सर्वोत्तम मराठी साहित्यकार

Submitted by arjun1988 on 19 October, 2009 - 09:45

वीसाव्या शतकात मराठीमधे अनेक उत्त्तम लेखक आणि कवि झालेत. माझ्या आवडीप्रमाणे वीसाव्या शतकातील सर्वोत्तम पाच मराठी साहित्यकार खालीलप्रमाणे आहेत.आपले मत जरुर कळवा

१. केशवसुत
२. कुसुमाग्रज
३. ग. दि. माडगुळकर
४. आचार्य अत्रे
५.पु. ल. देशपांडे

गुलमोहर: 

१. वि. स. खांडेकर. २. कुसुमाग्रज. ३. शिवाजी सावंत. ४. पु.ल. देशपांडे ५. सुरेश भट

शरद

पु ल देशपांडे
व पु काळे
शिवाजी सावंत
रणजित देसाई
चंद्रशेखर गोखले

मी बहुसंख्यांबरोबर जायचे असा माझ्या जीवनाचा मार्ग निश्चित केसाहित्या >> "बोळा निघून प्रवाह वाहता झाला" असे काय रे टण्या ? Lol

१. जी. ए.कुलकर्णी - काजळमाया कथा संग्रह आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट.
२. विजय तेंडूलकर - नवविचार
३. कुसुमाग्रज - भाषा सौंदर्य
४. शांता शेळके - सोपी रचना
५. आचार्य अत्रे - अष्टपैलू लेखन

नाय गो! मी बहुसंख्यांबरोबर जायचे असा माझ्या जीवनाचा मार्ग निश्चित केला आहे >>> मग आता लाडु पण लवकरच मिळणार का ? (मी जोशीण नाही तरी सुद्धा विचारल्याशिवाय राहवले नाही :फिदी:)

मी ते बहुसख्यांबरोबर असे वाचले. प्रत्येक राज्यातली एक अशा सख्या गोळा करायला इशान्ये पासून सुरवात करायला गेलाय की काय टण्या Happy

टण्याने आता उडदामाजी काळे गोरे काय वर्णावे असा विचार करून दिसेल ते आणि सुचेल त्या क्रमाने नावे दिली आहेत. त्याचे मत विचारात घेऊ नये. त्याचे डोके ठिकाणावर नाही आहे......

(हुकुमावरून)

Proud

नाय गो! मी बहुसंख्यांबरोबर जायचे असा माझ्या जीवनाचा मार्ग निश्चित केला आहे
-------------------------------------------------------------------
मग नास्तिकता सोडुन आस्तिक पण बनलास काय? Happy

का हो, सु शी का आवडु नये कोणाला? त्यांच्या लिखाणानी बर्‍याच लोकांचं बर्‍याच गोष्टीं बद्दल ज्ञान फार वाढीस लागलं Proud

नाय गो! मी बहुसंख्यांबरोबर जायचे असा माझ्या जीवनाचा मार्ग निश्चित केला आहे >> Biggrin तरीच ते प्रचंड "सुंदर" वगैरे.!!

१) मारुती चितमपल्ली - यांचं मला सर्वचं साहित्य आवडलेलं आहे. कुठलही पुस्तक घेतलं तर त्यतून केवळ मनोरंजनच नाही तरी माहिती देखील मिळते. वेगळा शब्दसंच जमा होतो. अनुभवातून जन्मलेलं लिखाण करतात म्हणून फार आवडतात. फार शिक्षण नसताना फक्त अनुभव आणि चिकाटी यातून त्यांनी अनेक चांगली पुस्तकं लिहिली आहेत.

२) दुर्गा भागवत - कौटील्याचे अर्थशास्त्र फार आवडले.

३) गौरी देशपांडे - सगळीच पुस्तकं खरे तर पण त्यात दुस्तर जास्त. विनोद, प्रामणिकपणा, भाषेचे वाण, शैली, कथेचा प्रवाह - यासाठी आवडतात.

४) पु. लं. देशपांडे - पुर्वरंग फार आवडले.

५) व्यंकटेश माडगुळकर -- यथार्त चित्रण, सरळ साधी भाषा, माणसं रंगवण्याची उत्तम शैली

६) जी. ऐ. कुलकर्णी - यांच्या निवडक कथा.

नाय गो! मी बहुसंख्यांबरोबर जायचे असा माझ्या जीवनाचा मार्ग निश्चित केला आहे
-------------------------------------------------------------------
मग नास्तिकता सोडुन आस्तिक पण बनलास काय?

>>>>
जर पुरावे सादर नाही झाले तर, ओव्हर माय डेड बॉडी, ओव्हर माय डेड बॉडी Happy