित्रपट पाहिला होता तेंव्हा त्यातल्या काही दृश्यांवर माझी प्रतिक्रिया पण तुझ्या सारखीच झाली होती :-)


Bhagya
Thursday, February 01, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mud crabs हे फ़ारच चवदार असतात असं मी ऐकलय....

ते काळे आणि चांगलेच भरलेले वाटतात, खूप जड असतात.
तर snow crabs हे गुलाबी-पांढरे असतात आणि तसेच जड असतात. मी दोन्ही हाताळलेत (दोर्‍या बांधलेले असताना) पण शाकाहारी असल्याने खाल्ले नाहीत कधी.


Bee
Thursday, February 01, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

11th/12th ला असताना earthworm ची nerve-ring मी बरोबर काढली होती. पण मला हा डीसेक्शन प्रकार कधीच आवडला नाही. घरी जाऊन मी box मधील equipments धुधु धुतलेले आठवते.

असो.. नो विषयांतर :-)


Sassulya
Friday, February 02, 2007 - 8:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद मनुस्विनी व शोनू. तुम्ही सान्गितल्या प्रमाणे करुन प्रतिक्रिया कळवेन, अर्थातच करणार ससुल्या,प्रतिक्रिया मात्र माझी. ससूल्या सुका ख़ेकडा ख़ूप छान करतो, त्यामुळे मी पण ग़ाजरे ख़ायचे सोडुन ख़ेकडे ख़ाते आजकाल. :-)


S1sd
Saturday, February 17, 2007 - 10:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Khekdhychi Recepi Chagali Ahe Pun aek Suchavate, Khekachychi Path Kadeli Ki aek Pivala(Yellow) Padarther Disato To Kadhu Naye, karan Khekaya Madhe To Aek poustik Aseto, Tya Yellow khanayane Kavile ha Rog Hote Nahe.

S1sd
Saturday, February 17, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Tya Sathi Aek Recepi Sagate,
Khekadychi Path Dun Ghyvi tatela Yellow Padarth Vatit kadhun Tevava.Rassa(Kalvan)Karatana.4-5 Khekade Asel Ter 2 Vatya Chanychy dhalechi Peta Ghyve, Tyate Thodese Methe, haleda 1/2 Chamacha, 1/2 Mirachi,Chamcha Bhare Tel Thakun sarva Mishrane ekatra Karave
,Khekadychchy Pathet Pahele To Yellow Padarthe Takava Va nanter He Puran Tyate Dhabun Bharave,Rassa Ukaltana he Tyate Sodave, Mixran Tho De Ole Honya Sathe To Yellow Padarthe tate Thoda Kalevava Mhaneje Peth Bhurbhurit Honar Nahi, Rassay Madhele Hee Patha Lathana Kashi Lagali Te Jarur Kalevave.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators