Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पालेभाज्या : धुणे - निवडणे - चिरणे.. ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » पालेभाज्या : धुणे - निवडणे - चिरणे.. « Previous Next »

Bee
Thursday, October 12, 2006 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवा मी तांदूळजा बघितली आणि पटकन दोन्ही जुळ्या उचलून घेतल्या. घरी येऊन त्या धुतल्या त्यालाच १५ मिनिटे गेलीत. शिवाय बेसिनच्या तळात पाने, मुळे, माती काहीकाही साचले होते. मग ती भाजी मी पंख्यासमोर एक तासभर निथळत ठेवली. तोवर माझ्या पोळ्या आणि फ़ोडणीचे साहित्य चिरुण झाले. मग मी पेपरात तांदूळजा अंथरली आणि निवडायला पालखट मांडून बसलो तर एकदम त्राण निघून गेला. कारण दहा मिनिटात थोडीशीच निवडून झाली होती. मग ते ताट तसेच अंगात जोर आणून refrigerator मध्ये खाली ठेवून दिले. ऐन वेळेवर काय होईल लवकर म्हणून मूगाची डाळ फ़ोडणी दिली. ती पाच मिनिटात शिजली देखील. काल तांदूळजा परत बाहेर काढली. त्यातली काही तर कोमेजून गेली होती. ती कोमेजलेली पाने निवडताना तर आणखीणच त्राण गेला. परत postpone केली. वेळेवर पिठले केले. आज उरलेली भाजी निवडून होईल अशी अपेक्षा.

आता मी इथे काय विचारणार आहे हे कळले असलेच. हिरव्या भाज्या शरिराला आवश्यक असतात. एक पालक सोडली तर निवडायला सर्व भाज्या म्हणजे एक उपद्व्यापच आहे. शेपू, मेथी, तांदूळजा, चाकवत, शेवगा - सर्व भाज्या इथे कधीमधी दिसतात आणि मी हौशेने त्यांना घरी आणतो. पण मग अशी फ़जिती होते भाज्या धुताना, निवडताना आणि चिरताना की सर्व उत्साह निघून जातो. मग पर्यायाला उरतात फ़क्त फ़ळभाज्या.. आपले बटाटे वांगे शिमला मिर्ची पान आणि फ़ुल गोबी..

तुमच्याकडे काही shiot cut techniques आहेत का भाज्या धुवायला, निवडायला?


Supermom
Thursday, October 12, 2006 - 11:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जुळ्या उचलून घेतल्या?
त्राण निघून गेला?
अरे बी, किती घाई ती लिहायची? सकाळी सकाळी प्रचंड हसवलेस रे बाबा.
असो. अरे, आधी मुळे कापूनच टाकता येतात जुडी आणल्याबरोबर.मग सरळ न धुताच मी आधी भाजी निवडते.मग एका मोठ्या भांड्यात वा परातीत पाण्यात ठेवते ती पाने. थोड्या वेळाने माती, गाळ सारे खाली बसते. असे दोन तीन वेळा केले की भाजी अगदी स्वच्छ. पेपर टॉवेलवर काढून ठेवते मग.
मग सवडीप्रमाणे चिरते वा लगेच हवी असेल तर ओलसरच चिरते.
अर्थात ही माझी पद्धत झाली. जाणकार मंडळी अजून नीट माहिती देतीलच.


Meggi
Thursday, October 12, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, अरे मेथीची भाजी निवडत बसत नाही. सरळ अर्धी जुडी खालुन कापते. सगळी माती लागलेली मुळं निघुन जातात. मग परातीत धुवायची. पुन्हा चाळणीत ताकुन धुवायची. माती निघुन जाते. बारिक चिरुन घ्यायची. मी अगदी पानं वगैरे खुडायच्या भानगडीत पडत नाही. देठांय नीवन्सत्व असतात अस विचार करुन देठ तसेच ठेवते :-) मेथीचे पराठे करायचे असतिल तर देठ खूप बारिक चिरते. मेथीचं वरण करायचं असेल तर फ़ार फ़रक पडत नाही.

Sayonara
Thursday, October 12, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, होतं असं माझंही. अर्थात मी पालेभाज्यांबद्दल नाही तर माझ्या फ्रीजमध्ये पडलेल्या केळफुलाबद्दल बोलते आहे. भाजी खूप आवडते म्हणून आणलं खर पण दोन अडीच तास घालवून निवडायची हिम्मत होत नाही.

Bhagya
Friday, October 13, 2006 - 12:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

supermom आहेस कुठे? २-३ वेळा फ़ोन करून तुझ्या मोबाईल वर मेसेज ठेवला...

Sayuri
Sunday, April 15, 2007 - 2:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विकत आणल्यानंतर कोथिंबीरीच्या जुड्या फ़्रेश कश्या टिकवाव्यात?....मी सध्या मुळं चिरुन पेपरमध्ये रॅप करुन फ़्रीजमध्ये ठेवते. पण फ़ार टिकत नाहीत. मला निदान ५/६ दिवस तरी फ़्रेश टिकायला हव्यात. Any advice..?

Prady
Sunday, April 15, 2007 - 5:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/hitguj/messages/103383/120449.html?1157051276

ithe bagh barach discussion jhalay hyawar


Sayuri
Sunday, April 15, 2007 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hmm thanks Prady. ll try it for sure.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators