Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
पापलेटाचे भुजणे ...

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » मासे आणि इतर जलचर » मासे » पापलेट » पापलेटाचे भुजणे « Previous Next »

Dineshvs
Thursday, September 22, 2005 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेथकुटाचे भुजणे

एक मध्यम जोडी पापलेट साफ़ करुन त्याला मीठ व लिंबुरस लावुन ठेवावे. एक चमचा तेल तापवुन त्यात थोडा हिंग व हळद घालावी. पाव चमचा मेथीपुड घालुन जरा परतावे. मग दोन चमचे लाल तिखट घालुन रंग बदलु न देता परतावे व ऊतरुन घ्यावे.

दोन कांदे बारिक चिरुन मीठ लावुन हाताने चुरावेत. त्यात कच्चा हिंग, वर केलेले मेतकुट, दोन चमचे लसुणपेस्ट, बारिक चिरलेली कोथिंबीर व ऊभ्या चिरलेल्या मिरच्या घालुन परत चुरावे. त्यात अर्धी वाटी तेल घालावे. मग त्यात माश्याचे तुकडे घालावेत. एका पसरट भांड्यात ( लंगडी ) हे नीट पसरावे व अगदी मंद आचेवर शिजवावे. ज्या माश्याना ऊग्र वास येतो त्या माश्यांचे भुजणे करताना थोडे आले वाटुन घालावे.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators