Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
कॉर्न बॉल्स

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » कॉर्न बॉल्स « Previous Next »

Chiku
Wednesday, January 18, 2006 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉर्न बॉल्स

३ बटाटे उकडुन, कुस्करुन घ्यावेत. आले, मिरची, लसुण याची पेस्ट आवडेल त्या प्रमाणात, मीठ, कोथिम्बिर, १ वाटी कॉर्नचे दाणे हे सर्व एकत्र करुन छोटे गोळे वळावेत. तेलात तळुन गरम सर्व्ह करावेत. त्या बरोबर केचप अथवा कोथिम्बिर पुदिना याची चटणी द्यावी.

कॉर्न जर फ़्रोजन असतिल तर ते नॉर्मल टेम्परेचरला आणुन, पेपर टोवेलवर पसरुन पाणी काढुन मगच बटाट्यात मिक्स करा म्हणजे गोळे वळताना त्रास होणार नाही.

ता.क. - वरील रेसिपी आवड्ल्यास इकडे नमुना पाठवावा.

चिकु.


Maanus
Sunday, February 26, 2006 - 6:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अप्रतीम... increadible, awesome खुपच सुंदर झाले होते हे कॉर्न बॉल्स.

फत्क मी एक change केला, ह्यात किंचीत बेसन पिठ टाकले, त्यामुळे तळताना त्रास झाला नाही व ते अजुन कुरकुरीत झाले... आहाहा.

हा पहा फोटो



अजुन detail मधे फोटो
इथे पहा

Moodi
Sunday, February 26, 2006 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आईग!! हाणा कुणीतरी धरुन याला, चोपा चांगल. माझा आज महाशिवरात्रीचा उपास अन हा माणुस चक्क तोंडाला पाणी सुटणार्‍या रेसेपीचे फोटो टाकुन बाटवतोय.
अरे भल्या मा. कु. फे. हे. पा.


Shyamli
Sunday, February 26, 2006 - 6:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडे तु बाहेर ये आधी मीच धरून बडवते तुला
कुठे लपली होतीस ग ईतका वेळ
केंव्हाची वाट बघतिये मी


Moodi
Sunday, February 26, 2006 - 6:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्यामली येते १० मिनिटात. वड्याची तयारी करतेय..............................................साबुदाण्याच्या.

Moodi
Sunday, February 26, 2006 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माणुस यात तु बेसना ऐवजी कॉर्न फ्लॉवर सुद्धा घालुन करू शकतोस, त्याने पण छान कुरकुरीत होतात वडे, पॅटिस वगैरे.

Supermom
Friday, May 11, 2007 - 7:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेल कमी खाणार्‍यांनी shallow fry करून केले तर शिजतील का हे नीट?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators