Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Brown Bread Pudding

Hitguj » Cuisine and Recipies » आईस्क्रीम, मूस आणि बरेच काही » Brown Bread Pudding « Previous Next »

Veenah
Tuesday, January 24, 2006 - 10:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ब्राऊन ब्रेड चे पुडिंग ही माझ्या मुलाची आवडती डिश आहे. त्याच्या फ़्रेंड्स च्या GTG मधे सगळ्यांची favourite...पुन्हा पुन्हा करण्याची फर्माइश असते. Teenage मुलानां हमखास आवडण्यासारखा प्रकार आहे. पाव्-भाजी, इडली-सांबार,किंवा छोले-भटुरे च्या मेनु मधे मस्त Combo होऊन जाते.

1 Loaf Wholemeal bread / Brown bread ( preferably use wholemeal bread with cereals, oats if available otherwise plain brown bread will do) दोन दिवस आधी आणून फ़्रिज मधे ठेवावा म्हणजे कोरडा होऊन कुस्करायला सोपे जाते. किंवा सुका असल्यास मिक्सर मधून crumbs बनवून घ्यावे.
ह्या
crumbs मधे 3 tbsp Drinking chocolate and 3 tbsp Powdered Sugar mix करावी. आपल्या आवडीप्रमाणे काजू, बदाम, अक्रोडाचे तुकडे, बेदाणे अशी dry fruits त्यात घालून बाजूला ठेवावे.

For the Custard:

१/२ लिटर दुधात ३ टे.स्पू कस्टर्ड पवडेर, ३ टे.स्पू साखर व १ चमचा vanilla essence टाकून ढवळून गुठली होउ न देता शिजवावे व कस्टर्ड बनवून घ्यावे. गुठल्या वाटल्यास थंड झाल्यावर मिक्सर मधून काढून घ्यावे.

For the Topping:

1 carton (200 gm) Milk Cream.
Fresh mix cut fruits. (सीझनप्रमाणे जी फळे उपलब्ध असतील ती सफरचंद, पपई,अननस,केळ, द्राक्ष, चिकू, संत्र काहीही) ती व्यवस्थीत कापून एका बाऊल मध्ये तयार ठेवावी.

To Serve:

काचेचे transparent casserole सारखे पसरट भांडे घ्यावे. Bread crumbs चे दोन भाग करावे. त्यातील एक भाग भांड्यात दाबून घट्ट बसवावा. ह्या वर तयार केलेले कस्टर्ड हळूवार पणे ओतावे. आता राहिलेला bread crumbsचा भाग अलगद पसरावा. दोन ब्राऊन लेयर मधे कस्टर्ड्चा लेयर दिसला पाहिजे.
आता ह्यावर क्रीम हलकेच पसरून सेट' करायला फ्रिज मधे ठेवावे.
सर्व्ह करण्या अगोदर त्यावर कापलेली फळे क्रीमच्या लेयरवर छानशी रचून सजावट करावी व पुन्हा
chill करून सर्व्ह करावे.
Custard घट्ट होऊन layers सकट slices कापता आल्या पाहिजेत.
हे पुडींग आदल्या दिवशी करून फ्रिज मधे ठेवले तरी चालते पण फक्त क्रीम व फळे थोडा वेळ आधी घालावी.


Vrushs
Saturday, April 19, 2008 - 12:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Milk cream म्हणजे नक्की काय?

Shonoo
Sunday, April 20, 2008 - 2:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vrushs
अमेरिकेत heavy cream किंवा whipping cream मिळते. ते आणून भरपूर फेटुन करता येइल. किंवा cool whip चा डबाच आणायचा. सर्व साधारण ग्रोसरी मधे फ्रोझन सेकशन मधे मिळतो.


Vrushs
Monday, April 21, 2008 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धन्स ग शोनू. मला ही सगळी क्रीम्स माहिती होती पण मिल्क क्रीम म्हणजे नक्की हेच का ते माहिती नव्हते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators