Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 22, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » मसाले » मसाले » Archive through May 22, 2006 « Previous Next »

Moodi
Monday, November 28, 2005 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही आर्च, त्याची कडवट चव येत नाही. पण माझ्या नवर्‍याच्या सुचनेनुसार मी आधीच काढते. ते आम्ही मटणातही वापरतो. मी नॉनवेज खात नसल्याने गरम मसाल्याची माहिती नव्हती. त्यामुळे आता कधी कधी अक्खा मसालाही तेलात परतुन राहू देते. म्हणजे फक्त वेलदोडा, चक्रीफुल, तमालपत्र, लवंग़ अन मिरे.

Priya
Monday, November 28, 2005 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, मी नाही काढत, ठेवते तसेच भाजीत.

Asawari
Monday, November 28, 2005 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा इतक्या सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. मी काल वॉलमार्ट मध्ये आणि एक मसाला बघितला. मिरीच्या दाण्यांसारखेच दिसत होते आणि त्यावर लिहिले होते त्यात तीन चार प्रकारच्या मसाल्यांची संमिश्र चव आहे म्हणून. आता ते पण एकदा आणून बघणार आहे. सध्या मी आणि माझा नवरा थाइ फ़ूडच्या प्रेमात पडलो आहोत तेव्हा लेमन ग्रास आणि kaafir lime leaves पण कुठे मिळतील बघायचे आहे

Seema_
Monday, November 28, 2005 - 10:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

farmer's market जस कि sprout असेल तुमच्याकडे तर किंवा whole food market मध्ये मिळत lemon grass .

Rachana_barve
Monday, November 28, 2005 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks चक्रीफ़ुलाच्या माहितीबद्दल. माझ्याकडे ते २ पिशव्या पडल आहे. मैत्रीणीने आणून दिल आणि फ़ेकवत नाही म्हणुन तसच राहिलेल. आता try करून बघेन

Dineshvs
Tuesday, November 29, 2005 - 1:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आसावरी ते ऑल स्पाईस. त्याला लवंग, दालचिनी, वेलची आणि मिरे अश्या चार मसाल्यांचा वास येतो. व्यक्तिगणीक हि यादी बदलत जाईल. आपल्याकडे होते लागवड याची. पण ऊपलब्ध असतील तर हे चार मसाले वापरावेत.
रचना, बटाट्याच्या रस्सा भाजीत चक्रीफ़ुल छान स्वाद देते.

काफ़िर लाईमची पाने हि दोन भागात असतात. म्हणजे मधला काहि भाग देठासारखा अस्तो. याला लिंबे पण लागतात पण ती अगदी छोटी असतात. त्यात अजिबात रस नसतो. याची पानेच वापरतात. माझ्या माहितीप्रमाणे ताजी पाने यु. एस. मधे आणायला परवानगी नव्हती.


Shonoo
Tuesday, November 29, 2005 - 1:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काफ़िर लाइम ची पाने चायना टाउन मधे मिळ्तील-जर ही पाने नाही मिळाली तर लाइम झेस्ट्- हिरव्या लिम्बांची साल- चालू शकते.

Moodi
Thursday, March 02, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाट मसाला

सा : 65 gm जीरे, 65 gm काळे मिरी, 60 gm काळे मीठ, 30 gm सुका पुदिना, 5 gm ओवा, 5 gm हिंग, 60 gm साधे मीठ, 20 gm सुंठ पावडर, 20gm मिर्ची पावडर, 150 gm आमचूर.

कृती : आमचुर, मीठ अन सुंठ सोडुन बाकी सर्व साहित्या मिक्सरमधुन बारीक करावे. अन उरलेले त्यात घालावे. सर्व कोरड्या चमच्याने एक करावे. अन हवाबंद डब्यात भरावे.

योग्य त्या प्रमाणातच मसाला वापरावा. अन्यथा पदार्थ बिघडेल.


Moodi
Thursday, May 11, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केशरी दुधाचा मसाला.

साहित्य : २५ ग्रॅम बदाम, २५ ग्रॅम पिस्ते, १० वेलदोडे, अर्धे जायफळ, थोडी जायपत्री, थोडे केशर.

कृती : सर्व एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक पुड करावी व आयत्या वेळी गरम दुधात साखर अन थोडा यातील मसाला टाकुन द्यावे.


Shonoo
Monday, May 22, 2006 - 12:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी उत्तर अमेरिकेत घरी गोडा मसाला केला आहे का? इथे करता येण्यासारखी रेसिपी आहे का?
आई किंवा सासूबाई नाहीत, खलबत्ता नाही, ग्रॅम, किलोग्रॅम अशा वजनात सामान मिळत नाही, माझ्याकडे स्वैपाकघरात वापरायचा वजनाचा काटा ही नाही, या सर्व constraints वर तोडगा असलेली आणि tried and tested रेसिपी असेल तर वेळ आणि श्रम तर वाचतीलच शिवाय डोकं शांत राहून इ.इ.


Moodi
Monday, May 22, 2006 - 12:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोडा / काळा मसाला.

साहित्य : २ वाटी धणे, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी सुके खोबरे कीस, प्रत्येकी १ मोठा चमचा लवंग, काळी मिरी, वेलदोडे, ८ ते १० मसाला वेलच्या, २ चमचे दालचिनी तुकडे, ५ ते ६ तमालपत्रे, १ चमचा दगडफूल, अर्धा चमचा नागकेशर, अर्धे जायफळ, अर्धा चमचा जायपत्री, हिंग, २ चमचे हरबरा डाळ, २ चमचे खसखस, २ चमचे जीरे, तेल.

कृती : थोड्या तेलावर हिंग टाकुन सर्व मसाले परतुन बाजुला काढुन ठेवावे. शेवटी खसखस, खोबरे अन तीळ भाजुन परतुन मग सर्व एकत्र करुन मिक्सरमध्ये बारीक करावे.

शोनु वाटल्यास याच्यात तीळ अन खोबरे, जायपत्री नाही घातले तरी चालेल, कारण नंतर या मसाल्याला तेल सुटु शकते.

अन तिखट अंदाजाने हवे तेवढ्यात मिसळुन हलवुन घे. ओला हात लागु द्यायचा नाही.

अजुन कृती देतेच.


Moodi
Monday, May 22, 2006 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही दुसरी कृती.

साहित्य : ४०० ग्रॅम धणे, ३०० ग्रॅम तीळ, अर्धा किलो सुके खोबरे, १०० ग्रॅम जीरे, ५० ग्रॅम काळी मिरी, २५ ग्रॅम सुकी लाल मिर्ची, ५ ग्रॅम लवंग, ५ ग्रॅम, दालचिनी, २ हळकुंडे.

कृती : सर्व साहित्य थोड्या तेलात एकेक करुन भाजुन घ्यावे. सुके खोबरे कोरडे भाजले तरी चालेल. अन सर्व मसाले गार झाले की मग एकत्र करुन मिक्सरम्धुन काढावे. चांगले चाळुन हवाबंद डब्यात भरावे.

शोनु दालचिनी, मिरे, जीरे हे अंदाजाने घेतलेस तरी चालेल.


Moodi
Monday, May 22, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गरम मसाला.

साहित्य : २०० ग्रॅम जीरे, ६० ग्रॅम धणे, ५० ग्रॅम मोठी वेलची, ५० ग्रॅम सुंठ पावडर, १ इंच दालचिनीचे साधारण १० ते १५ तुकडे, १५ ते २० ग्रॅम लवंग, २० गरम जायपत्री, २० ग्रॅम तेजपान, 1 1/2 जायफळ.

क्रुती : सर्व साहित्य थोडे थोडे गरम करुन मिक्सरमधुन बारीक करुन, चाळुन गार झाले की हवाबंद डब्यात भरावे.

हा गरम मसाला मटणाकरता चालेल.


