|  
Veenah
 
 |  |  
 |  | Sunday, January 22, 2006 - 12:51 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मोरी मसाला:  ह्या माश्याचा प्रकार मटणाप्रमाणेच करतात. मोरी मासा आकाराने मोठा असतो व साल काढून तुकडे करावे लागतात म्हणून बाजारातून आणतानाच कोळणीकडून किंवा विक्रेत्याकडून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून आणावे.   मोठा, टचटचीत व पाठीकडे काळसर रंगाचा मासा चवीने छोट्या मोरी माश्यापेक्षा चांगला लागतो.  १ किलो मोरी चे तुकडे धुवून त्याला, आले-लसूण्-मिरच्या-कोथंबीर ची वाटलेली गोळी, हळद, तिखट व मीठ लावून ठेवावे.  गरम मसाला-४ लवंगा, २/३ दालचिनीचे तुकडे, १ चमचा धणे, ६/७ मिरी १ साधी वेलची, लहानसा जायफळाचा तुकडा, चिमूट शहाजीरे,१टिस्पून खसखस.--तेलात हा मसाला भाजुन घ्यावा.  १ मध्यम कांदा उभा चिरून १ कप ओले खोबरे- दोन्हीही तेलात गुलाबी भाजून घेणे.  कांदा-खोबर्याची, मसाला घालून गोळी वाटावी.  ३/४ कान्दे बारीक चिरून तेलात परतून घ्यावे. त्यात मोरीचे तुकडे व १/४ वाटी चिंचेचा कोळ घालून थोडे पाणी घालून शिजायला ठेवावे.  शिजल्यावर त्यात कान्दा-खोबर्याचे वाटण व चिरलेली कोथम्बीर घालावी. एक उकळी काढून खाली काढावे.  तांदळाच्या वड्यांबरोबर चांगले लागते. 
 
  |  
Veenah
 
 |  |  
 |  | Sunday, January 22, 2006 - 1:06 pm:    |  
 
 
 |   
  |   
 मी चुकून एक गोष्ट लिहायला विसरले.  वरील गरम मसाला भाजताना त्यात १/४ टिस्पून बडीशेप पण घालावी. 
 
  |  
 
 | 
|  हितगुज गणेशोत्सव २००६   | 
 | 
 
  | 
 | 
 
| चोखंदळ ग्राहक | 
  |  
 
| महाराष्ट्र धर्म वाढवावा | 
 |  
 
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत | 
 |  
 
|  पांढर्यावरचे काळे | 
 |  
 
|  गावातल्या गावात | 
 |  
 
|  तंत्रलेल्या मंत्रबनात | 
 |  
 
|  आरोह अवरोह | 
 | 
 
|  शुभंकरोती कल्याणम् | 
 |  
 
|  विखुरलेले मोती | 
 | 
 
 
 
 
 |