Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मटाराच्या सालीची भाजी ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » मटार » मटाराच्या सालीची भाजी « Previous Next »

Dineshvs
Wednesday, July 05, 2006 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे जो दिल्ली मटार मिळतो, त्याची साले मांसल व गोड असतात, त्याची भाजी छान होते. पण त्या सालीवरचा पातळ पापुद्रा काढावा लागतो. तो तसा काढुन व देठहि कापुन, ओली मिरची, हिंग, जिर्‍याच्या फ़ोडणीवर त्या टाकायच्या. आणि शिजल्या कि वरुन ओले खोबरे, आणि मीठ घालायचे, वरुन कोथिंबीर पेरायची कि झाली. याला आपसुक गोड चव येते, त्यामुळे साखर घालावी लागत नाही. यात काहि मटाराचे दाणेहि घालायचे.
तिथे ज्या स्नो पीज मिळतात त्याचीहि अशी भाजी छान होते. कोवळ्या घेवड्याच्या शेंगाची, सुरती पापडीची भाजी पण चांगली होते. या दोन्ही भाज्यात, मिरची, कोथिंबीर, आले व ओले खोबरे वाटुन लावायचे. असे सगळे लावुन त्या कुकरमधे ऊकडल्या आणि वरुन फ़ोडणी दिली तरी चालेल. ऊकडताना, मसाल्यात वाटताना थोडे दहि घालावे.
या शेंगा मात्र नीट निवडुन घ्याव्या लागतात. उसावरचा घेवडा, बाजीराव घेवडा यांची पण अशी भाजी चांगली होते.
बाजीराव घेवडा म्हणजे अगदी रुंद आणि जांभळी कड असलेल्या शेंगा असतात. पण या फ़ार रुंद व मोठ्या असल्याने, त्या कापुन घ्याव्या लागतात.


Bee
Wednesday, July 05, 2006 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाजीराव घेवडा म्हणजे अगदी रुंद आणि जांभळी कड असलेल्या शेंगा असतात. पण या फ़ार रुंद व मोठ्या असल्याने, त्या कापुन घ्याव्या लागतात.

>> मला खूप दिवसांपासून ही शेंग कुठली हे इथे विचारायचे होते. दिनेश धन्यवाद. ही वेल माझ्या घरी होती. आम्ही तिला कुयरीची शेंग म्हणायचो. दिनेश ह्या शेंगांची भाजी कशी लागते चवीला आणि करायची कशी? तुमचे ज्ञान खरच दिव्य आहे. एक crash course conduct करा खरच आमच्यासाठी..

Sampada_oke
Wednesday, July 05, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्यवाद दिनेशदा. आत्तापर्यंत केवळ सूपमध्येच ह्या शेंगा घालत होते, आता भाजी करून सांगेन कशी झाली ते.
घेवड्याच्या नाहीत पण इथे अजून एका प्रकारच्या शेंगा मिळतात, त्या चांगल्या हातभर लांब असतात, दाणे कसे असतात माहित नाही, कधी आणल्या नाहीत, आता आणून सोलून बघते आणि सांगते.:-)


Dineshvs
Wednesday, July 05, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee या घेवड्याचा आकार मोठा असला तरी दाणे छोटे असतात. ( म्हणुन बाजीराव म्हणतात वाटतं ) या शेंगा चिरुन काळा मसाला घालुन भाजी छान होते. मी या अर्धवट ऊघडुन त्यात बेसन भरुन ऊकडतो आणि मग तेलात खरपुस तळुन घेतो.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators