Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ब्रोकोलि आणि कॉर्न ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » ब्रोकोलि आणि कॉर्न « Previous Next »

Dineshvs
Sunday, February 26, 2006 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साधारणपणे पाश्चात्य पुस्तकात अश्या अनेक रेसिपी दिलेल्या असतात. पण आज देतोय हा प्रकार बराच सोपा आहे.

एक क्रीम स्टाईल स्वीट कॉर्नचा टिन फ़ोडुन घ्यावा. पॅनमधे थोडे लोणी गरम करुन त्यात आवडीच्या भाज्या परतुन घ्याव्या. मी ब्रोकोलि आणि कॉर्न घेतले. पण फ़्लॉवर, गाजर, वाटाणे, बटाटे, कोबी, फ़रसबी असे काहिहि घेता येईल. परत असताना त्यात मीठ, मिरिपुड व मिक्स्ड हर्ब्ज घालाव्यात. आता भारतात या बाटलीत मिळतात. सुकवलेल्या असल्याने, थोड्याच वापराव्यात.
भाज्या काढुन घेऊन त्यात पाऊण कप मैदा परतावा. थोडे आणखी बटर घालावे. त्यात अर्धा कप मिल्क पावडर घालावी. थोडे परतुन त्यात स्वीट कॉर्न घालावेत. मीठ, मिरीपुड, किंचीत जायफ़ळ पुड घालावी. थोडेसे पाणी घालुन हे छान मिसळुन घ्यावे.
परतलेल्या भाज्यांपैकी काहि तुकडे सजावटीसाठी ठेवुन, बाकिचे यात मिसळावेत. दोन चमचे किसलेले चीज घालावे.
नीट घाटुन जरा घट्ट होवु द्यावे. मग समपातळीत करावे. वरुन भाज्या लावाव्यात. आणखी थोडे चीज घालावे. चिलि फ़्लेक्स घालाव्यात व मंद गॅसवर घट्ट होईस्तो ठेवावे. खालच्या ऊष्णतेमुळे वरचे चीज वितळतेच, तरिहि आवश्यक वाटले तर ग्रील करावे.
मग टोस्टबरोबर खावे. मला हे मुड फ़ुड वाटते, कारण रंगसंगति व खमंग वास यामुळे बघायला आणि खायलाहि छान वाटते.
मैदा नको असेल तर कणीक वापरता येते. ब्रेड क्रम्स पण वापरता येतील.
फोटो माझ्या रंगीबेरंगीवर काहि दिवसांसाठी पोस्ट करतोय.


Princess
Monday, June 19, 2006 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय दिनेशजी,मी बंगलोरला राहते. ब्रोकोली मिळवण्याचा प्रयत्न मी केला होता पण इथे मिळाले नाही. कुठे मिळु शकेल?कसे दिसते? जर मुंबै हुन आणले तर किती दिवस टिकेल?
माझ्यासाठी ही माहिती अत्यावश्यक आहे कृपया मला उत्तर द्या. ब्रोकोली हे एक औषध म्हणुन मला वापरायचे आहे. धन्यवाद.
प्रिन्सेस


Sampada_oke
Monday, June 19, 2006 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिंसेस, ब्रोकोली अशी दिसते. Broccoli
भाजीबाजारात मिळायला हरकत नाही. मात्र फ़ारफ़ार तर ३- ४ दिवस करकरीत राहील, नंतर तिचे तुरे पिवळे होऊन मऊ होते, म्हणून घरी आणल्यावर लगेच फ़्रीजमध्ये ठेव.शक्यतो लगेच वापरत जा.

Princess
Monday, June 19, 2006 - 9:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स संपदा. आजच जाउन शोधेन पुन्हा (तू पाठवलेले चित्र प्रिंट करुन घेउन जाइन...:-))


Dineshvs
Monday, June 19, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिंसेस ब्रोकोली तिथे फ़्रोझन मिळु शकेल. मी तीच वापरतो. वरच्या पदार्थात पण फ़्रोझनच वापरलीय.
फ़क्त ती फ़्रीजरमधे ठेवायची काळजी घ्यावी लागते.
ताज्या ब्रोकोलिला भाजीवाले हिरवा फ़्लॉवर असेहि म्हणतात.


Sia
Tuesday, June 20, 2006 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिन्सेस बन्गलोर ला फ़ूड वल्ड आणि बिग बाज़ार मधे ब्रोकोली सहज मीळते

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators