Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
भरल्या हिरव्या मिरच्या ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » भरल्या हिरव्या मिरच्या « Previous Next »

Dineshvs
Friday, March 03, 2006 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भरल्या हिरव्या मिरच्या.
४ जणांसाठी

ज्याना तिखट खायची सवय आहे, त्यानी नेहमीच्या मिरच्या घ्याव्यात. ज्याना फ़ार तिखट चालत नाही, त्यानी बाजारात जाड सालीच्या लांब सरळ मोठ्या मिरच्या मिळतात त्या घ्याव्यात. हल्ली पोपटी रंगाची छोटी मिरचि बाजारात मिळायला लागली आहे. ती मध्यम तिखट असते, पण चवीला छान लागते.
तर या सर्व मिरच्या १५० ग्रॅम घ्याव्यात. त्याना एकाच बाजुने ऊभी चिर देऊन थंड पाण्यात घालुन ठेवाव्यात.

तेल गरम करुन त्यात अर्धा टिस्पुन मेथी दाणे बदामी रंगावर तळुन घ्यावेत. त्यात अर्धा टिस्पुन मोहरी घालावी. मग हळद, धणे जिरे पावडर, हिंग घालावा. मग त्यात अर्धी वाटी बेसन खमंग परतुन घ्यावे. मग खाली ऊतरुन त्यात एका लिंबाचा रस, किंवा दोन चमचे आमचुर पावडर मिसळावी. त्यात थोडा गरम मसाला घालावा. हे मिश्रण पाण्यातुन निथळुन घेतलेल्या मिरच्यात भरावे.
दोन टेबलस्पुन तीळ गुलाबी रंगावर भाजुन घ्यावेत. एक चमचा खसखस भाजुन घ्यावी. अर्धा कप खोबरे किस गुलाबी रंगावर भाजुन घ्यावे. हे सगळे वाटुन घ्यावे. थोडे पाणी घालुन बारिक वाटावे.
परत तेल तापवुन त्यात जिरे, मोहरी व हिंग घालावे. एकादा दालचिनीचा तुकडा व एखादी वेलची पण घालावी. त्यावर मिरच्या परतुन घ्याव्या. मग त्यावर वाटण टाकावे. त्यावर लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ घालावा. ( तो कोळ व पाणी मिळुन साधारण कपभर असावे ) मीठ घालावे. आवडत असेल तर त्यात थोडा गुळ घालावा. तेल सुटेपर्यंत ऊकळावे.



Megha16
Thursday, June 08, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दा,

आज मी तुम्ही दिलेल्या रेसीपी प्रमाने भरली मिरची केली होती. एकदम झकास असा शब्द माझ्या आणी माझ्या नवरयाच्या तोंडातुन पहिला घास खाल्या बरोबर बाहेर लगेच आला. खुप छान झाली होती भाजी. माझ्या कडे खसखस नव्ह्ती तीळ खोबरे च घातले वाटून पन तरी ही स्वादिष्ट झाली होती भाजी.
Thanks
मेघा


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators