Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Varshaachee saathvan

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » वाळवण, साठवण आणि आठवण » साठवण » Varshaachee saathvan « Previous Next »

Savani
Thursday, March 09, 2006 - 2:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी गेल्या वर्षी भारतातुन बरेच तिखट आणि हळद आणली. पण मल कळत नाहिये कि इकडे मी ते कसे store करु. काही टीप्स असतिल तर प्लीज सुचवा. मागे इथे एकदा माझ्याकडच्या चणा डाळीला सुद्धा किडे झाले होते. तर कशा पद्धतीने साठवण करावे?

मॉड, तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे हा मेसेज हलवला तरी चालेल. नवीन thread सुरु करण्याचे एवढेच कारण की कुठे असा विषय दिसला नाही.


Nalini
Thursday, March 09, 2006 - 5:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी लाल तिखट, हळद, मसाले हे काचेच्या बरणीत ठेवायचे आणि त्यात तिन चर बिबवे टाकुन ठेवायचे. अजिबात खराब होत नाहित.
डाळीबाबत ईतर जाणकार सांगतिलच.


Deemdu
Friday, March 10, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तिखट, हळद, मसाले हे काचेच्या बरणीत थेवायचे आणि बरणीत ठेवताना खाली थोडे मीठ किंवा खडेमीठ पसरायचे

अगदी चिक्कार टिकतात.

तसच डाळी किंवा कडधान्ये जरा बोरीक पावडर लावुन ठेवले तर त्यांनाही अजिबात किडा मुंगी लागत नाही


Psg
Friday, March 10, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, मला माहीत नाही तुला शक्य आहे का, पण डाळीला कडक ऊन दाखव आणि मग भर. सध्या तिकडे थंडी असेल, पण summer मधे possible असेल तर बघ. तसच चणा डाळ ही जास्त लागत नाही, तर थोडीच आण. तसच एरंडेल तेलही लावतात, but i'm not so sure सहज मनात आल, उन्हा ऐवजी microwave मधे गरम केली तर काय होईल? कोणी करू नका, मी सहज म्हणतिये!! :-) केलत तर मी जबाब्दार नाही हं :-)

Bee
Friday, March 10, 2006 - 8:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Psg चा सल्ला मलाही पटतो. कडधान्याला उन द्यायचे आणि त्यात कडूनिंबाचा पाला घालायचा. त्यामुळे किडे होत नाहीत. आम्ही लहान असताना राखणदार म्हणून नेमले जायचो. इतके boring काय असायचे ते.

Charu_ag
Friday, March 10, 2006 - 5:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावनी, कडधान्याला किड लागण्याच मुख्य कारण म्हणजे त्यातील पाण्याचा अंश. कितीही प्रयत्न केला तरी कडधान्ये पुर्ण कोरडी करता येत नाहीत. पण शक्य तेवढी कोरडी करुन त्याला किड लागण्याचा कालावधी लांबवता येऊ शकतो.
कडु निंब किडनाशक असल्याने त्याचाही चांगला उपयोग होतो.
डाळीला ऊन देण्यामागे, तांदळात मिठाचे खडे टाकण्यामागे ही हेच कारण असते. पण परदेशत हे दोन्ही उपाय करता येतीलच अस नाही.
मग उपाय काय?

तव्यावर भाजणे हा एक उपाय होऊ शकतो, पण त्यामुळे चव बदलते.
हॉट एअर ओवन मध्ये पन्नास डिग्री सेल्सिअस तपमानाला कडधाअन्ये ५ ते ६ तास जर ठेवली तर बर्‍यापैकी पाण्याचा अंश कमी होतो आणि डाळी खडख्डीत होतात. लवकर खराब होणार नाहीत.

तांदुळ मात्र चुकुनही उन्हात ठेऊ नयेत.

पूनम, microwave मध्ये जर डाळ वळवायला ठेवली तर, करपतील असा माझा अंदाज आहे.


Psg
Saturday, March 11, 2006 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी गंमत केली ग, कोणीच तस करणार नाही.. पण microwave मधे साधे साधे पदार्थही करतात, तर हे हीट करायला काय हरकत आहे अस उगाचच एक विचार मनात आला :-)
असो, पण ती oven ची idea छान आहे! try करू शकतो


Savani
Monday, March 20, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळ्याना धन्यवाद. छान माहिती दिल्याबद्दल. मी काल २ मोठ्य्या काचेच्या बरण्या आणुन त्यात तिखट हळद भरून ठेवले.
मी जिथे राहते तिथे अजूनही बर्फ़ पडत आहे त्यामुळे डाळीना उन्हं दाखवणे शक्य नाही. पण समर मधे करीन.


Prr
Thursday, November 01, 2007 - 5:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सगळे मसाले freeze मध्ये ठेवले आहेत. आणी ते आता ५ महिन्यापर्यन्त तरी नीट आहेत.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators