Login/Logout | Profile | Help | Register
Last 1|3|7 Days | Search | Topics

चुर्मा लाडू

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » लाडू » चुर्मा लाडू « Previous Next »

  Thread Posts Last Post
Archive through October 23, 200620 10-23-06  12:57 pm
Archive through October 28, 200620 10-28-06  8:15 am
Archive through November 04, 200720 11-04-07  7:36 pm

Manuswini
Sunday, November 04, 2007 - 7:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग प्राजे,साखर कुठली घेतली होतीस? अग इथील साखर बेकारऽ.
तु रोजची Granular sugar ghe not confectionary sugar in US(not meant for indian ladoos as does not taste that good मग तीच वापर. काही साखर पाणी ज्यास्त शोषून पाक कमी होतो नी लाडू चुरा टाकल्यावर कोरडा होतो.

साखर ग्रॅनुलर असेल तर पाणी पण ज्यास्त लागेल. आता एक करु शकतेस, जरासे दूध साखर टाकून उकळवून घे गाळ (मलाई काढून), मग हळु हळु दूध हबकून(ओतु नकोस) लाडू पुन्हा मळून घे नी बांध. दूध गरम गरम नको हबकु (साखर आहे ना त्यात), दुसरे म्हणजे त्या लाडवाच्या परातीखाली आपला चपातीचा तव आ गरम करून ठेव. म्हणजे direct heat न लागता नुसते आंच लागेल नी तु भरभर दूध हबकून मळून घे. बघ फरक पडेल. problem हा की हे आता टीकणार नाही बाहेर. freez मध्ये ठेवावी लागतील नी कडक होतात. मग खायच्या आधी बाहेर लाढून खावे लागतील.

गेल्या वर्षी मी हे लाडू केले होते. काय प्रेमात पडले मी लाडवाच्या. पण ह्या वेळी काही त्रास घेणार नाही ज्यास्त. आई म्हणते कशाला करतेस एवढे ते त्रास घेवून,आराम कर. योग्य वेळ आली की कर दाखवायला कोणाला तरी :-). मोजून चार पदार्थ कराअय्ची हुक्की आहे ते करेन.


Prajaktad
Sunday, November 04, 2007 - 8:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने! शुगर granular च होती(म्हणजे आहे) ..आता तु सागते तस नुसत गरम दुधाचे हबके मारुन करुन बघेल..साखर मात्र नाही घालता येणार कारण,ते आधिच अतिगोड वाटतायात.
तुझी आइ म्हणतेय ते खरय पण, हौसेने स्वत्:साठी करुन खाउ नये अस कुठे आहे?अशिच हौशी रहा..तुझ्या कलागुणांच कौतुक करणारा नवरा तुला मिळो..

Manuswini
Sunday, November 04, 2007 - 8:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजे,
thanks गं फ़ॉर आशिर्वाद. अग हौसेनेच करते आणि मायबोलिमुळे खुप छान वाटते. पण सध्या मला दोन हफ़्त्यापासून बरेच नसते. ताप येतो सारखा संध्याकाळचा flu shot पण घेतला. म्हणून आई तसे म्हणते. पण ती खुप खुष होते जेव्हा मी तीला फोन करून सांगते की मी हे केले,ते केले.


Dineshvs
Monday, November 05, 2007 - 7:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, आहारात रोज थोडेसे काहितरी कडु खायचे, म्हणजे असे त्रास होत नाहीत.
Take care,

Nalini
Monday, November 05, 2007 - 11:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राजक्ता, ह्याप्रकारचे लाडु जरा कोरडेच होतात. मला वाटते की पाक जरा जास्त उकळला गेला असावा. आधिच अतिगोड झालेत म्हणतेस त्यामुळे आणखी पाक घालुन चालणार नाही.
काही लाडु फोडुन गरम दुधाचा हात लावुन परत वळुन बघ. किंवा आणखी थोडा चुरा घालुन २ तारी पाक घातलास तरी चालेल. त्यामुळे लाडु कोरडे वाटणार नाही.
मनु, काळजी घे आणी बरे वाटले तर आणखी २-४ प्रकार कर फराळाचे.


Manuswini
Monday, November 05, 2007 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा आणि नलीनी,

thanks , खरेच अगदी मनापासून लिहिते, मायबोलिवर इतकी प्रेमळ लोक आहेत ना खुप छान वाटते.
मोजून पाच पदार्थ करणार आहे, माझे non-maharastrian friends खुप आवडीने विचारतात म्हणून मग ऊत्साह वाटतो करायला आणि दिवाळीच्या दिवशी घरी येतातच.




Prajaktad
Monday, November 05, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मने! काळजी घे ग बाळ..
नलिनी मी एक दोन लाडु फ़ोडुन दुधाचा हात लावुन परत करुन बघितलेत.. जरा बरे वाटत आहे...१५ लाडु झाले आहेत...आता गोडि कमि करायला आणखी किती पुर्या आणी साखर(पाकाला लागेलच ना!) घालु?


Nalini
Tuesday, November 06, 2007 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रजक्ता, मला वाटतं गोडी कमी करायला आणखी ८ लाडु होतील एवढ्या पुर्‍या करायला हव्यात. साखर नेहमीच्या प्रमाणापेक्षा कमी घ्यायला हवी. अर्धी किंवा पाऊणपट. ह्यावेळी मात्र पाक गोळिबंद न करता २ तारी किंवा रवा बेसन लाडुसाठी करतेस तसा पाक कर, म्हणजे लाडु कोरडे होणार नाहीत.

Prajaktad
Tuesday, November 06, 2007 - 1:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thank you! नलीनी बघते काय जमतय ते!

Prajaktad
Wednesday, November 07, 2007 - 5:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जरा हिय्या करुन परत सुधारणा करायला घेतली..
आधी सगळे(घट्ट)लाडु microwave मधुन काढले...सगळे मोडुन त्या मिश्रणात हळुहळु लागेल तसे (कोमट)दुध घालुन हलवले...मग एकत्र करुन झाकुन ठेवले.
सगळ दुध जिरुन गेल्यावर परत लाडु वळले...मस्त मऊसुत लाडु झालेत..फ़क़्त फ़्रिज मधे ठेवावे लागतिल..मुरल्यामुळे कि काय गोड ही बरोबर लागत आहेत.


Dineshvs
Thursday, November 08, 2007 - 9:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नुसते दुधच वापरले असेल तर बाहेरही खराब होणार नाहीत. पण तीन चार दिवसात संपवले तर चांगले.

Prajaktad
Friday, November 09, 2007 - 10:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चुर्मा लाडु असे जमले


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Add Your Message Here
Post:
Username: Posting Information:
This is a private posting area. Only registered users and moderators may post messages here.
Password:
Options: Automatically activate URLs in message
Action:

 
Web maayboli.com

Topics | Last Day | Last Week | Tree View | Search | User List | Help/Instructions