Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
आलू टिक्की

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » आलू टिक्की « Previous Next »

Dineshvs
Wednesday, April 12, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिल्लीकरांचा खास आवडता प्रकार हा.

पाव किलो बटाटे ऊकडुन घ्यावेत. बटाटी ऊकडताना जर पाण्यात मीठ घातले तर ते चिकट होत नाहीत. ऊकडुन फ़्रीजमधे दोन दिवस ठेवले तरी चिकटपणा जातो. पण काहि बटाटे, खास करुन नवीन बटाटे खुपच चिकट असतात, ते घेऊ नयेत.
तर हे ऊकडलेले बटाटे ऊकडुन कुस्करुन घ्यावेत. पावाच्या दोन स्लाईसच्या कडा काढुन तो कोरडाच मिक्सरमधुन फ़िरवावा. पाव शिळा असावा. हा चुरा बटाट्यात मिसळावा. त्यात मीठ घालून हलक्या हाताने मळावे. व त्याच्या चपट्या टिक्कि कराव्यात.
तेल तुप सोडुन दोन्ही बाजुने सोनेरी करुन घ्याव्यात.
मग त्या जरा कुस्करुन वरुन, ताजी जिरेपुड, काळे मीठ, लाल तिखट, चाट मसाला, व दहि घालुन खावे. हवा असेल तर कांदा घ्यावा.
वेळ असेल तर या टिक्कीत, हिरवे मटार आले मिरचीवर परतुन, जरा ठेचुन त्याचे सारण घालता येईल. पण सहसा ती सारणाशिवायच खातात.


Bee
Wednesday, April 12, 2006 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुम्ही कुठला चाट मसाला वापरता. बादशहाचा चाट मसाला चांगला असतो का? वरची कृती खूप छान आहे.

Dineshvs
Wednesday, April 12, 2006 - 5:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बादशहाचे मसाले चांगलेच असतात. पण हे मसाले आपण वारंवार वापरत नाही त्यामुळे टिकण्याच्या दृष्टीने ते फ़्रीजमधे ठेवणे चांगले.
सुंठ, मिरी, आमचुर, जिरे, ओवा, काळे मीठ एकत्र करुन मी घरिहि हा मसाला करतो, तो अर्थातच जास्त चवदार असतो.


Chandrakor
Friday, April 14, 2006 - 12:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश धन्यवाद. तुमच्या रेसिपीज आणि सूचना देखिल नेहेमीच छान असतात.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators