|  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Thursday, November 02, 2006 - 4:41 pm:    |  
 
 
 |   
  |   
  मोटला  यासाठी मोदकं, तारल्या सारखे लहान मासे घ्यावेत. ते जर साफ करुन ओंजळभर असतील तर एक वाटी खोबरे, आठदहा सुक्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, अर्ध्या लिंबा एवढी चिंच, एक चमचा धणे, मिरिदाणे आठ दहा हे सगळे बारिक वाटुन घ्यावे. वाटण घट्टच असावे. त्यात मिळाले तर हळदीच्या पानाचे तुकडे घालावेत. नाहीच मिळाले तर लेमनग्रासची एखादी काडी वा थोडा पुदीना चुरडुन घालावा. माश्याना मीठ लावुन ते या वाटणात घोळवुन घ्यावेत.  मग केळीची जुन पाने घ्यावीत. त्याला थोडे खोबरेल तेल लावावे. त्यावर हे मिश्रण घालुन पाने घट्ट बांधुन त्याची चौकोनी मोटली बांधावी. अगदीच नाईलाज असेल तर फ़ॉईल वापरावी. गॅसवर खोलगट लोखंडी तवा ठेवुन त्यात हि मोटली ठेवावी. वरुन झाकण ठेवावे. अगदी मंद आचेवर हे ठेवावे. पाच सात मिनिटानी दुसर्या तव्यात मोटली परतुन ठेवावी, व खालचा तवा वर झाकण ठेवावा. बार्बेक्यु करायचे असेल तर जाळीवर परतुन भाजावे. अगदी आयत्यावेळीच उघडावे.    खजिना.    तिसर्या किंवा शिंपल्या नीट साफ करुन एकशिपी कराव्यात. त्या साधारण दोन वाट्या भरुन असल्या तर दोन कांदे बारिक चिरुन घ्यावेत. त्यात दोन मोठे चमचे चिंचेचा कोळ घालावा. एक मोठा चमचा लाल तिखट किंवा पाच सहा हिरव्या मिरच्या वाटुन, घालाव्यात. त्यात पाव वाटी ओले खोबरे घालावे. मीठ घालावे व अर्धा चमचा साखर घालावी. त्यात एक वाटी पाणी घालावे. आणि भांडे मंद आचेवर ठेवावा. पाणी आटत आले कि त्यावर कोथिंबीर पेरावी. आणि पुर्ण सुके करावे. यात अजिबात तेल घालायचे नाही वा फोडणीहि द्यायची नाही. हे हलवताना खणखण आवाज येतो म्हणुन हे नाव.    
 
 
  |  
Lalu
 
 |  |  
 |  | Thursday, November 02, 2006 - 5:10 pm:    |  
 
 
 |   
  |   
  खजिना   चांगला वाटतोय. करुन बघते. आलं -  लसूण अजिबात नाही घालायचे? 
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Friday, November 03, 2006 - 1:46 am:    |  
 
 
 |   
  |   
  नाही घालायचे. कोकणात आले लसणाचा तितका वापर नसतो.  
 
  |  
Shonoo
 
 |  |  
 |  | Friday, November 03, 2006 - 1:38 pm:    |  
 
 
 |   
  |   
 लालू    इथे तिसर्या करायला काय घ्यावं? म्हणजे अमेरिकन नाव काय   cherry stone, little neck   असे बरेच प्रकार दिसतात इथे.  चायनीज्-एशिअन दुकानातून घेतेस की अमेरिकन दुकानातून? चांगले-वाइट कसे ओळखावे?    मी आजवर फक्त  mussels   आणून पाहिलेत. पण  clams  कधी आणले नाहीत.     
 
  |  
  मोटला... तोंडाला पाणी सुटलं.. फक्त हळदीची पानं राहिली.. मग अजूनच टेस्ट. अ हा हा हा हा   
 
  |  
Lalu
 
 |  |  
 |  | Friday, November 03, 2006 - 4:04 pm:    |  
 
 
 |   
  |   
 शोनू, मी  clams  च घेते, अमेरिकन दुकानातून. Little neck clams  च असतात. ते  chewy  होत नाहीत. आमच्या इथे  Cheasapeake bay  मधले मिळतात ते सहसा फ्रेश असतात.  mussels  पण चालतील वरच्या रेसिपी ला.  * तू ते  drinks  चं काहीतरी म्हणाली होतीस, त्याचं काय झालं?    
 
  |  
Dineshvs
 
 |  |  
 |  | Friday, November 03, 2006 - 5:07 pm:    |  
 
 
 |   
  |   
  हे शिंपले घट्ट बंद असलेले असावेत. जर उघडले असतील तर टॅप केल्यावर बंद व्हायला हवेत, तर ते ताजे. टवका उडालेले, सताड उघडलेले सहसा घेत नाहीत.  
 
  |  
Manuswini
 
 |  |  
 |  | Saturday, November 04, 2006 - 1:14 am:    |  
 
 
 |   
  |   
 शूनू,   ranch 99  मध्ये मिळतात... तु काय  bay area  आहेस?    नेहमी  chinese fish market  मध्ये मिळतात.    मी पक्की मासे खाणारी तेव्हा  Ranch 99  जवळ रहाणे म्हणजे मज्जा होती... आता  shift  झाले.    छोट्या  clams  घ्यायच्या...  पान्यात टाकून ठेवतात बघ. 
 
  |  
Manuswini
 
 |  |  
 |  | Saturday, November 04, 2006 - 1:16 am:    |  
 
 
 |   
  |   
 मोदकं चे सार नी तांदूळाची भाकरी.......    तिखट सार काय लागते....... छे गेले ते दिवस. 
 
  |  
Shonoo
 
 |  |  
 |  | Saturday, November 04, 2006 - 8:11 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मी कुठे बे एरियात रहाण्याइतकी नशीबवान? मी फिलाडेल्फिआ च्या जवळ रहाते. पण फिली मधल्या चायनाटाउन आणि रेडिंग टर्मिनल मार्केट मधून तार्ले, बांगडे सुरमै, पापलेट आणि बोम्बील मिळतात आणि इटालियन मार्केट मधे कुर्ल्या. त्या जोरावर माझा मुम्बैकर मासे खाऊ असल्याचा पासपोर्ट टिकून आहे. नाहीतर नुसते टिलापिया, कॅटफ़िश आणि सामन चे फिले खाऊन दिवस काढावे लागले तर कठीण झालं असतं    मी ताजे  clams  फक्त  Paella  करायला आणले आहेत. आता दिनेश ची रेसिपी पण करुन पाहीन. रेडिंग टर्मिनल मार्केट मधे अगदी छन मिळतात.      Cento  वाल्यांचे बाटलीतले किंवा कॅन मधले  clams  आणून चाउडर किंवा  clam sauce  वगैरे प्रकार पण चांगले लागतात. पण ताज्या शिम्पल्यांची सर कशाला नाही!     
 
  |  
 
 | 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
  | 
 | 
 
|  हितगुज गणेशोत्सव २००६   | 
 | 
 
 
 
 
 |