मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही

Submitted by पूनम on 1 October, 2009 - 02:47

इथे मायक्रोवेव्हबद्दल सर्व लिहूया. आधीच्या धाग्यावरची पोस्टंही हलवते इथे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला मायक्रोवेव्ह ओव्हन घ्यायचे आहे. मी यापूर्वी कधीही पदार्थ बनवण्यासाठी वापरलेले नाही. (त्यामुळे वापरता येईल की नाही , उपयोग होईल की नाही , शंकाच आहे.) . फक्त त्यात अन्न गरम कसे करायचे आणि पापड कसे भाजायचे एवढेच मला जमते.

कुठला घ्यावा? उरलेले अन्न गरम करण्या व्यतिरिक्त अजुन काही उपयोग होतो का? जाणकरांनी प्रकाश टाकावा.

(प्रिन्सेस) (नन्दिनीही तत्समच प्रश्न विचारलाय)

उत्साह असेल तर बरेच काही करता येते म्हणे. पण कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह घेऊनसुद्धा त्यात चहा, पाणी, दुध, भाजी गरम करणे, पापड किंवा दाणे भाजणे एवढेच ८०% पेक्षा जास्ती जनता करते असे माझे स्पष्ट मत. Happy त्यामुळे घेण्याआधीच मायक्रोवेव्ह पाककृतीचा क्लास लावावा व नंतर विचार करावा.

माझ्या आईकडे LGचा मायक्रोव्हेव आहे, त्याबरोबर रेसिपि बुक येत त्यानुसार बरेच पदार्थ करता येतात (आणि चांगले होतात)जस ढोकळा, पिझ्झा, केक, उकड वैगरे.

(प्राजक्ताडी)

माझ्या आईकडे एल जी चा आहे. ८ वर्षं झाली. चांगला आहे. कॉम्बो आहे. पण पटवर्धन शाकाहारी असल्याने कॉम्बोचा फारसा वापर होत नाही.

मी गेल्यावर्षी गोदरेजचा घेतलाय. तोही कॉम्बो. अजूनतरी काहीच प्रॉब्लेम नाही. कॉम्बो मधल्या इतर गोष्टी अजून वापरून बघितल्या नाहीयेत.

(नीधप)

माझ्याकडे एलजी चा आहे मायक्रोव्हेव विथ ग्रील अँड कन्चेंशन. अडीच वर्षापासून वापरतेय. अन्न गरम करणे, इडल्या (माझ्याकडे साधं इडलीपात्र नाहिये), ढोकळे, भात, वांगी भाजणे, शेंगदाणे भाजणे, आयाम लहान असताना त्याच्यासाठी खिमट बनवणे, भाज्या शिजवणे (बर्‍याच भाज्या मी अर्धवट शिजवून घेते अन नंतर बाहेर थोड्या तेलावर फोडणी देवून परतते), ग्रीलवर २-४ वेळा व्हेज आणी चिकन कबाब ग्रील केलेत, केक अन लो कॅल बनाना ब्रेड कनव्हेंशन मोडवर नेहेमी करणे इ. साठी वापर होतो.
२-४ वेळ गॅस संपल्यामुळे अन स्वैपाकघरात सुतारकाम चालल्यामूळे सकाळचा चहा / कॉफी, नाश्ता (ब्रेड्-बटर, पोहे) अन जेवण (भात्-भाजी, पुलाव, मॅगी इ..)करताना सगळ्यात जास्त उपयोग झाला मायक्रोव्हेवचा.
आईकडे केनस्टारचा कॉम्बो विथ ग्रील असा मायक्रोव्हेव आहे ५-६ वर्षांपासून. तिच्याकडे केक वैगरेसाठी दुसरा गोल ओव्हन असल्यामूळे कन्व्हेंशन मोड असलेला घेतला नाही. ती क्वचित भाज्या करणे अन नेहेमी वांगी, शेंगदाणे वैगरे भाजणे यासाठीच उपयोग करते फक्त. तिकडे सकाळच्या स्वैपाकाच्या गडबडीच्या वेळी लाइटच नसते. पण केनस्टार मध्ये २-३ वेळा काहीतरी मेजर प्रॉब्लेम आला होता. कंपनीने दुरुस्त करून दिला होता.
मी परवा फराळी मिसळ पुर्णपणे मायक्रोव्हेव वापरुन केली. . बटाट्याचा किस अन साबुदाण्याच्यापापड्या, बटाट्याचे पापड वैगरे न तळता मायक्रोमध्ये भाजून घेतले.

(अल्पना)

माझ्याकडे LG micro+grill+convection oven आहे. भाजी,उपमा करण (कधीतरी नेहमी नाही), सुप साठी भाज्या शिजवुन घेण, पालक शिजवण, केक (साध्या मायक्रो वर/कन्व्हेक्शन वर) करण, शेंगदाणे भाजण, स्विट कॉर्न चटपटे करताना कॉर्न उकडण आणि अजुन बरच काही मी मायक्रोचा वापर करुन करते. (माझी मामी इडली, ढोकळा पण छान करते मायक्रो मधे पण मी एकदाच केलेल त्यात पण बिघडल नी बाहेर कुकर मधल चांगल झाल मग पुन्हा त्यात केलेल नाही)

(कविता.नवरे)

अनघा वीज बील तर थोड वाढतच (पण एकिकडे गॅसची थोडी बचत होते तो ही महागलाच आहे) अट्टाहासाने जे पदार्थ कुकर मधे पटकन होतात ते नाही करायचे मायक्रो मधे पण गॅस, मायक्रो अस दोन्ही नीट वापरल तर काहिच हरकत नाही. (वॉ. मशिन मुळे/फ्रिज मुळे पण बील वाढत. वॉ. मशिन तर उपयोगाच आहे मग आपण वापर काटकसरीने करतो ना तसच करायच) (१/२ किलो शेंगदाणे जास्तीत जास्त ८ मि. होतात. मायक्रो मधे वेळ वाचतो, गॅस वाचतो हे एक उदाहरण)

पल्लवी मायक्रो मधे २ प्रकारे केक होतो
१. मायक्रो मोड वर झटपट ५-६ मिनिटाचा केक (पुर्वी कधी पिल्सबरी रेडीमिक्स वापरुन कुकर मधे केक करुन बघितला आहेस का?असशील तर त्यात जसा होतो तसाच हा केक होतो मायक्रो झटपट केक)
२. कनव्हेक्शन वापरुन नॉर्मल otg मधे बेक करतो तसा केक

दोन्ही मधे केक सॉफ्ट, फ्लफी बिफी का कायतो होतो (केक सॉफ्ट व्हायला मिश्रण्/प्रमाण महत्वाच) फक्त कनव्हेक्शन वर browning effect मिळतो तो मायक्रो मोड वर मिळत नाही पण तरीही छान लागतो.

(अना_मीराच्या 'वीजबिल वाढतं का? ला कविता नवरेचं उत्तर)

सॉरी यार! मला माहित आहे की मी अस्थानी आलोय. इथे येऊन मी पचकणे शिष्टसंमत नाही. पण मायक्रोवेव्ह बद्दल कविताने जे मेन्शन केलय त्या बद्दल काही मजकूर हाती लागला. राहावलं नाही म्हणून त्याची लिंक देतोय.

http://www.mercola.com/article/microwave/hazards.htm
http://www.relfe.com/microwave.html

आपण साधं प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये साचवून ठेवलेलं पाणि पितो, ते सुद्धा स्लो पॉईझन सारखं कार्य करतं म्हणे. कारण सगळ्याच बाटल्या चांगल्या प्रतीच्या प्लॅस्टिकपासून बनवलेल्या नसतात. त्या वाईट प्रतीच्या प्लॅस्टिकचे गुणधर्म प्यायच्या पाण्यात अंशतः उतरतात.

भाकरीचा चंद्र मिळवण्यासाठी कराव्या लागणा-या रोजच्या 'जगायच्या' धबडग्यात इतक्या बारीकसारीक गोष्टींवर आपलं लक्ष नसतं, आणि आधुनिक काळाच्या गतीने जायचं असेल तर ते परवडणारंही नसतं!

आधुनिक विज्ञानाने सुखसोयींबरोबर त्यांचे दृश्य/अदृश्य, चांगले/वाईट परिणामही आणलेले आहेत. आणि जाणते/अजाणतेपणे आपण ते स्वेच्छेने/जबरदस्तीने भोगतो आहोत. हे खरं की नाही?

मी इथे येऊन डिस्टर्ब केलं असेल तर माफी मागतो.

(अभिजा)

कन्व्हेक्शन मोड वर अ‍ॅल्युमिनियमची केकची भांडी चालतात अस ऐकल. कुणाला त्याबद्दल माहिती आहे का? कोणी वापरली आहेत का? असतील तर कशी वापरायची? नेहमीच्या otg मधे वापरतो तशीच वापरायची का?
(मी कन्व्हेक्शनवर केलेला केक (वर फोटो टाकलाय तो) काचेच्या भांड्यातच केलाय)

(कविता नवरे)

मायक्रो मोड वर केक कसा करयचा त्याच.

मायक्रो सेटिंग अस ठेव

मायक्रो मोड ऑन (start च बटण न दाबता पुढच सेटिंग पुर्ण करायच मग शेवटी स्टार्ट च बटण दाबायच)---> ९०० पॉवर (माझ्याकडे हिच हाय पॉवर आहे) किंवा १००%---->३ मिनिट--->७५० पॉवर किंवा ८०%---->२ मिनिट--->आता स्टार्ट बटण दाबा
अस केल्याने केकच भांड आधी हाय पॉवर वर ३ मिनिट फिरेल नंतर ऑटोमॅटिकली ७५० पॉवर वर २ मिनिट फिरेल.

येव्हढ करुन केक झाला नाही अस वाटल तर पुन्हा ३० सेकंद/१ मिनिट गरज असेल त्या प्रमाणे फिरवा.

(कविताची केकची रेसिपी)

मी रेगुलर अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात केला केक. अन बनाना ब्रेड एकदा काचेमध्ये केला. आता नंतर मात्र दरवेळी अ‍ॅल्युमिनियम्चं आइसक्रिमचं लांबट ब्रेड बॉक्ससारखं भांड असतं ना त्यात केला. अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात जास्त चांगला होतो केक काचेच्या भांड्यापेक्षा असा माझा अनुभव.
कविता चॉकलेट केक अन्नपुर्णा अन एलजी चे कुकबुक या दोन्हीच्या रेफरंसनी केलाय. धाडते रेसेपी.
अ‍ॅना, मी अजून केला नाही केक मायक्रो मोड मध्ये. पण होतो चांगला असं ऐकलय. ७-८ मिनिटातच होतो म्हणे. त्या केकची रेसेपी वेगळी असते. कविताकडे आहे बहुतेक..

(अल्पना)

वरती अभिजित ने दिलेल्या लिंक्स मधे तथ्य आहे. तुम्हाला पटत नसेल तर लोकांची माहिती चुकीची आहे असा निष्कर्ष कृपया काढु नका. प्लास्टीकचे अत्यंत घातक परिणाम शरिरावर होतात हे सत्यच आहे. इथे निदान बिपीए वगैरे माहिती देणे आजकाल गरजेचे आहे त्यामुळे कळते तरी. देशात सगळाच सावळा गोंधळ असतो

(कराडकर)

१ ते २ वर्षांखालील लहान मुलांसाठी काही बनवताना अगदी पाणी गरम करण्यासाठी सुद्धा मावे अजिबात वापरु नये. त्याची अनेक कारणे आहेत. मी इशान साधारण दीड वर्षाचा होइपर्यंत त्याचे सर्व खाणे स्टीम कूक/हीट करायचे पथ्य कसोशीने पाळले. मग एकदा केले तर काय होते असे करुन कधीतरी पुर्णच सुटली ती सवय पण तरीसुद्धा पदार्थ बनवण्यासाठी नाहीच वापरत. तसेच मायक्रोवेव मधुन होणारे लीकेज (विशेषत: expecting mothers ना) घातक असते असे वाचले होते. लीकेज तपासायची एक सोपी पेपर पद्धत आहे. ही सर्व माहिती शोधुन टाकते इथे.

मावेचा वापर किती कमी ठेवावा ह्याची लिटमट टेस्ट म्हणजे वापरायच्या आधी त्याच्या टॉपवरील धुळीत जो पदार्थ करायचा आहे त्याचे नाव लिहिता आले पाहिजे

(सिंडरेला)

अरे वा.. इथे भरपुर माहिती मिळाली की...सगळ्यांना धन्यवाद. (नीधप, अल्पना, कविता - यांना सजेशन्स बद्दल; अभिजा, कराडकर आणि आर्च ला माहिती पूर्ण लिंक्स बद्दल)

मायक्रोवेव्ह वापरावा की न वापरावा.... हं मलाही हा प्रश्न आहेच. खरे सांगायचे तर, आज पर्यंत मी एकदाही माझ्या मुलांच्या कुठल्याच खाद्य पदार्थाला मावे वापरलेला नाही. त्यांचे जेवण मी नेहमीच गॅस वर बनवते / गरम करते. सासरी शार्पचा होता पण सिंडी म्हणते तसे त्याच्या टॉपवर भरपूर धुळ जमा झाल्यावरही मी काहीच वापर केला नाही म्हणुन साबांनी तो नणदेला देऊन टाकला पूर्वी नोकरी करत असतांना ऑफिसातल्या मावेत जेवण गरम करणे आणि कधीतरी पापड भाजुन घेणे एवढेच केलय.

मायक्रो वेव्ह घेण्याचे काही कारणे म्हणजे,
१. नेहमी फसणारा केक
२.तेल कमी वापरुन नॉन वेज बनवता येते, असे ऐकलय.
३. जे पदार्थ हॉटेल मध्ये खातो ते कधीतरी घरी करुन बघायची हौस पूर्ण करण्यासाठी (तंदुरी, टिक्का, ग्रिल्ड ई.)

यावर मावे व्यतिरिक्त दुसरा काही उपाय सुचवलात तर मावे कँसल

मायक्रोवेव्ह हानीकारक आहे, याबद्दल मला शंका नाही. पण महिन्या दोन महिन्यात कधीतरी वापरायला हरकत नसावी असे वाटते.

यावर चर्चा व्हावी असे वाटते.

(प्रिन्सेस)

पूनम Happy

मुलींनो, मा.वे. वापरा किंवा न वापरा पण त्या वरील धूळ मात्र पुसुन टाकत जा. नाहीतर गॅसवर शिजणार्‍या पदार्थात ती जाईल आणि ते मात्र नक्कीच चांगले नाही. ..
पण एक आहे, मा.वे खुप उपयोगी वाटतो मला. मी अन्न शिजवत नाही त्यात पण एखादा पदार्थ थोड्या प्रमाणात थोडासाच गरम करण्यासाठी नेहमीच गॅस लावण्यापेक्षा मी मा.वे मधे गरम करते. हल्ली दाणे,धणे,जीरे,रवा,खोबरे असे काय काय कोरडे पदार्थ भाजण्यासाठी मी वापरते (इथेच टिप मिळाली होती). ३ मिनिटात तयार. काचेमधे गरम करते.

(सुनिधी)

हो, पदार्थ गरम करताना झाकण ठेवावे पण पुर्ण बंद करु नये. मा वे मधे ठेवायची जाळीची झाकणी मिळतात. दाणे, रवा इ इ भाजताना त्यावर पेपर टॉवेल टाकावा.
झाकण ठेवल्यामुळे पदार्थ जास्त गरम झला तर बाहेर उडुन मा वे खराब होत नाही.
एखादा पदार्थ गरम करायचा असेल तर शक्यतो इंटर्व्हल्स मधे करावा कारण मा वे मधे कधी कधी एकसारखा गरम होत नाही. वरती गरम पण आत थंड राहु शकतो. पदार्थ बाहेर काढुन, नीट ढवळुन परत गरम करावा.

(लाजो)
(मोगरा.केतकी वांगंही भाजतात)

माझ्याकडेही कवितासारखाच एलजी चा मायक्रोवेव्ह आहे आणि सध्या तरी माझ्याकडे तो प्रचम्ड प्रमाणात वापरला जातोत. त्याचाच आधार आहे सध्या एल जी च हे मॉडेल छान आहे.
यात सा. खिचडी मी सारखीच करते. [मला थंड नी दिली होती ती रेसिपी...आणि काही कवितानी][यांच्याकडे मागा रेसिपीज त्या देतील...आणि मलाही त्या मेला लागल्या हाती]

(मनिषालिमये)

माझ्याकडेही कविताकडे आहे तोच मा.वे. आहे. ३ वर्ष झाली घेऊन, पण मी फारसा उपयोग करत नाही, म्हणजे जेवायला बसताना पोळ्या, भा़जी गरम करते, त्यासाठी मा.वे. बरोबर मिळालेली प्लॅस्टिक भांडी वापरते. कालच मी भरपुर सुके खोबरे भाजुन ठेवले, आणि काही दिवसांपुर्वी मी यात २ किलोची थालिपिठाची भाजणी भाजली, अजिबात हात दुखले नाहित. आता दिवाळीची बरीच तयारी आधी करता येते. चिवड्याकरता शेंगदाणे, पोहे भाजुन घेते, बेसन लाडूचेपण बेसन थोडे मा.वे. मध्ये भाजते, मग थोडे गॅसवर भाजते.

केक साठी मला एक नॉन-स्टिक पॅन सारखे पॅन मिळाले आहे, त्यात केक केला पण माझा बिघडलाच. कविता मला सांगशील का प्रमाण आणि टेंपरेचर सेटींग तु वर दिलेले मी लिहुन ठेवते.

माझ्या माहितीप्रमाणे यात प्लॅस्टिक भांडी रिहिट साठी चालतात, पण शिजवण्यासाठी काचेचीच भांडी वापरावीत.
मी तर श्रीखंडाच्या रिकाम्या ड्ब्यातही गरम करते पण १ मिनिटाच्यावर नाही. मला सगळ्यात जास्त याचा उपयोग defrost साठी होतो, सकाळ्च्या घाईत खोबरे, कांदा-खोबरे वाटण फ्रिजरमधुन काढलेले यात defrost करुन घेतले की लगेच वापरता येते.

पूनम, मी केलाय तो क्लास, त्यावर फोन नं. दिला असेल तिकडे फोन करुन वेळ घे. साधारणपणे त्यांचे दिवस ठरलेले असतात, त्या दिवशी जायचे त्या तीन पदार्थ करुन दाखवतात आणि खायला पण देतात. मला त्याची ३ कुपन मिळाली होती, तीन वेळा काय कप्पाळ जाणार ते बघायला म्हणुन मी माझ्याबरोबर २ मैत्रिणींना घेऊन गेले होते, तीन्ही कुपन एकाच दिवशी वापरुन टाकली. पुण्याला एक पुस्तक मिळते त्यात सगळ्या रेसिपीज थोड्या मा.वे. मध्ये तर थोड्या गॅसवर कशा करायच्या ते दिले आहे. नाव मी विसरले, घरी गेल्यावर बघते, मी अ.ब. चौकातुन आणले होते.

(वर्षा११)

नंदिनी, कन्वेंशन मोड मध्ये मेटलची भांडी वापरता येतात.
मी मायक्रो मोड मध्ये शक्यतो काचेची भांडी वापरते.

माझ्या मायक्रोव्हेवबरोबर गीता नारंगचे कुकबुक मिळालय. त्यात कोणत्या मोडमध्ये कोणती भांडी वापरता येतात दिलय.
त्यानुसार
ग्लास सिरॅमिक - मायक्रो (जर मेटल रिम नसेल तर), ग्रील, कॉम्बो, कन्व्हेंशन
फॅन्सी सिरॅमिक जसे की पॉटरी, पोर्सेलिन वै) - फक्त कन्व्हेंशन (ते सुद्धा जर त्या भांड्यावर लिहिले असेल तर)
मेलॅमाइन सारखे प्लास्टिक - कोणत्याही मोड मध्ये वापरू नये
स्पे. मायक्रो प्लास्टिक - फक्त मायक्रो मोड (जर भांड्यावर तशा सुचना असतिल तरच)
मेटल डिशेस - फक्त कन्व्हेंशन मोड
बटर पेपर - फक्त मायक्रो मोड
रिसायकल केलेले पेपर प्रॉडक्ट - कोणत्याही मोडमध्ये नाही
लाकडी भांडे -फक्त मायक्रो मोड मध्ये थोडावेळा करिता गरम करण्यासाठी
अल्युमिनियम फॉइल - माय्क्रो मोडमध्ये शिल्डींगसाठी (मी अजुन वापरली नाही. माझ्यामते तरी अशी वापरल्यास स्पार्किंग होवु शकते) ग्रील मोड मध्ये शिल्डींगसाठी (वापरुन बघितलिये), कॉम्बी अन कन्व्हेंशन मध्ये वापरता येते.
अ‍ॅल्युमिनियम फॉइलची भांडी (कंटेनर) - ग्रील मोडमध्ये शिल्डिंगसाठी व कॉम्बी अन कन्व्हेंशन मोडमध्ये वापरता येतात.
क्लिंग फिल्म - फक्त मायक्रो मोड (पण मायक्रो मोड मध्ये सुद्धा ती गरम होवून भांड्याला चिकटते बर्‍याचदा असा अनुभव आहे)
क्रिस्टल ग्लास वैगरे कोणत्याही मोडमध्ये वापरू नयेत.

आईच्या केनस्टार च्या माय्क्रो बरोबर संजिव कपुरचे पुस्तक मिळालय. ते आईनी मलाच दिलय पण अजुन त्यात बघुन काही केलं नाही.

(अल्पना)

यानंतर मावे बरोबर आलेल्या कूपन्सच्या वापराची चर्चा झाली. एकूण, कूपन्स वापरावीत, त्याने उपयोग होतो हा निष्कर्श काढला गेला.

पूनम खुप खुप धन्यवाद Happy

मा.वे. साठीचा राईस कुकर हा प्लॅस्टिकचाच असतो का? (मी शक्यतो प्लास्टिक वापरतच नाही म्हणुन विचारतेय)

व्हेज रेसिपीं पैकी ग्रिल वर काय होते?

पिझ्झा साठी सेटिंग काय ठेवावे. (पिझ्झा मायक्रो+ग्रिल मोड व्र करुन बघितलाय. झालाय पण गॅस वर पॅन मधे केल्यावर जेव्हढा क्रिस्पी होतो तेव्हढा नव्हता झाला. हा क्रिस्पीनेस मा.वे. वर कसा येईल)

वांग मला तरी भाजायला जमल नाही (मी मायक्रो, मायक्रो+ग्रिल, नुसत ग्रिल मोड वर तेलाचा हात ठेवुन करुन बघितलय दरवेळी वांग शिजत साल पटकन निघते पण तो रोस्टिंग इफेक्ट त्याचा तो स्पे. भाजल्याचा वास/स्वाद दोन्ही नाही आल. त्यासाठी काय टिप्स) शेवटी गेल्या वेळी मी मायक्रो वर शिजवुन पुन्हा गॅसवर थोडावेळ भाजल

अग हो कविता तुला सांगायचं राहिलं. परवा दसर्‍याला मी त्या उंच रॅकवर ग्रील मध्ये वांग ठेवलं होतं त्यावेळी भाजल्याचा इफेक्ट आला होता. पण १५-२० मिनिटं लागली. उपयोग इतकाच झाला की गॅसवर वांग भाजल्यावर बर्नरमध्ये काजळी अदकते व लगेच ते साफ करावे लागतात ते करावं नाही लागलं.
व्हेजमध्ये पनीर टिक्का केलय एकदा ग्रीलवर. पण किती वेळ लागला वैगरे नाही आठवत आता. परत केल्यावर लगेच लिहिन इथे.
मी अजुन पिझ्झा केला नाही. पण माझ्याकडच्या एका पुस्तकामध्ये फक्त ग्रील मोड वापरायला सांगितलाय ८-१० मिनिटं तर दुसर्‍यामध्ये फक्त कन्व्हेंशन मोड वर १०-१५ मिनिटे. बहुतेक २३०-२५० सेल्सियस तपमान असेल.

धन्यवाद पूनम. मी केला होता एकदा पिझ्झा, माझ्या मैत्रिणीने सांगितले होते सेटिंग, बघुन मग लिहिते ईथे. मस्त क्रिस्पी झाला होता.

तिकडे विचारलेल्या प्रश्नाला इकडे उत्तर.
माझा गोदरेजचा कॉम्बो आहे. १ वर्ष ७ तारखेला पूर्ण होतंय. त्यामुळे आता त्या कुकींग क्लासच्या कूपन्स चा काही उपयोग नाही.

लाजो किंवा अजून कुणीतरी हा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर. इथे कॉम्बो जास्त मिळतात. नुसते मिळत नाहीत असं नाही पण कमी व्हरायटी मिळते. इथे मावे घेतला जातो तो फॅमिल्यांमधे. आणि आपल्याकडे इलेक्ट्रीक किंवा गॅस टॉप ओव्हन जे मिळायचे पूर्वी ते काही खूप रूळले नाहीत. आणि आता ते बहुतेक मिळत पण नाहीत. त्यामुळे कॉम्बो घेण्याकडे लोकांचा कल असतो. अमेरिकेत मुलगा/मुलगी कॉलेज शिक्षणासाठी बाहेर पडला/ली की डॉर्म रूम मधे बाकी काही नाही तर मावे घेतला जातो. किंवा अपार्टमेंट मधे एकत्र रहाणारे ग्रॅड स्टुडन्टस मावे घेतात. अपा. मधे ओव्हन येतोच त्यामुळे साधा मावे बास होतो. तसंही ग्रॅड स्टुडंट ना कुकींगचे उजेड पाडायला वेळ कुठे असतो! मावे हा फ्रोजन डिनर गरम करून घेणे यासाठीच ते लोक जास्त वापरतात(आम्ही तरी तसंच करायचो पण तो इतिहास झाला).. असो...

पुनम मला नवीन घागा उघडता येत नव्हता Sad

उषा पुरोहीत :::मायक्रोवेव्ह खासियत

हे पुस्तक मी नुकतच आणलंय थंड च्या सांगण्यानुसार, अजुन पाहीलं नाहीये पण तिच्या म्हणण्याप्रमाणे हे बरच उपयुक्त आहे.

सुधा कुलकर्णी यानचे "मायक्रोवेव्हमधील पदर्थ" ही चांगलं आहे अस ऐकल पण अजुन आणलं नाहीये मी.

पिझ्झा मी तिन्ही मोडवर करुन पाहीला पण मायक्रो मोडवरच छान जमला.

मी त्याबरोबर मिळालेली प्लास्टीक भांडी वापरते.

शक्यतो काचेची भांडीच वापरते पण प्लास्टीकही वापरते. इतकी कुठे आपण सतत वापरतोय. सोईप्रमाणे वापरावीत हा विचार करुन वापरते. तसे तर अनेक वैधानिक ईशारे आपण पाळत नाहीच. अगदी चहा पिणे चांगले नाही , कॉफी पिऊ नका , अल्युमिनिअम वापरु नका. आपण हे पाळतो का. रस्त्यावर खाऊ नका असे कितीही सांगितले तरी पाणीपुरी र्स्त्यावर खाण्यातच मज्जा आहे.
मी हाच विचार करुन प्लास्टीक भांडी गरजेप्रमाणे वापरते. [या सगळ्याचा शरीराला अपाय होईपर्यंत माझी नव्वदी ओलांडलेली असेल Proud ]

रेसिपीज कुठे लिहायच्या?? याच धाग्यावर की आणखी कुठे?

Pages