|
मावा केक ची रेसिपी कोणी सांगू शकेल का? ईथे जी मावा पावडर मिळते ती यात वापरता येते का? धन्यवाद.
|
Prajaktad
| |
| Friday, November 17, 2006 - 3:22 pm: |
| 
|
मस्तानी ! माझ्याकडे एका पुस्तकात आहे रेसिपी हवि असेल तर लिहते ती इथे.. पण,मी ती try केलिली नाही आणी त्यात मावा पावडर ही वापरलेली नाही.
|
थॅक्स प्राजक्ता, लिही ना प्लिज. बाकी मायबोलीकर त्यांचे मार्गदर्शन देतीलच.
|
Prajaktad
| |
| Friday, November 17, 2006 - 5:49 pm: |
| 
|
मिल्क मावा केक साहित्य: ५०० ग्रम खवा २५० ग्रम साखर अर्धा लिटर घट्ट दुध १ वाटी पनिर चुरा १ वाटी पिठीसाखर अर्धा चमचा जायफ़ळ पुड काजु बदाम मधोमध चिरुन,पिस्ते खरबुज बिया,वेलदोडा दाणे क्रुति: खवा हाताने मोडुन साखर,दुध घालुन एकजिव करा.पनिरच्या चुर्यात पिठिसाखर मिसळुन रवेदार मिश्रन करा. हा चुरा,जायफ़ळ पुड खव्यात एकत्रा करा. हे सगळ गसवर परतत रहा.घट्ट होवुन कडेने सुटले की** " तयार " पातिल्यात ओता.झाकण लावा.गार झाल्यावर पिसेस कापा.गडद , हलके बदामी रंग येण्यासाठी हलवाई पातेले बर्फ़ावर ठेवतात.त्यामुळे जो भाग लवकर गार होतो तो पांढरा दिसतो.मधला भाग गरम राहिल्याने बदामी दिसतो. ** पातेले " तयार " करणे पातेल्याला तुपाचा किंवा रिफ़ाइंड तेलाचा हात लावुन त्याच्या तळाशी काजु बदाम मधोमध चिरलेले,पिस्ते खरबुज बिया,वेलदोडा दाणे घाला. मिश्रण शिजले कि लगेच पातेल्यात ओतुन घट्ट झाकण लावा. हि मिठाई बर्फ़ी प्रमाणे थापली तर ' पंजाब ' वैगरे भागात याला ' पलंगतोड " किंवा p.g.t हलवा म्हणतात. क्रुति व इतर माहिती...उषा पुरोहित यांच्या ' शानदार पाकक्रुति ' पुस्तकामधुन.
|
Seema_
| |
| Friday, November 17, 2006 - 7:22 pm: |
| 
|
मस्त वाटती आहे कृती. करुन बघायला पाहिजे . प्राजक्ता पुस्तक कस आहे ते ? चांगल असेल तर मी मागवणार होते .
|
Me_mastani
| |
| Saturday, November 18, 2006 - 12:16 am: |
| 
|
धन्यवाद प्राजक्ता. छान वाटतेय रेसिपी. खरं तर मी केक सदरात मोडणारी रेसिपी शोधत होते. पण ही पण नक्की करून पाहिन.
|
Prajaktad
| |
| Sunday, November 19, 2006 - 5:10 pm: |
| 
|
सीमा चांगल वाटल मला पुस्तक...
|
उषा पुरोहित अग त्यांच्या पाकक्रुती मला खुप आवडतात शिवाय सोप्प्या पण असतात. माझ्याकडे त्यांच एक पुस्तक आहे चेंज हव असला की सरळ पुस्तक घेउन डोळे मिटुन त्यांनी सांगितल तस करते आणि तो पदार्थ सहीच होतो.
|
Prady
| |
| Thursday, November 23, 2006 - 12:58 am: |
| 
|
मस्तानी ही माझ्याकडच्या पुस्तकातली कृती. बघ असं काही करून बघायचं असेल तर. साहित्य: १) एक वाटी मैदा २) एक वाटी मावा ३) एक वाटी साखर ४) पाव वाटी लोणी ५) अर्धी वाटी दूध ६) अर्धा चमचा बेकिंग पावडर ७) पाव चमचा बेकिंग सोडा ८) पाव चमचा वेलची जायफळ पावडर ९) २ अंडी कृती: प्रथम अंडी एग बीटरने फेसून घ्यावीत. मैदा, बेकिंग पावडर व सोडा एकत्र करून तीन वेळा चाळून घ्यावे. लोणी, साखर, मावा एकत्र करून फेसावे. त्यात फेसलेली अंडी घलून ५-६ मिन. फेसावे. याच मिश्रणात दूध व वेलची जायफळ पाव्डर घालून सगळे चांगले एकत्र होई पर्यंत फेसावे. तुपाचा हात लावलेल्या भंड्यात मिश्रण ओतून ओव्हन मधे ३०-३५ मिन. १०० डिग्री c ला बेक करावे. वरून खरपूस गुलाबी झाला की केक झाला का ते पाहून बंद करावे.
|
Lajo
| |
| Thursday, November 23, 2006 - 1:59 am: |
| 
|
Prady चांगली वाटतेय गं ही रेसिपी. वीकएंडला करुन बघायला पाहिजे.
|
Me_mastani
| |
| Thursday, November 30, 2006 - 10:22 pm: |
| 
|
रेसिपी बद्दल थंक्यू प्रडी. यात मावा पावडर वापरली तर चालेल का?
|
churni road station baher Merwan che prasiddha mawa cake miltat . kupach chan lagtat , koni try kele aslyas krupya tyachi kruti deta yeil ka
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 07, 2008 - 8:44 am: |
| 
|
चर्नी रोड नाही, ग्रांट रोड स्टेशन ते.
|
Prr
| |
| Thursday, May 08, 2008 - 1:31 pm: |
| 
|
मेरवानचे केक वाव!... खरेच त्याची चव छान आहे. मी पन बर्याच जणांना विचारले की काय वेगळे असते त्यांच्या केक मध्ये पण उत्तर नाही मिळाले.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|