मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

फॅशन, स्टाईल ह्या बद्दल एखादा बी बी चालू करता येईल? ज्यात 'बेत काय करावा' प्रमाणे कोणत्या कपड्यांबरोबर काय स्टाईल करावी किंवा काय शोभेल असे प्रश्न विचारता येतील. Happy किंवा असे प्रश्न कुठे विचारायचे ? (मला विचारायच आहे :स्मित:)

"सुंदर मी होणार" असा एक गृप आधीच आहे. तिथे हा नवीन धागा सुरू करणे उचीत होईल. "कशा बरोबर काय शोभेल" हे सौंदर्य खुलवण्याचाच एक भाग आहे आणि त्या गृपवर तुम्हाला योग्य तो वाचकवर्ग ही मिळेल. तुम्ही गृपचे सभासद होऊन तुमचा तुम्ही हा धागा सुरू करू शकाल आणि तुम्हाला तिथे काय लिहिणे अपेक्षित आहे हे पण लिहू शकाल.

सध्या मिनिआपोलिसचा ग्रुप नाहिये. तो कधी होणार आहे ? का वेगळी रिक्वेस्ट पाठवावी लागेल?

इथे मिनिसोटाचं पान तयार केलं आहे. तुम्ही लिहायला लागा. तिथे थोडी वर्दळ वाढली की जरूर नवीन गृप सुरू करू. तुम्ही तुमच्या मिनोसोटामधल्या स्नेहमंडळींना कळवलंत तर छान होईल. रिकाम्या गृपावर कुणी लिहित नाही म्हणून जशी मागणी होईल तसे गृप तयार करतो आहोत. आणि त्यातही फक्त मिनिआपोलिसचे लोक वाढले तर मिनिआपोलिसचाही वेगळा गृप करून देऊ.

उखाणे स्पर्धेत भाग कसा घेता येइल

मायबोली गणेशोत्सवातल्या कुठल्याही स्पर्धेत भाग घेण्या आधी तुम्हाला मायबोली गणेशोत्सव २००८ या गृपचे सदस्य व्हावे लागेल. सदस्य होण्यासाठी मायबोली गणेशोत्सव या पानावर जा. तिथे डावीकडे 'सामील व्हा' अशी लिंक दिसेल तिथे जावुन सामील झालात की मग हव्या त्या स्पर्धेच्या पानावर जावुन तिथे तुम्हाला प्रवेशिका पाठवता येईल.
प्रत्येक स्पर्धेच्या पानावर प्रवेशिका कशी पाठवायची ती माहिती दिले आहे.
उखाणा स्पर्धेसाठी जिथे उखाणा लिहायचा आहे तिथे जावुन नविन प्रतिसाद लिहुन उखाणा पोस्ट करता येतो.

नमस्कार. गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात थोड्या वेळापूर्वी गाईड असा आयडी घेऊन मी एक लेखनाचा धागा सुरू केला, पण तो अजून दिसत नाहीये. कृपया मदत करता का ?

    ***
    Has the LHC destroyed the world yet?
    (If you are not satisfied, please check out the source code.)

    धन्यवाद एडमिन. पण हा नविन धागा कसा सुरु करु? मला समजत नाहीये. तुम्ही करु शकाल का? किंवा कस करायच ते सांगा.

    ऍडमिन,

    संपर्कातून ईमेल करताना ऍटॅचमेंटची सोय करता येईल का?
    जुना बी बी इथे नव्या माय्बोलीवर कसा शोधू?

    @me_surabhee वर मदतपुस्तिकेत नुकतीच नवीन धागा कसा सुरू करावा याची माहिती दिली आहे.
    @dakshina
    ऍटॅचमेंटची सोय करायचा सध्यातरी विचार नाही. कारण एकदा मायबोलीवरून संपर्क झाला की तुम्ही नेहमीचा (मायबोली बाहेरचा) ईमेल प्रोग्राम वापरून ऍटॅचमेंट पाठवू शकता.
    सगळे जुने BB अजून इथे आले नाहीत. तुम्हाला हवा असलेला सांगितला तर इथे आणता येईल.

    ऍडमिन,
    मी आचार्य अत्रेंच्या विनोदाचा बी बी शोधत होते, (तो नव्या मायबोलीवरचाच आहे) सध्या मला लिंबूटिंबू यांनी त्याची लिंक दिली आहे, पण तो नक्की आहे कुठे कसे शोधायचे?

    तुम्हाला 'हितगुज विषयानुसार' मध्ये सगळे गृप्स बघता येतील. त्यात जावुन बघु शकता कुठल्या विषयाचा धागा कुठे आहे ते.

    मी नुकतीच "कोणाशी तरी बोलायचं" ह्या ग्रूप ची सभासद झाले आहे. पण मला इथे नवीन विषय कसा टाकायचा ते कळत नाहीये. कोणी मदत करू शकेल का?
    ----स्वाती.

    नमस्कार, मला "सुरेश भट" यांच्या विभागात प्रतिसाद देताना अडचण येते आहे: Error
    Your username/password combination was invalid, or you do not have permission to post to this topic. You may revise your username and password using the form at the bottom of this page.

    स्वाती, त्या ग्रुपमध्ये गेल्यावर डावीकडे 'नवीन लेखनाचा धागा' अशी लिन्क दिसेल ती क्लिक करुन नवीन विषय सुरु करता येईल.

    मॉड्स्,मला एक सिग्नेचर टाकायची आहे पण मी तिकडे जाउन सिग्नेचर टाकली की ते मला पासवर्ड विचारत आहेत आणि म्हणत आहे की 'तुम्ही पासवर्ड विसरला आहात का?'. नक्की काय प्रॉब्लेम आहे??मी काय करु??

    तुम्ही जाण्याची नोंद करून (Logout) पुन्हा प्रवेश करा.

    नमस्कार!

    दोन वर्षा च्या (अथक) विश्रांती नंतर !!

    माझे जुने रंगीबेरंगी चे पान त्यावरील लिखाना सह पुन्हा हवे असल्यास काय करावे लागेल?

    धन्यवाद!!!

    ऍडमिन्,लॉगाआउट करुनही काही होत नाही. खालील मेसेज दाखवत-
    The e-mail address chinya1985@rediffmail.com is already registered. Have you forgotten your password?

    @चंपक
    तुमचे जुने पान आणि लेखन इथे व्यवस्थित आहे.
    http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/87169.html?1182049301
    तुम्हाला नवीन मायबोलीत रंगिबेरंगी पान हवे आहे का?

    @chinya1985
    सिग्नेचर साठी पासवर्ड बदलायची गरज नाही. तुम्ही फक्त नवीन सिग्नेचर लिहून साठवून ठेवायची.

    पासवर्ड हे वेगळ्या विभागात वर, तुम्हाला तुमच्या खात्याचा पासवर्ड बदलायचा असेल तर त्यासाठी आहे.

    गुलमोहर विभागातल्या एखाद्या कवितेचा किंवा लेखाचा प्रिंट आउट कसा काढायचा ?

    सिग्नेचर साठी पासवर्ड बदलायची गरज नाही. तुम्ही फक्त नवीन सिग्नेचर लिहून साठवून ठेवायची.

    अहो मग तोच तर प्रॉब्लेम आहे ना!!!!!!!मला पासवर्डशी घेणदेण नाहीये पण मी जेंव्हा सिग्नेचर लिहीतोय तेंव्हा ती साठवण्यासाठी मी 'सबमिट' क्लिक करतोय्.आणि ते केल्यानंतर वरील मेसेज दाखवत आहे. सबमिट केल नाही तर सिग्नेचर सेव्ह होत नाहीये आणि सबमिट केल की पासवर्ड बदलायचा गोष्टी करत आहे. काय करु??

    एडमिन, माझ्या प्रिंटआउट बद्दल सांगा की..

    मला माझे सदस्यत्व नको असल्यास काय करु??

    नमस्कार, मला "सुरेश भट" यांच्या विभागात प्रतिसाद देताना अडचण येते आहे: Error
    Your username/password combination was invalid, or you do not have permission to post to this topic. You may revise your username and password using the form at the bottom of this page.

    -पुष्कर

    मी दिलेल्या प्रतिक्रिया मला लॉग इन केल्याशिवाय दिसत नाहीत. काय चुकतंय नक्की?
    मी गणेशोत्सवात प्रकाशचित्र स्पर्धेत म्हणून टाकलेला फोटो देखील फक्त मलाच दिसत होता (लॉग इन केल्यावर) आणि शेवटच्या मतदानात समाविष्ट नव्हता. एखादं सेटिंग आहे का जे बदलावे लागेल?
    -सौरभ

    मायबोलीवर आधी प्रकाशीत झालेल्या माझ्या गोष्टी (गणेशोत्सवातली गोष्ट सुद्धा) रंगीबेरंगी पानावर हलवल्या तर चालतात ना ?

    मदत समिती
    मि काल चित्रपट कसा वाट्ला ह्या ग्रुप वर् ती "सैल" ह्या मराठी चित्रपटा विषयी माझ मत लिहिल होत...आज ते कुठेच दिसत नाही. अस का? त्यावर एक दोघान्च्या प्रतिक्रीया पण होत्या. त्या पण कुठे दिसत नाहीत.....

    @lovevin
    त्याच ग्रुपमध्ये नविन धागा चालू करून तुमचे पोस्ट व इतर प्रतिक्रिया तिथे हलवल्या आहेत.
    http://www.maayboli.com/node/3960

    @सौरभ
    प्रत्येक ग्रुपमधलं लेखन एकतर ग्रुपपुरतंच मर्यादीत असतं कींवा सार्वजनीक वाचनाकरता उपलब्ध असतं. तुमचं लेखनाला जर सार्वजनीक केलं नसेल तर तुम्ही लिहिलंय तसा प्रकार होऊ शकतो.

    Pages