|
Dineshvs
| |
| | Thursday, July 06, 2006 - 4:32 pm: |
| 
|
रताळ्याच्या करंज्या. १२ ते १५ करंज्या होतील दिड नारळ खोवुन त्यात तेवढीच साखर वा गुळ घालुन मोदकाच्या सारणाप्रमाणे घट्ट शिजवुन घ्यावे. त्यात काजुचे तुकडे घालावेत. एक किलो रताळी ऊकडुन सोलुन कुस्करुन घ्यावीत. दोर असतील तर काढुन टाकावेत. त्यात दोन वाट्या कणीक मिसळावी व मऊसर मळुन घ्यावे. चिमुटभर मीठ घालावे. त्याचा लिंबाएवढा गोळा घेऊन खालीवर प्लॅष्टिक घालुन लाटुन घ्यावा. फार पातळ लाटु नये. मग त्यावर चमचाभर सारण ठेवुन, करंजीप्रमाणे घडी घालावी. कडा दाबुन घ्यावी. पॅनमधे तुप तापवुन त्या शॅलो फ़्राय कराव्यात. या प्रमाणात कणीक घातली तर त्या डीप फ़्राय करता येत नाहीत. विरघळतात. जर तश्या तळायच्या असतील तर जास्त कणीक घालावी लागेल. पण मग चव बिघडते. शॅलो फ़्राय करुनच त्या चांगल्या लागतात. दोन्ही बाजुने सोनेरी रंगावर परतुन घ्याव्यात. करायला जरा नाजुक प्रकार असला तरी चवीला छान लागतो.
|
|
| हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
| चोखंदळ ग्राहक |
 |
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
| पांढर्यावरचे काळे |
|
| गावातल्या गावात |
|
| तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
| आरोह अवरोह |
|
| शुभंकरोती कल्याणम् |
|
| विखुरलेले मोती |
|
|