Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तांदुळ पिठाचे उंडे (हळदीच्या / फणसा...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » तांदुळ पिठाचे उंडे (हळदीच्या / फणसाच्या पानांत शिजवलेले) « Previous Next »

Gajanandesai
Thursday, August 17, 2006 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तांदळाच्या पिठाचे उंडे

साहित्य: एक पूर्ण पिकलेले वाळूक, तांदळाचे पीठ साधारण अर्धा किलो, पाव ते अर्धा किलोपर्यंत चुरडलेला गूळ, मीठ, जायफळ, सुंठ-पूड, हळदीची किंवा फणसाची पाने.
(फणसाची पाने असतील तर प्रत्येक उंड्यासाठी दोन लागतील, हळदीची असतील तर एका उंड्याला एक पान लागेल. एवढी पाने हवीत.)

आता वाळूक म्हणजे काय ते माहीत नसेल तर सांगायला हवे. :-)
रस्त्यावर पांढर्‍या, हाताच्या विती एवढ्या, चिरून मीठ मसाला घातलेल्या काकड्या विकायला असतात, त्याचीच ही एक जात; पण पूर्ण वाढ झाल्यावर फूट-दीड फुट लांब आणि जवळ जवळ पाउण फूट जाड होते. पिकल्यावर केशरी रंगाची होते. याला दुसरे काही नाव आहे का माहीत नाही..

कृती: वाळूक चिरून त्याच्या बिया वेगळ्या काढून, त्याचा गर किसून घ्यायचा. साल टाकून द्यायची.
मोठ्या टोपात हा कीस आणि गूळ घालून मंद आचेवर थोडावेळ शिजवायचे. चवीपुरते मीठ टाकायचे.
गूळ वितळल्यावर थोड्या वेळाने उतरायचे. आणि त्यात तांदळाचे पीठ मळायचे. पाणी घालायचे नाही. गूळ आणि कीस या मिश्रणात जेवढे मळता येईल एवढेच पीठ मळायचे.
मळताना त्यात चवीप्रमाणे जायफळ, सुंठ-पूड घालायची.
त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून ते स्वच्छ धुतलेल्या पानांवर थापावेत.
१. फणसाच्या पानांसाठी: एका पानावर पूर्ण थापायचे आणि वरून दुसरे पान ठेवायचे.
२. हळदीच्या पानांसाठी: अर्ध्या पानावर थापायचे आणि उरलेले अर्धे पान दुमडून थापलेल्या पिठावर ठेवायचे.

थापताना शक्यतो पातळ थापायचे आणि इडल्या उकडतो तसे वाफेवर उकडायचे. (पाने तशीच असू द्यावीत.)

एक अख्खे वाळूक आणि पीठ, गूळ इत्यादी मिळून बरेच उंडे होतात. पण हा प्रकार दोन दिवस तरी सहज टिकतो. (तोपर्यंत उरला तर :-) ). हवेतर अर्ध्या वाळकाचे करावेत.
हे शिजत असतानाच हळदीच्या किंवा फणसाच्या पानांना जात्याच असलेला सुगंध अधिक गुळाचा सुगंध. असा घमघमाट सुटतो की बस्स!

पलीकडे एका बीबी वर फणसाच्या पानातील इडल्या ह्या पदार्थाविषयीची चर्चा वाचली आणि एकदम हा सुगंध आठवला. यात काही त्रुटी असतील तर कृपया दुरुस्त करा.


Moodi
Thursday, August 17, 2006 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन मस्तच रे. वाळूक नाव ऐकले होते पण पाहिलेले नाही. त्याकरता कोकण किंवा मुंबईतच यावे लागेल( पुण्यात मंडईत असे मिळतय का ते बघावे लागेल).
खूपच छान आणि लगेच करुन खावी अशी कृती आहे. बरेचसे कोकणीं अन गोव्याकडील पदार्थ मला माहीत नाहीत आणि जुन्या कृती आजकाल कुणी जास्त लिहीत पण नाही, तुला धन्यवाद.


Rupali_rahul
Thursday, August 17, 2006 - 10:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जिडी अशीच एक रेसिपी मी दिलेली आहे पण ते वडे अहेत. हे उकडलेले उंडे आहेत. नवीन पदार्थ करुन बघायला हरकत नाही.
त्याल कोकणात तवसा असेही म्हणतात गो मुडीताई.


Anilbhai
Thursday, August 17, 2006 - 12:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तवसळी म्हणतात त्यात आम्ही गव्हाचा जाडा रवा ( सोजी ) घालतो तांदळ्याच्या पिठा ऐवजी :-)

Lalitas
Thursday, August 17, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन, अरे हा साधारण आम्ही "धोंडस" किंवा "तवसळी" करतो तसाच प्रकार दिसतो आहे.

कृती: वाळुक अर्थात तवसं किसून त्यांत गूळ व किंचित मीठ घालून शिजवायचे. तांदळाचा रवा तुपावर भाजून घ्यावा, जसा शिर्‍यासाठी गव्हाचा रवा भाजतो तसा... गूळ वितळला की हा भाजलेला रवा त्यांत साधारण मिश्रण सरसरीत राहील इतपत मिसळावा. काजूच तुकडे त्यांत मिसळावे.

नंतर एका जाड बुडाच्या पसरट (कुकरमधल्या भांड्यांसारखी, त्याला पुर्वी 'लंगडी' म्हणत असत)भांड्याला तुपाचा हात लावून हे मिश्रण एखाद्या हळदीच्या पानासकट वरखाली आच करुन भाजावे. माझी आजी चुलीवर भांडे ठेऊन वरती झाकणावर निखारे ठेवत असे.

असंच फणसाचं धोंडस करतात. त्यात हळदीची पानं घालत नाहीत. मनुस्विनीने फणसाचे सांदणमध्ये कृती दिली आहे बघ.

पातोळ्यापण तुला माहीत असतीलच, थोडाफार असाच असतो प्रकार.


Prady
Thursday, August 17, 2006 - 12:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या एका GSB मैत्रिणी कडे मी असाच काहिसा प्रकार खाल्ला होता. त्यात ओलं खोबरं पण होतं घातलेलं

Lalitas
Thursday, August 17, 2006 - 12:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रज्ञा, ओलं खोबरं घालतात... कधी कधी खोबर्‍याचे तुकडे घालत.

by the way मी GSB च आहे

Surabhi
Thursday, August 17, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन छान व थोडासा पातोळ्यासारखा प्रकार वाटतोय हा.
ललीता तुम्ही लिहीले तसेच लाल भोपळ्याचे पण "धोंडस" करतो आम्ही. पण त्यात गव्हाचा रवा घालून बेक करतो आणी ते पण रिंग च्या भांड्यात ज्यात खाली वाळू भरलेली चकती ठेवतात ना त्या केक च्या भांड्यात. बांगड्याचे हुग्गे पण त्यातच.


Dineshvs
Thursday, August 17, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ललिता, लंगडी पण ईतिहासजमा झाली का आता ?
आता काकड्या बघितल्या कि आठवण येणार तुम्हा सगळ्यांची.


Lalu
Thursday, August 17, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा गजानन, छान लिहिलीस की रेसिपी. :-) बरेच दिवसानी 'वाळूक' शब्द पाहिला. कोल्हापुरात मिळतात वाळकं. तिकडे तर कधी काकडीलाच वाळूक म्हणतात.

Seema_
Thursday, August 17, 2006 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन मस्त आहे recipe.
पण तुम्ही जे वर्णण करता आहात वाळुकच ते म्हणजे 'चिबुड' ना ?.
वाळुक म्हणजे काटेरी काकड्या ना ? बरोबर ना लालु ?
त्या चिबुड सारखाच वास असलेल पण भोपळ्यासारख दिसणार mexican squash मी परवा farmer's market मधुन आणलेल . बरीचशी चव तशीच होती .


Lalu
Thursday, August 17, 2006 - 7:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काटेरी काकडी म्हणजे वाळूक, बरोबर. चिबुड गोल असतं ना? म्हणजेच 'बंपार' का? मला नाही आठवत नक्की.

Bee
Friday, August 18, 2006 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे काहीतरी वेगळचं चाललयं.. इतके वेगळे प्रकार.. वेगळी माहिती.. सगळं काही वेगवेगळचं :-)

गजानन, तुला पण रांधता येतं कां? कृती छान लिहिली आहे पण असे प्रकार कुणी करताना बघितल्याशिवाय करता येणे महाकठिणं आहे. त्याला लागणारे ingradient पण कुठे मिळण्याची सोय नाही. ती काबाडकष्ट करुनच जमवावी लागतं असणार.. देशाबद्दलच मी लिहित आहे. परदेशात तर विचारही करू नये. हळदीची पाने, फ़णसाची पाने, अळूची पाने.. इथे कुठे मिळतील!!!!


Gajanandesai
Friday, August 18, 2006 - 12:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

:-)
सीमा, हे चिबुड नाही. वाळूकच. (काय पण एका एका चीजेची आठवण काढताय..:-)) चिबुड पिकल्यावर पपईसारखे तसेच खातात तशी या वाळकाला चव नसते. चिबडाचे पण पदार्थ करतात का?
लालू, 'कडाकण्या'ची रेसिपी लिही ना. की इथे आधीच लिहिलेली आहे? हे दोन्ही पदार्थ विजयादशमीच्या नैवेद्याला करतात ना?


तुला पण रांधता येतं कां<<<
बी, नाही हो पण वेळ आली तर कसले-बसले प्रयोग करून बघतो. ते निस्तरता निस्तरता लागलेली भूक पण पळून जायची पाळी येते कधी कधी.

ललिता, 'धोंडस'च्या रेसिपीबद्दल धन्यवाद.



Lalitas
Friday, August 18, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही चिबूड घालून गूळ-रसाचे पोहे करतो.

नारळाचा जाड रस काढून घ्यावा त्यांत गूळ विरघळावा, थोडेसे पिकलेले चिबूड बारीक चिरून त्यांत मिसळावे. किंचित् मीठ घालावे.

ज्या प्रमाणांत रस असेल त्याप्रमाणे अंदाजे जाड पोहे धुऊन त्यांत मिसळावे.

पोहे, रस किंवा गूळ किती प्रमाणांत घ्यावे हे मी सांगू शकत नाही.. आजपर्यंत हा पदार्थ अंदाजानेच केलेला आहे!


Rachana_barve
Friday, August 18, 2006 - 6:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wow GD मी हा पदार्थ खाल्ला आहे. आणि फ़णसाच्या पानातलाच :-) अजून सांग ना रेसीपीज फ़र्मायीशी करायला बर पडेल :-)

Prajaktad
Friday, August 18, 2006 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ग़जानन मस्त रेसिपी!सध्या फ़क़्त वाचुनच समाधान..
" कडाकण्यांचा " फ़ुलोरा नवरात्रित बांधतात ना!


Aandee
Sunday, August 20, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन आपल्या जुन्या 'रेसिपी' सगळ्याच्या ध्यानात आहेत आणि त्या करुन बघाव्याशा वाटतात त्यावर चवीष्ठ चर्चा होतात बर वाटल ललिता तुम्ही चिबुडाच्यारसात पोहे करता तसे तवसाच्यारसातही पोहे करतात त्यात आल्याचा रस किवा सुठ घालतात.

Dineshvs
Sunday, August 20, 2006 - 1:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालु बंपार म्हणजे पपनस, मोठ्या मोसंबीसारखे असते. आतुन गुलाबी असते.
कडाकण्या नवरात्रात करतात. नावाप्रमाणेच कडक असतात.


Manuswini
Friday, September 01, 2006 - 10:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा माझा अतीशय fav पदार्थ

आम्ही गोव्याला त्याला 'पातोळे' म्हणतो आणी आई तरी नेहमी हळदीची पाने वापरायची
काय सुवास पसरतो घरात उकडत असताना

आणी आम्ही 'तवसं म्हणतो बाकी लोकांसाठी ही मोठी काकडी वगैरे असेल.

गौरि गणपतीत हम्खास कधीतरी आजी खास हळदीची पाने पाठवायची आणी आई करायची.एक विसरले आई ओले खोबरे पण टाकते त्यात


i miss all this छ्या काय life आहे हे यार *** .........

मनासारखे अंम्बे,फणस, साठंण,साठं नाही मिळत इथे


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators