Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
SuranoLee

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » कोंकणी » SuranoLee « Previous Next »

Manuswini
Wednesday, December 13, 2006 - 2:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ती looking for मधील ही link वाहुन जावु नये म्हणुन इथे paste करते आहे,

http://www.loksatta.com/daily/20061207/viva12.htm
credit to adtvtk

Adtvtk
Thursday, December 14, 2006 - 2:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे कसले credit श्रीमती शामला बादल ह्यांना धन्यवाद

Dineshvs
Thursday, December 14, 2006 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई याचा तिखट प्रकारहि करते. गुळाच्या जागी मिरची वाटुन घालते. तो हि छान लागतो.

Prajaktad
Friday, December 15, 2006 - 3:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अदिती! माझा सुरनोळीचा attempt जमलाय अस वाटतय...
माझेही पिठ फ़ार आंबलय अस नाही.(फ़ुगुन वैगेरे तर अजिबात आल नाही)
पण,प्रयोग करुन तर बघु,म्हणुन करुन बघितले. मी अशी क्रुति केली
२ वाट्या उकडा तांदुळ(माझ्याकडे खुप उरलाय त्यामुळे संपवायचा म्हणुन घेतला )
दोन पाण्यात धुवुन भिजत घातला,त्यातच मेथि दाणेही घातले.
सकाळी थोड्या ताकात(आंबट नव्हते माझ्याकडे)पोहे भिजवले ओल खोबर आणी हे सगळ blender मधुन (मध्यम)बारिक केल.
चार तास ओव्हन मधे ferment व्ह्यायला थेवुन दिल.
trial म्हणुन थोद्या पिठात पाव चमचा बेकिंग पावदर , थोडा गुळ , हळद किंचित मिठ टाकुन डोसे घातले.
डोसे (सुरनोळी) तव्यावर घातल्यावर एक छान सुवास येतो.. मेथी दाणे , गुळ , ओल खोबर याचा एकत्रित सुवास फ़ारच छान येतो.. चव हि छान लागतेय.

कधी हा पदार्थ खाल्लाच नाही त्यामुळे काय चव आणी texture अपेक्षित आहेत ते कळत नाही...
मला वाटत उकडा तांदुळपेक्षा साधा तांदुळ घेतला पाहिजे.
दिनेशदा!किंवा इतर ज्यांना माहिति आहे त्यानि लिहा कि अजुन..


Manuswini
Friday, December 15, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राज्क्ता मी भिजत घातलाय तांदूळ नी पोहे

सांगते तुला उद्याकडे

चव ही मला तरी आठवते त्याप्रमाणे पिकलेला फणस असतो ना बरका तशी लागते



Manuswini
Friday, December 15, 2006 - 6:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरनोळी अशी दिसतात. जराशी जाडसर असतात.
आपला मालपुवा असतो ना तशीच चव लागते, किंवा बरका फणस

This picture does not belong to me
suranoLee

Adtvtk
Friday, December 15, 2006 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता अग बघ तु हळ्द मीठ दुसर्‍या दिवशी घातले. मी ती recipe अक्षरश तंतोतंत पाळली. माझे पीठ खाली बसुन वर पाणी असे झाले होते सकाळी.

मनुस्वीनी फोटो बघुन उद्याच पुन्हा प्रयत्न करवा वाटतो पण idali भिजत घतलीय.

माझी काकी मी भारतात गेल्यावर मला करुन देते हे. चव मलापण नक्कि सांगता येणार नाही.


Nalini
Friday, December 15, 2006 - 8:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण idali भिजत घतलीय.>>
भिजवलेल्या ईडलीचे काय करणार आहेस गं अदिती?


Prajaktad
Friday, December 15, 2006 - 9:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

द्या टाळी ! माझी सुरनोळी सेम ह्या फोटोत दिसते तशिच झालिय...
..मी सकाळी पोश्ट केले तेव्हा थोड्यावेळच ferment झाले होते , आता चांगले फ़ुगले आहे. ८ एक तासात चांगले आंबुन येते.
अदिती अग तु रेसिपी follow करुन ही ferment झाले नाही म्हणुन,मग मि जरा बदल करुन बघितला.पुढच्या वेळेस अस करुन बघ!




>>>माझे पीठ खाली बसुन वर पाणी असे झाले होते सकाळी.>>>


गुळाला पाणी सुटुन तस झाल असेल ! ...


Adtvtk
Monday, December 18, 2006 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी :-).
प्राजक्ता पुढच्या वेळी तुझी recipe
सुचनां बद्दल धन्यवाद.
मनुस्वीनी तुझ्या सुरनोळ्या कशा झाल्या?


Dineshvs
Monday, December 18, 2006 - 4:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे वाटण वाटताना, पाणी अगदी कमी वापरायचे असते. आमच्या घरी नारळाचे पाणी घालतात. हळद घालत नाहीत.

Manuswini
Monday, December 18, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरनोळ्या छान झाल्या.

माझ्या अमेरिकन मैत्रिणीने indian pancakes are good म्हणत चार खाल्या. मी सुरनोळ्या, टोमटो चटणी, ज्वारी+मुळी पराठा with पुदिना चटणी, नाराळाची चटणी असा breakfast केला सुरनोळ्या सोबत. :-)


मी फोटो टाकते थोड्या वेळात.

पण मी कृतीत हाच फरक केला,

पाणी न टाकता नारळाच्या दूधात वाटल्या. ( asian market मधुन मिळते ते can ).
हळदी आणी केशर सुद्धा टाकले.(शेवटी रंगच हवा असतो ना). हळद दुसर्‍या दिवशी पिठ आंबल्यावर टाकली.
पोहे ताकाएवजी दह्यात भिजत घातले. त्यामुळे मिश्रण पातळ वगैरे झाले नाही.

आंबुन छान आले होते.दुसर्‍या दिवशी किंचीत हळद सुद्धा टाकली.

authetic सुरनोळी मध्ये हळद ही टाकतातच. :-) (मावशीची टिप्स).

पिठ आंबण्यावर त्याचा काही परिणाम वगैरे होत नाही.
मी तांदुळ पुर्ण एक रात्र भिजत घातले होते. पोहे सुद्धा दह्यात भिजत घातले.


Prady
Monday, December 18, 2006 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनू तांदूळ कुठला घेतलास गं. बासमती चालेल का की उकडाच पाहिजे. मी ईडली रवा वापरून ट्राय केलं. प्रीहीटेड ओव्हन मधे ठेऊन पण पीठ फुललं नाही पण जाळी छान पडली होती. आता तांदूळ वापरून बघते.

Manuswini
Monday, December 18, 2006 - 8:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

prady
मी तिलडा बासमती(च) वापरते आणी सुरनळ्यांना पण हाच वापरला पण घरीच parboiled केला.

माझ्या वरील पद्धतीने सुरनोळी करुन बघ, छान होतील.

जर पार बॉईलड राईस घरी नसेल तर असा बनवायचा

एका कोरड्या डब्यात २ वाट्या कोरडा तांदूळ घे सुरनोळी साठी, झाकण ठेवुन बंद कर.
कूकर मध्ये पाणी उकळ, मग हा डबा ठेवुन कूकरचे झाकण लावुन दोन शिट्या काढ. पाणी अजिबात शिरु देवु नकोस डब्यात.

मग कूकर थंड झाल्यावर उघडून ह्यात गरम पाणी टाक, १ चमचा मेथी दाणे नी भिजवत ठेव.

बाकी कृती सेम सुरनळ्याची.

असा पार बॉईल्ड राईस करतात.




Prady
Monday, December 18, 2006 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनु Thanks गं. नक्की करून बघेन.

Adtvtk
Monday, December 18, 2006 - 10:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी तोंडाला पाणी सुटले तुझा मेनु वाचुन.
मीठ कधी टाकलेस. (हे विचारणे जरा अती होतेय पण माझी गाडी तिथेच अडली आहे. )
बाकी तू केलेले changes नारळाचे दुध वैगरे चविष्ट वाटतेय.
thank you try करुन बघितल्या बद्दल. आता बघते पुन्हा एकदा करुन.


Manuswini
Tuesday, December 19, 2006 - 12:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिठ वगैरे आदल्या दिवशीच टाकले होते.

दही आंबट होते त्यामुळे आंबट गोड चव छान लागते.


मी परत करेन कधीतरी.

unfortunately फोटो टाकयला वेळ लागेल कारण digital camera नाहीय.


Manuswini
Monday, October 29, 2007 - 6:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा घ्या माझ्या सुरनोळिचा फोटो,
आधीचा सुरनोळीचा फोटो कुठेतरी गायबला, मी ह्या काल ब्रेकफ़ास्टला केल्या होत्या.
surnoli

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators