Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 16, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » पोह्याचे प्रकार » दडपे पोहे » Archive through August 16, 2006 « Previous Next »

Moodi
Wednesday, August 16, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दडपे पोहे.

साहित्य : १ वाटी भर जाड पोहे, ताजे खवलेले खोबरे अर्धी वाटी, ३ ते ४ हिरव्या मिर्च्या, मीठ अन साखर चवीनुसार, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य,१ मध्यम कांदा.

कृती : पोहे एकदा धुवुन नारळाच्या किसात अर्धा ते १ तास मिक्स करुन ठेवावे( नारळाचे पाणी पण शिंपडले तरी चालेल) नंतर हाताने मोकळे करुन त्यात कांदा अन हिरवी मिर्ची व कोथिंबीर बारीक चिरुन घालावी. भाजलेले शेंगदाणे ही घालावे आवडत असतील तर. मीठ अन साखर घालुन नीट मिक्स करावे.

वरुन नेहेमीसारखी जीरे मोहरीची अन कढीपत्याची फोडणी द्यावी. आणि परत नीट हलवुन घ्यावे.वाटल्यास मिर्ची फोडणीत टाकली तरी चालेल.

मस्त लागतात हे.


Prady
Wednesday, August 16, 2006 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी पोहे नक्की धुवायचे का गं मला वाटत होतं की नाराळाच्या पाण्याने आणी खोबर्‍याच्या ओलेपणाने भिजतील तेवढेच. आणी हो अगं एका काकूंनी मधे त्यात उडदाचा तळलेला पापड घातला होता चुरून. छान लागतो. काहितरी variation . पण बरं झालं तु दिलीस कृती ते. करीन लवकरच.

Moodi
Wednesday, August 16, 2006 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा अगं तसे भिजतात ते. नाही धुतले तरी चालतात, बरे झाले तू आठवण केलीस.
पण काही जणांना तसे आवडतील की नाही म्हणून मी तसे लिहीले. मी बारीक शेव अन उडदाचा पापड भाजुन चुरुन घालते, साध्या पोह्याच्या ऐवजी हेच आवडतात मला.


Akashkandeel
Wednesday, August 16, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्या पोह्याकरिता जाद पोहे आइवजि पातल पोहे वापरतात असे वतते.

Deepanjali
Wednesday, August 16, 2006 - 7:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कच्च्या कांद्या बरोबर साल काढून बारीक चिरलेली काकडी पण mix केलेली छान लागते दडप्या पोह्यां मधे .

Arch
Wednesday, August 16, 2006 - 7:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दडपेपोहे मेतकुटाशिवाय? मेतकूट अविभाज्य भाग आहे न दडपे पोह्यांचा?

Prady
Wednesday, August 16, 2006 - 7:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आकाशकंदील काही जण वापरतात पातळ पोहे सुद्धा. ते जरा थोडा चटका देऊन मग वापरतात. चिवड्याला देतो तेवढा चटका नाही द्यायचा. थोड्या तेलावर (खूप कमी) भाजून पापड, शेव mix करून साठवून पण ठेवता येतं. हवं तेव्हा काढून बाकी कृती मूडी ने दिल्या प्रमाणे.

Akashkandeel
Wednesday, August 16, 2006 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Prady ani Moodi

Savani
Wednesday, August 16, 2006 - 8:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, अगदी बरोबर. दडपे पोहे मेतकुटाशिवाय नाहीच.
मी दडपे पोहे करताना पोहे कधी धुत नाही. मी पोहे, ओला नारळ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मेतकुट, साखर,मीठ tomato (देवनागरीत लिहायला अजूनही न जमणारा शब्द:-)), भाजके शेंगदाणे असे सगळे एकत्र करते. त्यावर तेलात हिंग, जिरे मोहरी, हळद हिरव्या मिरच्या घालून फ़ोडणी करते आणि ती फ़ोडणी त्यावर घालून मग घट्ट झाकण लावून हे सगळं बंद करून ठेवते. आणि मग साधारण अर्धा तासाने त्यावर पोह्याचा पापड कुस्करून खायचे.
पोहे दडपून म्हन्जे घट्ट झाकण लावून भांड्यात ठेवणे महत्वाचे. म्हणुन तर त्याला दडपे पोहे म्हणतात नं.


Savani
Wednesday, August 16, 2006 - 8:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक राहिलं महत्वाचं. मी दडपे पोहे नेहेमी पातळ पोह्यांचेच करते.

Prady
Wednesday, August 16, 2006 - 8:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी मला वाटतं पोहे झाकून ठेवताना त्यावर वजन ठेऊन दडपायचे म्हणून दडपे पोहे. चू.भू. द्या घ्या. टोमॅटो असं लिही Toma.cTo

Savani
Wednesday, August 16, 2006 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो बरोबर प्रज्ञा, .तोच मूळ उद्देश की दडपून ठेवायचे. झाकणावर वजन ठेवायचे किन्वा एखाद्या डब्यात ठेवायचे. टोमॅटो( जमलं. :-))

Priya
Wednesday, August 16, 2006 - 8:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही नाही घालत मेतकूट. पोहे पातळच घेतो आणि नारळाचे पाणी शिंपडून आणि खोवलेला नारळ मिसळुन दडपुन ठेवतो. शिवाय फोडणीही नसते. पोह्याचा भाजलेला पापड कुस्करुन घालतो. बाकी कांदा, मिरची, लिंबू, चिमूटभर साखर वगैरे असतेच.

Lalu
Wednesday, August 16, 2006 - 9:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे मेतकुटाचं पहिल्यांदाच ऐकलं मी. सहसा पातळ पोहेच, न धुता घेतात. लिंबू पाहिजे.
याला मी 'चावून खायचे' पोहे म्हणते. . नीट भिजले नाही तर फारच चावावे लागतात ते! ~D


A_sayalee
Wednesday, August 16, 2006 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जाड पोह्याचे दडपे पोहे प्रथमच ऐकले...आजवर पात्तळ पोह्याचेच केले खाल्ले आहेत

Storvi
Wednesday, August 16, 2006 - 9:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या सासरी मेतकुट घालुनच करतात पोहे(त्याला ते हच्चीद अवलक्की म्हणतात आणि त्यात काकडी घालतात ओलेपणासाठी) पण माहेरी नाही.. :-)

Karadkar
Wednesday, August 16, 2006 - 9:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा, हच्चीद आवलक्की म्हणजे लावलेले पोहे ग त्यात मेतकुट असते. दडप्या पोह्याना ते आलेपाक अवलक्की म्हणतात ना?

Storvi
Wednesday, August 16, 2006 - 10:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कराडकर बरोबर हच्चीद अवलक्की म्हणजे लावलेले पोहे.. , ते थोडेफ़ार दडप्यापोह्यांसारखेच करतात (निदान माझ्या सासुबाईतरी) फ़क्त आपण ओला नारळ किंवा काही जण ताकात भिजवतात तसे न करता ते काकडी आणि टोमॅटो मध्ये थोडे भिजवुन घेतात. सांगायचा मुद्दा असा की मी दडपे पोहे करतांना त्यांना कधीच पाहिलेले नाही. आता इकडे कोणाला आवडत नाही म्हणुन करत नसतील तर ठाउक नाही, त्यामुळे हे दडप्यापोह्याला सगळ्यात जवळचा पदार्थ मी त्यांच्यापद्धतीने करतात तो सांगितला...

Deepanjali
Wednesday, August 16, 2006 - 10:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हच्चीद आवलक्की म्हणजे लावलेले पोहे ग त्यात मेतकुट असते. दडप्या पोह्याना ते आलेपाक अवलक्की म्हणतात ना?
<<<<हा कन्नड शब्द आहे का ?

Storvi
Thursday, August 17, 2006 - 12:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डीजे हो, हच्चीद म्हणजे लावलेले.. आणि अवलक्की म्हणजे पोहे..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators