Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
सब्जा = तुळस ? ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » सब्जा = तुळस ? « Previous Next »

Kiroo
Friday, January 27, 2006 - 6:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kÜNaI malaa saaMgaala ka ik sabjaacao baI Asato to qaMD Asato ik ]YNa.

Moodi
Friday, January 27, 2006 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किरू हे सब्जाचे बी थंड असते. म्हणुनच उन्हाळ्यात हे फालुद्यात वापरतात. याने पोटातील उष्णता कमी होते. पण हिवाळ्यात घेऊ नये.

Shyamli
Friday, January 27, 2006 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सब्जा म्हणजे तुळ्शिच बि,
तुळस उष्ण असते पण हे जे बि असत ते पाण्यात भिजवून दुधात घेतल तर थड असत. म्हणुन याच ऊपयोग उन्हाळ्यात जास्त करतात.


Chafa
Friday, January 27, 2006 - 7:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामलीचं बरोबर आहे. सब्जा म्हणजेच तुळशीचं बी असं मलाही वाटतं.

Moodi
Friday, January 27, 2006 - 7:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉरी चाफा मी स्वता बघितलय सब्जा अन घेतल पण आहे. याची पाने फार वेगळी असतात, तसे तुरे मात्र तुळशीसारखेच असतात. आता आश्विनीला बोलवा.

इथे बघा.

http://www.cuisinecuisine.com/IndianSpices.htm#S .

Kiroo
Friday, January 27, 2006 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sabjaa AaiNa tuLXaIca baI vaogavaogaLM AsatM. tuLXaIca baI baarIk Asat tr sabjaa qaÜDa jaaD AsatÜ.³qaÜDaÔar kaL\yaa tILasaarKa idsatÜ´ bar maga XaovaTI sabjaa qaMD ik ]YNa :-)

Chafa
Friday, January 27, 2006 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

When soaked in water the seeds of several basil varieties become gelatinous, and are used in Asian drinks and desserts such as falooda or sherbet. Such seeds are known variously as sabja, subja, takmaria, tukmaria, or falooda seeds. They are used for their medicinal properties in Ayurveda, the traditional medicinal system of India.

http://en.wikipedia.org/wiki/Basil

Moodi
Friday, January 27, 2006 - 9:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा सॉरी आधीचे माझे शब्द मागे घेते. ही तुळशीचीच एक प्रकारची जात आहे. जेवायला जाण्यापुर्वी मी याच प्रकारची आयुर्वेदाची दुसरी लिंक बघितली अन त्यात हे तुळशीचे दुसरे english नाव आहे हे दिसले. पण ते टाकण्यात उशीर झाला सॉरी.

http://aayurmed.exportersindia.com/others-herbs-spices-1015847.htm

Manuswini
Friday, January 27, 2006 - 10:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सब्जा बर्यापैकी उष्ण असते ( आजी ची माहीती )

Dineshvs
Saturday, January 28, 2006 - 1:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुळशीचे बी तपकिरी रंगाचे असते आणि सबजा काळा असतो.
दोन्हीच्या झाडात बराच फ़रक असतो.
तुळशीच्या काळी, हिरवी, जांभळी कर्पुरी असे अनेक प्रकार आहेत. तुळशीचे बी वजनाला हलके आणि गोल असते.
सबजा रंगाने काळा व जरा लंबगोल असतो. याचे दोन प्रकार आहेत. एका प्रकारात पाने हिरवी असतात, मंजिर्‍या तुळशीसारख्याच असतात पण फ़ुले खालच्या दिशेने ऊमलतात.
सबजाचा दुसरा एक प्रकार असतो त्याला किरमिजी तुरे येतात. याला फ़ार छान वास येतो. ( गुळाच्या गरम पाकात सुगंधी गरम मसाल्याची पुड घातल्यावर येईल तसा. ) अगदी झाडाच्या बाजुने गेले तरी हा वास येतो.
दोन्ही आपल्या धर्मात पुज्य आहेत. तुळशीबद्दल लिहायला नकोच पण सबजाचा तुराहि विठ्ठलाला वहायचा प्रघात आहे. त्याला मुस्लीम लोकात पण धार्मिक महत्व आहे.
ऊष्ण का थंड हे साक्षेपी आहे. पण ऊन्हाळ्यात दोन्ही पिणे चांगले. सबजा सहसा शिजवला जात नाही, पण तुळशीच्या बियांची खीर करतात.


Chafa
Sunday, January 29, 2006 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश आणि मूडी, सब्जा हा तुळशीचाच एक प्रकार आहे. Basil म्हणजे तुळशीचे अनेक प्रकार आहेत आणि सब्जा हा त्यातलाच एक. मी internet वर अनेक ठीकाणी परत परत हीच माहीती पडताळली आहे. असो.

तसेच बथुआ म्हणजे बटवा हेही मला पटत नाहीये. बथुआ ही पालेभाजी मी महाराष्ट्रात कधी पाहीलेली नाही. कदाचित बटवा हा बथुआ वर्गातलाच प्रकार असू शकेल पण अस्सल ' बथुए के परोठे' खावेत ते फक्त North मधेच! अहाहा, तोंडला पाणी सुटलं! :-)


Moodi
Sunday, January 29, 2006 - 7:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाफा मलाही ते मान्य आहे की हा तुळशीचा प्रकार आहे पण तो खुप वेगळा आहे. काही symptoms जरूर सारखे आहेत. पण तुळशीच्या बीयांपासुन पार पानांपर्यंत जो उपयोग होतो तो सब्जाचा होतो की नाही हे अजुन कळलेले नाहिये. मी स्वता जेव्हा हा विकत घेतला तेव्हा मला फरक कळला. पण बरय की निदान या चर्चेमधुन नवनवीन माहिती तरी कळली. अश्या चर्चा वारंवार होवोत.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators