|
Savani
| |
| | Monday, March 20, 2006 - 2:37 am: |
| 
|
मला वाल वापरून जो बिरडं भात करतात त्याची रेसिपी हवी होती. बीबी चे नाव देवनागरीत कसे लिहायचे?
|
वालाची खिचडी / बिरडे भात / वालाचा भात / वालाची सोजी वगैरे वगैरे मोड आणलेल्या सोललेल्या कडव्या वालांना आलं-लसूण्-जीरे याची गोळी वाटुन चोळुन ठेवावी. तेलावर फोडणीस एखादी लवंग, दालचिनीचा तुकडा फोडणीस टाकुन त्यावर चिरलेला कांदा घालावा. २-३ मिनिटे परतून त्यावर हे वाल टाकावेत. हळद, तिखट, मीठ घालून जरासा गरम मसाला घालून परतणे. धुतलेले तांदूळ टाकावेत. एखादा गुळाचा खडा घालून नेहमीप्रमाणे शिजवावे. वाढायला घेताना खोबरं कोथिंबीर घालावी. variations १. फोडणीस लवंग दालचिनी न घालता जीरे, हिंग, कढीपत्त्याची २-३ पाने. बाकी पद्धत वरीलप्रमाणेच २. तळला मसाला ( लवंग्-दालचिनी-कांदा-खोबरं-धणे-एक वेलची अस तव्यावर एकामागून एक असे परतून वाटणे) याची गोळी घालावी. मग गरम मसाला पावडर घालू नये. नारळाचे दूध शिजताना घालावे. बाकी वरील प्रमाणेच.
|
हा भात शक्यतो कडव्या वालाचाच करावा.
|
|
| हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
| चोखंदळ ग्राहक |
 |
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
| पांढर्यावरचे काळे |
|
| गावातल्या गावात |
|
| तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
| आरोह अवरोह |
|
| शुभंकरोती कल्याणम् |
|
| विखुरलेले मोती |
|
|