खमंग खरपुस पापड पराठा !

Submitted by गिरिश देशमुख on 18 June, 2017 - 09:49
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भिजवलेली कणिक, भाजलेले पापड (कोणतेही, शक्यतो मीरे युक्त), तेल, तिखट, ओवा, जिरेपूड, धणेपूड, मीठ

क्रमवार पाककृती: 

कणकेचा मध्यम आकाराचा उंडा घेऊन त्याची जाडसर पोळी लाटून घ्या .
पोळीवर तेल लावून घ्या, त्यावर थोडे ( चवी आणि आवडीनुसार) तिखट, ओवा, जिरेपूड, धणेपूड, मीठ पसरवून घ्या,
आता या पोळीचे सुरीने चौकोनी काप पाडा आणि त्यावर पापडाचा चुरा पसरवून घ्या !
पोळीचे तुकडे एकावर एक रचून घ्या, चळत रचताना शेवटचे 2- 3 तुकडे पालथे घाला.
चळत हाताने थोडी दाबून पराठा लाटण्यासाठी उंडा बनवून हलक्या हाताने जरा जाड पराठा लाटून घ्या.
पराठा फ्राय पॅन/ तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूनी खरपूस फ्राय करून घ्या (पुरी सारखे तळले तरी छान).
पापुद्रे दार, कुरकुरीत, खरपूस पराठा तयार !

तयार पराठ्याचे तुकडे करून, टोमॅटो सॉस / दही / लोणचे इ. बरोबर सर्व्ह करा !

माहितीचा स्रोत: 
पारंपारिक
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तोंपासु.
करून बघितले पाहीजे.

आजच करून पाहिला...मस्त झाला होता...करायला एकदम इजी आणि चवीला एकदम चटपटीत... साबां पण सांगेन ही रेसिपी आता...

आता या पोळीचे सुरीने चौकोनी काप पाडा आणि त्यावर पापडाचा चुरा पसरवून घ्या !
पोळीचे तुकडे एकावर एक रचून घ्या, चळत रचताना शेवटचे 2- 3 तुकडे पालथे घाला.
चळत हाताने थोडी दाबून पराठा लाटण्यासाठी उंडा बनवून हलक्या हाताने जरा जाड पराठा लाटून घ्या.
>>
या स्टेप्स मध्ये काही गंडलंय का? Uhoh

बाजूंनी (कडेने) सारण बाहेर येईल न आणि तळतांना/भाजतांना...
त्यापेक्षा एका पोळीवर सारण ठेवून दुसर्‍या पोळीनी झाकून जास्त सोपं पडेल. बंद करायलाही सोपं पडेल हे प्रकरण

मी केला तेव्हा थोडं सारण बाहेर आल पण मी परत आत टाकलं ते.. व्यवस्थित गोलसर दाबल्यावर बरोबर झालं परत....आणि तळले नाहीत फक्त तव्यावर तेल टाकून परतले.... तळताना प्रॉब्लेम होऊ शकतो बहुतेक...

Mala tar kase karayche kahi samjalech nahi. Koni kelyas step by step photo dya na.
Mobile madhe marathi typing sathi konata app/keyboard vapraycha.

<<<>>>>
मलाही नीट्स कळलं नाही आहे हे प्रकरण...

मला झालेला बोध असा,
सर्व मसाले घालून कणिक मळून घ्या , तिची मोठी पोळी लाटा
या पोळीचे २ इंच x२इन्च असे तुकडे करा.
एक तुकडा खाली ठेवा त्यावर पापडाचा चुरा पसरवा, त्यावर दुसरा तुकडा ठेवा, चुरा अगदी कोपर्या पर्यंत नको नाहीतर बाहेर येईल
परत त्यावर पापड चुरा , परत तुकडा, पापड चुरा, तुकडा, पा.चू, तुकडा, पा.चु, तुकडा
आता हि चवड हातानी थोडी दाबून घ्या,
हलके हलके दाबुन त्याचा गोळा बनवा
या गोळ्याचा पराठा लाटा.
* मी बनवूनन पहिला नाहीये, हे माझे इंटरप्रीटेशन आहे, पदार्थ बिघडल्यास मंडळास जबाबदार धरू नये

Mobile madhe marathi typing sathi konata app/keyboard vapraycha. >> गुगल इंडिक किबोर्ड.

Mobile madhe marathi typing sathi konata app/keyboard vapraycha

>>> स्वरचक्र (मेड इन इंडिया!)

अस करायचंय का?? मी तर नॉर्मल पोळी लाटून त्यावर सगळे वरती दिलेले मसाले असे थोडे भुरभुरवले ...मग सूरीने चार भाग केले पोळीचे...मग भाजलेल्या पापडाचा चुरा पसरवला... मग दोन सुलटे आणि दोन त्यावर उलटे चतकोर भाग पसरवले... दाबले...आणि परत लाटले...आणि मग तव्यावर शेकले...