एक वेदना

Submitted by र।हुल on 14 June, 2017 - 10:28

जाणिवपूर्वक प्रयत्न करूनही मला कधीच तुझ्या अंतरंगात डोकावता आलं नाही. मी कायम काठावरच राहीलो आणि काठावरचं जगणं म्हणजे वेदनाच! जर तु थोडंफार कधी मला समजून घेतलं असतंस तर..तर मीही तुला उमगलो असतो. कदाचित एकदम वेगळा भासलो असतो..अगदी तुला हवा तसाच. पण तु कधीच मला समजून घेतलं नाहीस. नेहेमी तु तुझ्याच कोषात मग्न होतीस. तु कसला हट्ट धरावा आणि मी तो पुर्ण करावा असं कधीच घडलं नाही. खुप वाटायचं की तुझे हट्ट पुरवून तुझे 'लाड' करावेत, तुझा रूसवा काढावा, कधी तुझ्यावरच ओरडावं तर कधी शांतपणं नुसतं तुलाच ऐकत रहावं पण..पण आता सगळंच संपलय गं. त्या दिवशी तुझं लग्न ठरलं अन् तू बोल्लीस, 'जा निघून तू माझ्या आयुष्यातून कायमचा' त्याचवेळी मीही तसं निघून जाण्याचा निर्णय घेतला. पण तु जर मी म्हणत होतो तसा विचार केला असतास तर आज आपण सोबत असतो. पण जाऊदे आता.
फक्त जाताजाता तुला एक आठवण करून द्यावीशी वाटतेय, कधीकाळी तुलाही माझी ओढ होतीस. पण जा तू तुला हव्या त्या मार्गानं. अगदी नि:शंक मनानं जा. हवंस तर मला कायमचं विसर. तुझ्या जाण्यानं तयार झालेली माझ्या जिवनातील पोकळी कधीही भरून निघणार नाही पण तुला विसरायचा प्रयत्न नक्की करेन आणि नाहीच शक्य झालं तर..तर मात्र 'हे' जग सोडून दूरवर निघून जाईन.
―₹!हुल.

[त. टी.― शेवटच्या वाक्याचा अर्थ 'आत्मघात' या दृष्टिनं लेखकाला अभिप्रेत नाही.]

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान