कार्यशाळा निकाल

Submitted by kaaryashaaLaa on 20 October, 2008 - 01:56

आता जाहीर करत आहोत कार्यशाळा निकाल...

तृतीय पारितोषिक विजेती प्रवेशिका आहे...

प्रवेशिका - २३ आणि ह्या रचनेचे गझलकार आहेत पुलस्ति.

द्वितीय पारितोषिक विजेती प्रवेशिका आहे...

प्रवेशिका - ३१ आणि ह्या रचनेच्या गझलकार आहेत संघमित्रा.

आणि मायबोली मराठी गझल कार्यशाळा २००८ ची प्रथम पारितोषिक विजेती प्रवेशिका आहे....

प्रवेशिका - २४ आणि ह्या रचनेचे गझलकार आहेत प्रसाद मोकाशी.

मायबोलीवरील प्रथम कार्यशाळेनंतर नियमीतपणे उत्तमोत्तम गझल लिहिणारे अभिजीत दाते ( प्रवेशिका - २८ )ह्यांचा विशेष उल्लेख केल्याशिवाय ह्या कार्यशाळेचा निकाल पूर्ण होणार नाही.

तसेच आवर्जून उल्लेख करायला हवा ITgirl, zelam आणि ashwini_k ह्यांचा. ह्या सहाध्यायींचा गझल लिहिण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता, आणि त्यांनी त्यासाठी ज्या चिकाटीने आपण होऊन प्रयत्न केले ते कौतुकास्पद आहे.

मायबोली प्रातिनिधिक गझल संग्रहासाठी खालील रचना निवडल्या आहेतः

प्रवेशिका - १ ITgirl
प्रवेशिका - ६ jayavi
प्रवेशिका - १० aaftaab
प्रवेशिका - ११ jo_s
प्रवेशिका - १३ sumedhap
प्रवेशिका - १५ prasad_shir
प्रवेशिका - १९ mrunmayee
प्रवेशिका - २१ zaad
प्रवेशिका - २२ zelam
प्रवेशिका - २३ pulasti
प्रवेशिका - २४ prasad mokashi
प्रवेशिका - २६ shyamali
प्रवेशिका - २७ psg
प्रवेशिका - २८ mi_abhijeet
प्रवेशिका - २९ jlo
प्रवेशिका - ३१ sanghamitra
प्रवेशिका - ३४ daad
प्रवेशिका - ३५ mi_anandayatree
प्रवेशिका - ४० ashwini_k
प्रवेशिका - ४२ satish.waghmare

सर्व विजेत्यांचे व सहाध्यायींचे हार्दिक अभिनंदन!!!!

ही तर केवळ सुरुवात आहे. "मराठी गझल" विभाग वाट पाहतो आहे. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुलस्ति, सन्मी आणि प्रसाद तुम्हा तिघांचही मनःपूर्वक अभिनंदन. Happy
अश्याच छान छान गजला लवकर लवकर येउ दे आता Happy
संयोजकांना खूप खूप धन्यवाद

प्रसाद, संघमित्रा आणि पुलस्ति,

मनापासून अभिनंदन!!!

आणि प्रातिनिधिक संग्रहासाठी निवड झालेल्या सार्‍यांचंही!!!

कार्यशाळा संयोजकांचंही अभिनंदन आणि आभार, या यशस्वी उपक्रमाबद्दल.

-सतीश

विजेत्यांचे अभिनंदन आणि सोबत सहभागी झालेल्या अन्य गजलकारांचेही अभिनंदन!

कार्यशाळेतील समस्त गुरुजनांचेही खूप खूप कौतुक आणि सोबत आभार.

आता पुढे कवितांचे वृत्त यावर देखील कार्यशाळा होऊन जाउ द्या. इथे कविता लिहिणारे बरेच जण आहेत.

परत एकदा अभिनंदन!!!! विजेत्यांनी पार्टीची व्यवस्था करावी Happy

विजेत्यांचे खूप अभिनंदन!
आणि कार्यशाळेतले गुरुजन, खूप खूप आभार!!:)

विजेत्यांचे अभिनंदन Happy
आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल गुरुजी व बाईंचे आभार.

विजेत्यांचे आणि संयोजकांचेही अभिनंदन.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

अरे हो एक सांगायचे राहिलेच Happy
टाकलेली गझल कुणाची आहे ह्याची शंका कुणाला येऊ नये म्हणून प्रत्येक सहाध्यायीला स्वतःच्या गझलला पण गुण देण्याविषयी सांगितले होते. अर्थातच ते गुण ग्राह्य धरण्यात आलेले नाहीत. जे सहभागी झाले होते त्या सर्वांना हे माहीतच आहे पण ज्यांनी सहभाग घेतला नव्हता त्यांनाही हे कळावे म्हणून हा संदेश...

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

सगळ्या विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी झालेल्या व प्रातिनिधिक गजलकारांचेही अभिनंदन!

विजेत्यांचं आणि सगळ्याच गझलकारांचं मनःपूर्वक अभिनंदन. मजा आली गझलांचं रसग्रहण करताना.. संयोजकांचही अभिनंदन...

प्रसाद, संघमित्रा आणि पुलस्ति, ... मनापासून अभिनंदन!!!

प्रातिनिधिक संग्रहासाठी निवड झालेल्या सार्‍यांचंही... मनापासून अभिनंदन!!!

कार्यशाळा संयोजकांचंही अभिनंदन आणि आभार, या यशस्वी उपक्रमाबद्दल!!

प्रसाद, संघमित्रा आणि पुलस्ति हार्दिक अभिनंदन Happy

तसंच आयटीगर्ल, झेलम आणि अश्विनी_के- तुमच्याकडून अजून खूप खूप गजल लिहून होवोत आणि आम्हाला त्या वाचायला मिळोत ही शुभेच्छा! Happy
--------------------------------
आली दिवाळी! Happy

प्रसाद, मित्रा, पुलस्ती...... खूप खूप अभिनंदन Happy
सर्व गझलकारांचं अगदी मनापासून अभिनंदन !!

संयोजकांचं तर जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. ह्या सगळ्या प्रकल्पाला किती प्रचंड संयम, वेळ आणि मेहेनत लागली असेल ह्याची कल्पना प्रत्येकाला आहेच. तुम्हा सगळ्यांचे आभार Happy

विजेत्यांचे आणी कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासुन अभिनंदन... सर्व गुरूजनांना त्रिवार वंदन... :)त्यांनी आपल्याला उत्तमोत्तम गझल लिहायचा मार्ग दाखवलाय ..आता फक्त त्यावर न अडखळता चालायचं आहे....:)

विजेत्यांच तसेच कार्यशाळेत भाग घेतलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन Happy

आपल्या रोजच्या कामातून एव्हडा वेळ काढून काम केल्याबद्दल, गझल कार्यशाळेच्या मास्तर-मास्तरणींचे विशेष अभिनंदन. Happy

प्रसाद, संघमित्रा, पुलस्ती तुम्हा सर्वांचे अभिनंदन

सर्व संयोजक मंडळातील सर्वांचे आभार आणि यशस्वी कार्यशाळेबद्दल अभिनंदन.

सुधीर

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. कार्यशाळेचे आभार आणि कौतुक.

विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.
संयोजक - तुम्ही चिकाटीने उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचं विशेष कौतुक आणि आभार.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन...

*********************
वाहत्या गर्दीत माझा चेहरा पाहू नको तू
मुखवटे आहेत तेथे, त्यात हा 'नचिकेत' नाही!

विजेत्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!!! सुरेख रचना आहेत.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या खंद्या वीरांचं कौतुक!

आणि स्वतःच्या धकाधकीच्या आयुष्यात, रोजचे व्याप सांभाळत आम्हा सगळ्यांच्या गझलांवर येव्हडी मेहेनत घेतल्याबद्दल संयोजकांचे खूप खूप आभार!!!!
..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

खूप खूप अभिनंदन, सर्वांचेच!

प्रसाद, संघमित्रा आणि पुलस्ति, ... मनापासून अभिनंदन!!!
प्रातिनिधिक संग्रहासाठी निवड झालेल्या सर्व गझलकारांचेही मनापासून अभिनंदन!!!

का.शा. संयोजकांचे मन:पूर्वक आभार.. !!! कविता करण दुरच.. मायबोली वर कविता मी कधी वाचत पण नाही.. पण कार्यशाळेमधले पोस्टवाचून मला पण गझल लिहायची इच्छा झाली !!! खूप वेगळा अनुभव होता हा. हा नुभव मिळवून दिल्याबद्दल खरच खूप आभार !!

अरे वा झकास!
सर्व विजेत्यांचे आणि सह-अध्यायींचे मनःपूर्वक अभिनंदन! आणि अर्थातच कार्यशाळेचे अनेक आभार...
प्रसादमोकाशी, या निमित्ताने पुन्हा तुमच्या रचना मायबोलीवर नियमित वाचायला मिळतील अशी आशा करतो.

अरे वा! मस्तच अभिनंदन विजेत्यांचे आणि निवड झालेल्या गझलकारांचे Happy
गझल कार्यशाळेच्या आयोजकांचे आभार..

प्रसाद, संघमित्रा, पुलस्ती तुम्हा सर्वांचे अभिनंदन

सर्व संयोजक मंडळातील सर्वांचे आभार आणि यशस्वी कार्यशाळेबद्दल अभिनंदन.:)

प्रसाद, संघमित्रा, पुलस्ती अभिनंदन!! पहिल्या शाळेतही तुमच्या गझल खूप छान होत्या.
अभिजीत, अश्विनी, झेलम, आयटी अभिनंदन!
कार्यशाळा यशस्वी केल्याबद्दल सहभागी झालेल्या सगळ्यांचे आणि संयोजकांचे अभिनंदन. Happy

गझल वाचायला खूप मजा आली. रोज उत्सुकता असायची. शाळा नंबर-३ कधी? Happy

यावेळेस फार सुंदर गझल वाचायला मिळाल्या..
सर्वांचेच अभिनंदन..:)

प्रसाद, संघमित्रा आणि पुलस्ति, सर्वांचे हार्दिक अभिनंदन..!

आयटीगर्ल, झेलम आणि अश्विनी_के आपलं स्वागत आहे. अन अपेक्षाही आहेत आता..!

चांगल्या गझला वाचायला मिळाल्या. कार्यशाळा यशस्वीपणे राबवल्याबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल सर्व संयोजक नक्कीच कौतुकास पात्र आहेत..!
आणि उत्तम प्रतिसादाबद्दल सभासदही..!

भविष्यातही असेच उपक्रम राबवले जावोत ही सदिच्छा..!

या निमित्ताने खूप प्रश्नांची (मराठी गजलबाबत) उकल झाली. प्रत्येक प्रवेशिकेला स्वतंत्रपणे मार्गदर्शन करणार्‍या कार्यशाळेचे प्रथम आभार. सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन!

सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आणि संयोजकांना धन्यवाद...

या निमित्ताने खूप काही शिकायला मिळाले...

Pages