विस्मृतीत माझ्या ...

Submitted by प्रकाशसाळवी on 17 June, 2017 - 02:34

विस्मृतीत माझ्या ...
***
विस्मृतीत माझ्या ...
----------------
विस्मृतीत माझ्या तुझाच ध्यास आहे
गंधाळलेल्या फुलांना तुझाच वास आहे
**
बोलावण्यास तुजला वापरु शब्द कोणते?
तु ना येण्याची खंत मृगजळास आहे
**
आठवती सरी ज्या भिजवून रात्र गेल्या
वीरहात तुझ्याही मजला मधुमास आहे
**
विसरलास जरी तु त्या दिल्या वचनांना
तो चंद्रही साक्ष त्याची आज खास आहे
**
नसण्याने तुझ्या लागले जिवनाला ग्रहण
ठाऊक आहे मला ते ग्रहण खग्रास आहे
**
थोडे ऊन थोडा पाऊस हे काय आहे?
नक्कीच हा सुखाचा श्रावणमास आहे
**
वाटले जरी ते आरशातले बिंब खोटे
ह्रदयीच माझ्या तुच आसपास आहे
**
पाहिले कधी का विभाजन होते जलाचे ?
मी तु पणाने खरेच आपाला ह्रास आहे
**
प्रकाश साळवी
१५-०६-२०१७
०९१५८२५६०५४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान