Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
राजस्थानी मेथी दाण्यांची भाजी ...

Hitguj » Cuisine and Recipies » भाज्या » राजस्थानी मेथी दाण्यांची भाजी « Previous Next »

Dineshvs
Friday, March 03, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपली मेथीदाण्यावरुन चर्चा चालली होती. तर हि आहे राजस्थानी मेथी दाण्याची भाजी. मी काहि फ़ेरफ़ार केले आहेत.

हे प्रमाण चार जणांसाठी आहे.
एक कप मेथीदाणे पाण्यात चार सहा तास भिजत घालावे. मग ते आधणाच्या पाण्यात टाकावेत. एक दोन ऊकळ्या आला कि गॅस बंद करावा. हे दाणे दोन तीन वेळा थंड पाण्याने धुवुन घ्यावेत. धुताना चोळु नयेत. ( मुळ कृतित दहा वेळा धुवायला सांगितले आहे, पण त्याने सगळाच कडवटपणा निघुन जातो. मला कडु चवीचे वावडे नसल्याने, मी एकदाच धुतले. आपापल्या चवीप्रमाणे ठरवावे ) मग हे दाणे पुर्णपणे निथळुन घ्यावेत.

अर्धा कप बेदाणे व अर्धा कप खारकेचे तुकडे तयार ठेवावेत. ( मुळ कृतित फ़क्त बेदाणे आहेत. )

दोन कैर्‍यांची साले काढुन तुकडे करुन ठेवावेत. ( मुळ कृतित ४ टेबलस्पुन आमचुर आहे. )

दोन कप पाण्यात, एक टिस्पुन हळद, दोन टिस्पुन लाल तिखट, दोन टेबलस्पुन धणे जिरे पावडर मिसळुन ठेवावे.

तेलाची फ़ोडणी करुन त्यात जिरे व हिंग घालावे. त्यावर कैरीच्या फ़ोडी परताव्या. ( आमचुर परतायची गरज नाही. ) त्या नरम पडल्या कि तयार केलेले पाणी ओतावे. ऊकळु द्यावे. मीठ घालावे, मोठा लिंबाएवढा गुळ व तेवढीच साखर घालावी.
ऊकळले कि बेदाणे व खारीक घालावी. जरा वेळ ऊकळले कि त्यात मेथीदाणे घालावेत. आणि मंद आचेवर तेल वेगळे होईस्तो ऊकळावे.
हि भाजी जरा निवली कि जास्त चवदार लागते.



Mahe
Wednesday, November 21, 2007 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा नमस्कार,
मी कालच ही मेथी दाण्यांची भाजी केली होती, छान झाली होती, फ़क्त गोड झाली होती. माझ्याकडे मेथी पाला भाजी मिळत नाही म्हणुन ह प्रकार सगळ्याना आवडला.. तुम्ही दिलेल्या रेसिपी छानच असतात! धन्यवाद!
भाग्यश्री


Dineshvs
Thursday, November 22, 2007 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्यश्री, छान वाटले. मेथीदाण्याचा आवर्जुन वापर आपण मराठी लोक, फारच कमी करतो. हा एक चांगला पर्याय आहे.
माझ्या पाककृति तश्या अनुभवातूनच लिहिलेल्या असतात. एकदा जमली कि पुढच्यावेळी आपापल्या चवीनुसार बदल करता येतात.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators