Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तवा सब्जी टकाटक ...

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » पंजाबी » तवा सब्जी टकाटक « Previous Next »

Surabhi
Friday, September 08, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तवा सब्जी टकाटक

आजकालची ही हॉट फेवरिट डिश पार्ट्यांचा एक हिस्साच बनली आहे. केटरर लोक स्पेशल काऊंटर ठेवून पाहुण्यांना त्यांच्या फर्माईशी प्रमाणे गरमागरम भाजी सर्व्ह करतात.
आपल्या आवडीच्या भाज्या वापरून ही भाजी आपण घरी सुद्धा करू शकतो. खालील कृती सहसा ज्या भाज्या वापरल्या जातात त्या अनुषंगाने लिहीत आहे.

भाजीसाठी साहित्य:
२ मध्यम बटाटे
१०० ग्र पनीर
१ मोठेसे गाजर
१ मोठे कारले
८-१० छोटी भेंडी
२-३ अगदी लहान वांगी
२-३ परवर
१०-१२ फरसबीच्या शेंगा
८-१० छोट कॉलीफ्लॉवरचे तुरे
४-५ बेबी कोर्न
४-५ छोटे मश्रूम्स
१ मोठी सिमला मिर्ची
१ मध्यम कांदा
१ मध्यम टॉमेटो
एक चमचा चाट मसाला, एक चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट व एक चमचा मीठ ह्यांची एकत्र पूड करून घ्यावी.
भाज्या चिरताना:
भाज्यांचे साधारण बोटभर लांबीचे व अर्ध्या इन्च जाडीचे फिंगरचिप्स प्रमाणे तुकडे करावे.
पनीरचे पण असेच तुकडे करावे. कारली तासून उभी चिरून बिया काढाव्या व त्याचेही लांबट तुकडे करावे. बटाते, गाजर, सिमला मिर्ची चिप्स प्रमाणे चिरावे. लहान भेंडी असतील तर देठ व टोके कापून अख्खीच ठेवावी. मोठी असतील तर दोन तुकडे करावे. फरसबी पण तशीच.
मश्रूम, बेबी कोर्न अख्खेच ठेवावे. वांग्यांना क्रॉस चिरा मारून अख्खी ठेवावी. परवर तासून उभे चार तुकडे करावे.
कांदा व टॉमॅटोच्या चौकोनी मोठ्या फोडी कराव्या.
ग्रेव्हीसाठी साहित्य:
अर्धी वाटी तेल
१ टि. बारीक चिरलेला लसूण
१ टि. बारीक चिरलेले आले
१ टि. जाड किसलेले आले २
२ हिरव्या मिर्च्या बारीक चिरून
१ टि. कसूरी मेथी
२ टि. लाल तिखट
१ टि. हळद पूड
१ टि. धण्याची पूड
१ टि. गरम मसाला
१ टेबलस्पून दही
१ वाटी उकडून वाटलेल्या कांद्याची पेस्ट
अर्धी वाटी किसलेला टोमॅटो किंवा प्युरी
१ टि. व्हिनेगार
ग्रेव्ही पुरते मीठ
बारीक चिरलेली कोथंबीर
कृती: खोलगट तव्यामध्ये ३-४ टे. तेल घालून प्रत्येक भाजी वेगवेगळी तळून काढून त्याला तयार केलेली मसालापावडर लावून घ्यावी व बाजूला ठेवावे.
भाज्या तळून झाल्या की त्याच तेलात अजून लागेल तेवढे तेल घालून पनीर तळून घ्यावे व बाजूला ठेवावे. मग कांद्याच्या फोडी व शेवटी टॉमेटोच्या फोडी तळसून त्याही बाजूला ठेवाव्या.
आता ह्याच तापलेल्या तेलात प्रथम चिरलेले आलं-लसूण, कसूरी मेथी, गरम मसाला, धणेपूड, लाल तिखट, हळदीपूड व मीठ टाकून खमंग वास सुटला की दही व कांद्याचीपेस्ट टाकून परतावे. मग त्यात टॉमेटो, किसलेले आले, हिरवी मिरची टाकून परतावे. व्हिनेगार व अर्धा वाटी पाणी घालून थोडा वेळ ऊकळावे म्हणजे दाट ग्रेव्ही तयार होईल.
आता घरातला सगळ्यात मोठा सपाट तवा घेऊन त्यावर तव्याच्या कडेने गोलाकार प्रत्येक भाजीचे छोटे छोटे ढीग रचावे. तव्याच्या मध्यभागी वरील ग्रेव्हीतील थोडी ग्रेव्ही घालून बाजूच्या हव्या असलेल्या भाजांच्या फोडी लागतील तशा आणि पनीर, कांदा, टोमेटो तुकडे पण ग्रेव्हीत सरकवून कालथ्याने टकाटक परतून वर कोथंबीर घालून सर्व्ह करावे.
भाजी परतताना गॅस मोठा हवा. भाजी कुरकुरीत राहायला हवी. मंद आगीवर शिजून मऊ पडू देऊ नये.








Moodi
Friday, September 08, 2006 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लई ब्येस! एकदम टकाटक कृती आहे.

सुरभी फक्त एकच सांग की दह्या ऐवजी डबल क्रीम वापरले तर चालते का?


Surabhi
Friday, September 08, 2006 - 9:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी मी करते तेव्हा दहीच वापरते. डबल क्रीम कधी घातले नाही ह्यात. !

Moodi
Friday, September 08, 2006 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं आपल्या इथले दही चवीला छान वेगळे असते, इथे ते ग्रेव्हीकरता म्हणून घातले की कटवट तुरटसर चव येते. बघु प्रयत्न तर करुन बघते. दोन प्रकारच्या ग्रेव्ही तयार करते.

Bee
Friday, September 08, 2006 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरभि, तुझ्या कृतीनुसार जर ही भाजी केली तर किती जणांसाठी होते किंवा एका व्यक्तीला किती दिवस पुरेल?

सगळे ingradient आणि भाज्यांची नावे वाचून माझा जीव धापला एकदम...


Surabhi
Friday, September 08, 2006 - 9:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी एका वेळेस ही भाजी ५-६ माणसांना पुरते. तर एका माणसास ती कीती वेळा पुरेल? गणित कर बघू! मी गणितात कच्ची आहे.
पण तुला जर स्वत:पुरती करायची असेल तर तुझ्या आवडीच्या भाज्या वापरून त्यानुसार करू शकतोस! सर्व भाज्या घ्यायची गरज नाही आणि ही तयार ग्रेव्ही फ्रिज मधे ठेऊन लागेल तेव्हा पुन्हा ताजी भाजी करू शकतोस!

Bee
Friday, September 08, 2006 - 10:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरात एकावेळी तीन चार फ़ळभाज्या असतातच. पण इतक्या भाज्या नसतात कधीच. खूप दिवस झालेत mix vegetable खायला. मी तुझ्या ह्या कृतीला माझ्या मनाप्रमाणे modify करुन बनविण्याचा प्रयत्न करीन. इतक्या patiently लिहून काढलीस तेंव्हा करुन बघावीच लागेल.

मला काय वाटलं सुरवातीला बीबीचे नाव वाचून की आता इथे तव्यावर होऊ शकणार्‍या भाज्यांची चर्चा सुरु असेल आणि मीही त्यावर आपली शेपू, तांदूळजा, कांद्याची पात, मेथी, मुळा, पालक अशा कृत्या लिहून काढीन.. :-)


Dineshvs
Friday, September 08, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छान कृति आहे सुरभी. बाल्टी, कडाई आणि तवा असा भाज्यांचा एक वेगळा गटच तयार झालाय.
मसाला वेलची, मिरीदाणे, लवंग, शहाजिरे, बडीशेप, दालचिनी हे मसाले गरम करुन त्याची भरड पुड ऐनवेळी भाजीवर शिवरली तर खमंग चव येते.


Surabhi
Saturday, September 09, 2006 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुमच्या कडून कृती छान असल्याचा अभिप्राय मिळाला की मनापासून आनंद होतो! खरच ताज्या मसाल्याचा स्वाद काही वेगळाच असतो!
मुडी, बी, सॉरी! काल प्रश्नोत्तराच्या नादात तुम्हा दोघांनाही धन्यवाद द्यायचे राहूनच गेले!
Thank-you!

Maj
Monday, September 11, 2006 - 1:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

jyanchya ghari sagalyanna wegweglya bhajya avadtaat(paryayee avadat nahit), tyanna hi bhaaji changali ahe..

Manali_gupte
Saturday, November 25, 2006 - 4:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरभि
माझ्या मेनुकार्ड मधे तुझ्या या "बोटे चाटायला "लावणार्‍या खमन्ग भाजीने भर घातली त्याबद्दल धन्यवाद.
भाजि अतिशय सुरेख झालि होति. आमच्या याना फार आवडलि. :"
अजुन एखादि अशी रेसिपि असेल तर मला करुन बघायला आवडेल.
मनालि



Surabhi
Saturday, November 25, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनाली, इतक्या छान शब्दात अभिप्राय दिलास त्याबद्दल खूप आनंद झाला... आपल्या मायबोलीवर इथल्या सुगरणींनी आणि दिनेशांनी स्वानुभवाच्या इतक्या मस्त मस्त रेसिपीज लिहिल्या आहेत ना की बिघडूच शकणार नाहीत... अगदी खजीनाच आहे इथे...
तरी इथे नसलेली आणि माझी tried & tested recipe मी नक्कीच लिहीन. मलाही रेसिपी share करायाला आवडतं!!


Manali_gupte
Thursday, November 30, 2006 - 1:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरभि
मला पण तुझ्या पाककृति करुन बघायला नक्की आवडतिल.मी सुद्धा आता वेळ काढून माझ्या पाककृति इथे पोस्ट करत जाईन. मुलांमधुन वेळ काढ्णे जरा कठिणच आहे पण तरिहि.
चल लवकरच परत येइन माझ्या पाककृति समवेत.
मनालि


Suniti_in
Friday, August 31, 2007 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरभी मी ट्राय केली ही रेसेपी. एकदम मस्त झाली होती भाजी. माझ्याकडे जे जेवायला आले होते त्यांना फार आवडली. एकीच्या मुलाने तर ही भाजी करेल तेव्हा त्याच्यासठी नक्की पाठवत जा म्हणून सांगितले.

Surabhi
Saturday, September 01, 2007 - 10:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिती अग तू एवढ्या कष्टाने भाजी केल्यावर ती मस्त होणारच.
आवडली ना? मग झालं तर.. बाकी कशी आहेस? खूप दिवसांनी दिसलीस...


Jaymaharashtra
Saturday, October 27, 2007 - 10:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला कुणी पनीर टिक्का मसालाची रेसिपी देईल का?

Mepunekar
Saturday, October 27, 2007 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, अग ईथपर्यन्त आलिस, तेव्हा या bb च्या खाली असलेल पनीर टिक्का नाही पाहिलास? :-) हि घे link
/hitguj/messages/103383/119628.html?1168021733

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators