Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
डाळींच्या चटण्या ...

Hitguj » Cuisine and Recipies » पानाची डावी बाजू अर्थात चटणी, लोणचे, कोशींबीर » चटण्या » डाळींच्या चटण्या « Previous Next »

Dineshvs
Sunday, February 12, 2006 - 4:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रकार १

अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी ऊडदाची डाळ तेलात खमंग भाजुन घ्यावी. त्यातच दहा बारा सुक्या मिरच्या परतुन घ्याव्यात. मग हे भरड वाटावे. आयत्यावेळी त्यात दहि घालावे व वरुन हिंग, जिरे व कडीपत्ता यांची फ़ोडणी द्यावी.
मी यात लसुण पण घालतो.

मुळगा पुडी
एक वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी ऊडदाची डाळ व पव वाटी तुरीची डाळ, दोन चमचे तांदुळ सगळे अगदी थोड्या तेलात भाजुन घ्यावे.
चमचाभर मिरीदाणे, थोडा कडीपत्ता, १५ ते २० लाल मिरच्या, हेहि परतुन घ्यावे.थोडा हिंग व हळदहि परतावी, मग हे सगळे भरड वाटावे. कोरडी पुड बाटलीत भरुन ठेवावी.
आयत्यावेळी त्यात तेल व मीठ घालावे.
किंवा चिंचेचा कोळ व मीठ घालावे. ईडलीवर तेल लावुन नुसती शिवरली तरी चालते, डोश्यावर पण अशीच पसरावी.


Supermom
Wednesday, February 15, 2006 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, खूप खूप धन्यवाद. किती दिवसांपासून हवी होती ही रेसिपी.
मला वाटते की मी म्हणत होते ती पहिली रेसिपी.
पण मुळगापुडी सुद्धा हवीच होती. परत एकदा धन्यवाद.


Chiku
Monday, August 14, 2006 - 8:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मी इडलीची डोश्याची चटणी अशी करते
१ नारळ खवुन,
१ वाटी चण्याची डाळ, ( South Indian चटणीत उडिद डाळ वापरतात) ४-५ तास भिजत घालावी,
१ हिरवी मिरची,
पाव वाटी चिंच कोळुन त्याचे पाणी,
पाउण वाटी कढिपत्त्याची पाने,
४ चमचे उडिद दाळ,
४ सुक्या लाल मिरच्या,
मीठ.

वरील साहित्यातील अर्धी कढिपत्त्याची पाने, उडिद डाळ, २ सुक्या मिर्चीचे तुकडे थोड्या तेलावर डाळ लाल होईपर्यंत परतुन घ्यावे व थंड होऊ द्यावे.

नारळ, चण्याची डाळ, १ हिरवी मिरची, मीठ, वरचे परतलेले साहित्य, चिंचेचे पाणी हे सर्व मिक्सरमधुन वाटुन घ्यावे. पाहिजे तेवढे पाणी घालुन सरबरित चटणी करावी.

आता छोट्या कढल्यात तेल तापवुन मोहरी, हिंग, कढीपत्ता, २ सुक्या मिरच्यांचे तुकडे ह्याची खमंग फोडणी करुन चटणीवर घालावी व सर्व मिक्स करावे.

ही चटणी दोन्-तीन दिवस छान टिकते.

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators