| 
   | 
| | Veenah 
 |  |  |  | Sunday, January 22, 2006 - 12:15 pm: |       |  
 | 
 साहित्य:
 ४ मध्यम आकारचे बांगडे, १ वाटी ओले खोबरे, १ इंच आल्याचा तुकडा चकत्या करून, ४ हिरव्या मिरच्या उभ्या चिरुन, १०/१२ तिरफ़ळे, लहान लिंबाएवढ्या चिन्चेचा कोळ, हळद, तिखट, मीठ, १ चमचा खोबरेल तेल.
 कृती:
 बांगडे साफ करुन त्याचे ३/३ तुकडे करून, धुवून त्यांना १ चमचा हळद्पूड, मिरची पूड व मीठ लावून ठेवावे.
 ओलेखोबरे, १ चमचा मिरची पुड आणि १/२ चमचा हळद पूड घालून २ वाट्या पाणि घालून मिक्सर मधून बारीक वाटून घावे.
 एक पातेल्यात हे वाटण, चिन्चेचा कोळ, बांगड्याचे तुकडे, आले, मिरच्या व चवीनुसार मीठ घालून उकळी येवू द्यावी. तिरफळाच्या बिया काढून टाकून ती ठेचून ह्यात घालावी. तुकडे शिजेपर्यंत ३/४ मिनिटे मंद उकळू द्यावे. मग वरून १ चमचा खोबरेल तेल घालून खाली उतरावे.
 गरम गरम वाफाळणार्या भातावर हे आंबट तिखट झणझणीत हुमण रुचकर लागते.
 
 
 |  | 
| हितगुज गणेशोत्सव २००६ |  |  
| 
 |  |  
| चोखंदळ ग्राहक |  |  
| महाराष्ट्र धर्म वाढवावा |  |  
| व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |  |  
| पांढर्यावरचे काळे |  |  
| गावातल्या गावात |  |  
| तंत्रलेल्या मंत्रबनात |  |  
| आरोह अवरोह |  |  
| शुभंकरोती कल्याणम् |  |  
| विखुरलेले मोती |  |  
   |