Moodi
Monday, May 22, 2006 - 1:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु तुला Indian किंवा asian stores मध्ये १०० ग्रॅम वगैरे अशा वजनात धणे जीरे याची पाकिटे मिळत नाहीत का?

कारण वरील मसाल्यात जरी ग्रॅममध्ये लिहीलेल असले तरी आपण घरी अंदाजाने वाटी, टेस्पुन असे पण प्रमाण घेऊ शकतो की.


Shonoo
Monday, May 22, 2006 - 1:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी:
इतक्या लगेच लिहिल्या बद्दल धन्यवाद. इथे मसाल्याचे सामान पाउंड आणि आउंस च्या हिशेबात मिळते.
टी स्पून,टेबल्स्पून आणि त्याचे सर्वसाधारण ग्रॅम यांचे कोष्टक good housekeeping च्या पुस्तकात आहे ते मी वापरते. सन्जीव कपूर किंवा तत्सम इतर रेसिपी करत ते कोष्टक उपयोगी पडतय. पण गोडा मसाला करायला जरा व्यवस्थित प्रमाण असावे असे वाटते.

वाट्या म्हणाव्या तर माझ्याकडे १५० मि.ली. पासून ते पार ३७५ मि.ली. पाणी मावेल येवढ्या वाट्या आहेत. आई भारतात वजनाच्या हिशेबाने करत असे. पण तिला मापांचा अंदाज आहे त्यामुळे तिने इथे सुद्धा त्या अन्दाजाने वाटी व चमचा वापरून मसाला केला आहे. पण मी मूढमती- तेंव्हा पाहून किंवा लिहून ठेवले नाही. तर वाटी म्हणजे साधारण किती मोठी घ्यावी? इथल्या कप सारखे वाटी ला काही standard आहे का?

ताबडतोब उत्तर लिहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.


Moodi
Monday, May 22, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू तू म्हणतेस ते बरोबर आहे, माझा पण इथे जरा गोंधळ होतो. पण मी आता स्टीलच्या चमच्यांचा वेगळा पॅक आणलाय त्यात वेगवेगळे प्रमाण बसेल असे चमचे आहेत. दुसरे म्हणजे मी भात लावण्याकरता जो प्लॅस्टीकचा कप वापरते त्यावर साधरण 140 ml म्हणजे 3/4 कप असे लिहीलेय म्हणजे 160 ml ला तो कप पूर्ण भरतो. अन तो कप म्हणजे आपल्याकडे भारतात मोठ्या आकाराची स्टिलची वाटी असते ना तेवढा आहे.

अजुन कुणी मसाला बनवलाय का ते बघु.


Priya
Monday, May 22, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, मूडी - मी नेहमी गोडा मसाला घरीच करते. माझे प्रमाण खाली देते आहे. अर्थात, या मसाल्याचे प्रमाण प्रत्येक घरचे वेगळे असु शकते. मी, माझी आई आणि माझ्या सासुबाई - आमचा तिघींचाही थोडा थोडा वेगळा असतो.

वाटी म्हणजे साधारण आपली रोजच्या जेवणामधील आमटीची वाटी. साधारणपणे सहा वाट्या म्हणजे एक किलो धरण्याइतपत वाटी मी धरली आहे.

साहित्य : चार वाट्या धने, एक वाटी खोबर्‍याचे तुकडे किंवा खोबरे किसून घेतले तर दीड वाटी, अर्धी वाटी तीळ, पाव वाटी जिरे, तीन चमचे शहाजिरे, एक चहाचा चमचा लवंगा. दालचिनीचे बोटभर लांबीचे २ - ३ तुकडे, दोन चमचे हिंग, तमालपत्राची ५ - ६ पाने, एक चमचा हळदपूड, एक चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथीदाणे, अर्धी वाटी, तिखट, दोन टेबलस्पून मीठ, मसाले परतून घेण्याइतपत तेल.

तीळ कोरडे भाजून घ्यावेत. खोबर्‍याचे तुकडे असतील तर किंचीत तेल घालून भाजून घ्यावेल. कीस असेल तर कोरडाच भाजावा. नंतर थोड्या तेलात अनुक्रमे लवंगा, दालचिनी, जिरे, शहाजिरे, तमालपत्र, मेथी, मोहरी आणि घने भाजुन घ्यावेत. हिंग पूड असेल तर धने भाजताना त्यातच घालावी. हिंगाचा खडा असेल तर मात्र सुरुवातीलाच तो तेलात भाजुन घ्यावा.

तीळ आणि खोबरे वेगळे कुटुन घ्यावे कारण दोन्हीला तेल सुटते आणि ते लक्षात घेऊन या दोन्ही गोष्टी कुटाव्या लागतात. बाकीचे सगळे साहित्य एकत्र कुटले तरी चालते. सगळे कुटून झाले की त्यात हळद, तिखट आणि मीठ घालुन नीट मिसळावे. हे सर्व परत एकदा कुटावे म्हणजे मसाला बारीक होतो आणि नीट मिसळला जातो. कोरड्या बरणीत खाली थोडे मीठ भुरभुरावे आणि मसाला भरावा. भरताना घट्ट दाबुन भरावा म्हणजे आत हवा रहात नाही आणि टिकतो चांगला. ज्या बरणीत भरायचा त्याचे झाकण घट्ट असावे, बरणी अगदी कोरडी असावी. रोजच्या वापरासाठी मिसळण्याच्या डब्यात काढुन घ्यावा. स्वयंपाक करताना मध्येच त्या हाताने मसाल्याची बरणी हाताळू नये. बरणी उन्हापासून दूर, बंद कपाटात ठेवावी.

चार वाट्या धन्यांचा तसा बराच मसाला होतो. पण वर दिलेले पथ्य पाळले तर खराब होत नाही.

शोनू - मी दिलेले सगळे प्रमाण वाटी - चमच्याच्या हिशोबात आहे त्यामुळे आता मोजून घ्यायचा प्रश्न सुटेल. आणि खलबत्ता मीही वापरत नाही, मिक्सरमध्येच बारीक करते.


Moodi
Monday, May 22, 2006 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया thanks ग. माझा मसाला संपलाय आता करावा लागेलच. पण तीळ फार बारीक नाही करायचे ना? की केले तर चालेल? मागे मी खोबरे किस सुद्धा चुकुन जास्त तेलात परतला त्यामुळे मसाला खराब झाला. पण आता हे सर्व लक्षात ठेवते.

आमच्या इथल्या पाकी दुकानात तर अख्ख्या गरम मसाल्याचे तयार पाकिट मिळते सर्व मापासकट, फक्त घरी आणुन भाजुन दळायचे इतकेच.


Priya
Monday, May 22, 2006 - 3:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, नाही गं, तीळ फार बारीक केले तर फारच तेल सुटते. आणि मसाल्याची साहित्य भाजायला कढई जास्त बरी पडते तिच्या आकारामुळे. मी एकदम बरेच तेल घालत नाही. अगदी थोडे थोडे तेल घालून भाजते. नाहीतर पहिल्यांदा भाजलेल्या गोष्टी जास्त तेलकट राहतात.

इकडेही गरम मसाल्याच्या साहित्याचे तयार पाकीट मिळते. पण आपण तसे वापरले तर सगळे साहित्य ते देतात त्या प्रमाणात वापरावे लागते. आणि त्यांची पाकिटे किती मोठी असतात! त्यापेक्षा आपली आपण कमी प्रमाणात करुन ठेवू शकतो.


Moodi
Monday, May 22, 2006 - 3:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो बरोबर आहे ग, तीळ जास्त बारीक झाले तर तेलकट तर होतातच अन मिक्सरच्या भांड्याला पण चिकटुन थर बसतो त्याचा.
ते पाकिट नाही आणले मी कधी कारण खरच जवळजवळ ७ ते ८ माणसे घरात असतील तर त्यांच्यासाठी बरे आहे ते. भारतात ठीक आहे हे प्रमाण.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators