|  
Psg
 
 |  |  
 |  | Wednesday, August 16, 2006 - 7:11 am:    |  
 
 
 |   
  |   
 साहित्य: १ वाटी तूरीची डाळ, फ़ोडणीचे साहित्य, कढीपत्ता, तिखट, चिंच, गूळ, कोथिंबीर, पाणी    कृति: डाळ धूवून एक तास भिजत ठेवावी.  cooker  मधे २ शिट्ट्या करून शिजवून घ्यावी.  cooker  होईपर्यंत अर्धी वाटी पाण्यात थोडी चिंच भिजत घालावी.  cooker  झाला की डाळ बाहेर काढून चांगली घोटावी, एकसारखी करावी. पातेल्यात/ कढईत नेहेमीसारखी फ़ोडणी करावी, त्यात कढीपत्ता घालावा, मग डाळ घालावी आणि एकत्र करावे. भिजवलेल्या चिंचेचा कोळ काढावा. म्हणजे चिंच पाण्यात कुस्करावी. तिचा गर पाण्यात उतरेल. चिंच बाहेर काढावी आणि हा कोळ डाळीत घालावा. मग डाळ हलवून घ्यावी. जितकी  consistency  हवी तितके पाणी घालावे. नीट  mix  झाले की मीठ, तिखट, काळा मसाला आणि गूळ (थोडा जास्त) घालावा. १ उकळी आली की आच मंद करावी, २ मि. ठेवून बंद करावे. वरून कोथिंबीर घालावी.    असेल तर ओले खोबरेही घालता येते. ही टीपिकल आमटीची कृती आहे. गरम गरम मस्त लागते   
 
  |  
 
 | 
|  हितगुज गणेशोत्सव २००६   | 
 | 
 
  | 
 | 
 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
 
 
 |