मिरच्यांचे लोणचे - फेसलेली मोहरी घालून

Submitted by स्वाती_आंबोळे on 14 March, 2011 - 16:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी लाल मोहरी
एक टीस्पून हळद
दोन टीस्पून कच्चा हिंग
तीन ते चार टीस्पून मीठ
अर्धा टीस्पून मेथीदाणे
पाच-सहा लिंबांचा रस
एक टीस्पून तेल

क्रमवार पाककृती: 

मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत. त्यात मीठ, हळद व एक टीस्पून हिंग घालावा. हे मिश्रण नीट एकत्र करून ठेवावे.
एक चमचा तेलात मेथीदाणे तळून घ्यावेत. हे तळलेले मेथीदाणे मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत. थोडा लिंबाचा रस घालून लाल मोहरी बारीक वाटून घ्यावी. मेथ्या आणि फेसलेल्या मोहरीची पूड मिश्रणात मिसळावी.
उरलेल्या तेलात एक टीस्पून हिंग तळून घ्यावा व तोही मिसळावा. वरून उरलेला लिंबांचा रस घालावा.
हे सर्व मिश्रण पुन्हा नीट एकत्र करून बाटलीत भरून ठेवावे.
वरून (हवी असल्यास) फोडणी थंड करून घालावी.

अधिक टिपा: 

काळी मोहरी वापरल्यास 'ती' चव येणार नाही. कडू व्हायची शक्यता जास्त. Happy
लाल मोहरी घेतांनाच एखादा दाणा चावून बघावा. तो तिखट लागला तर ती मोहरी वाटल्यावर चांगली चढते. (सुट्टी मोहरी मिळत नसेल तिथे हे जमणार नाही. पण भारतात जमेल.)
चवीनुसार लिंबू,मीठ याचे प्रमाण बदलावे.
लिंबूरसाऐवजी कैरीचा कीसही चांगला लागतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जल्लां ही माझ्या आधी नंबर लावायची काय भान्गड आहे???? Proud

लालू आणि सीमा, तुम्ही उखाणा घेऊन टाका:
............................................
काकडीचं रायतं करते माझा नंबर पयला Biggrin

लालू, फोटो मस्त आला आहे. पण तू लामो घातलीस की कामो ते सांग...

मी_पल्लवी, मिळेलच याची खात्री नाही. सहसा मोठा दाणा असलेली काळी मोहरी मिळते इथे तरी.
लाल क्वचित नशीबाने मिळाली तर. माझ्याकडे भारतातून आणलेलीच आहे थोडी.
पण वर मृण्मयीने काळी मोहरी वापरूनही लोणचं चांगलं झाल्याचं लिहिलंय, तेव्हा प्रयोग करायला हरकत नाही. Happy

तीन इंग्रो शोधून झाले, लाल मोहरी मिळत नाही. घरी भारतातून आणलेली बारीक काळी मोहरी आहे . तीच घालून करून पहावे आता .

मीही आज केले.. माझ्याकडची मोहरी बहुतेक काळीच आहे.. Happy
छान झाले आहे एकदम!! फोटो नंतर टाकीन..
पहिल्यांदाच असं लोणचे वगैरे केले... मजा आली! Happy

मृण्मयी, तुमच्या तिकडे लाल मोहरी काळ्या रंगाची मिळत असेल Proud

(एकदा मी कामो घालून काकडीचं रायतं केलं होतं तर अगदी कडूजार झालं होतं Sad लामो सहज मिळत असतानाही कामो का घातली होती? ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 'आपली आवड')

मी पण केले हे लोणचे . मस्त झाले . जबरी तिखट आहे पण मजा येते. पहिल्या दिवशी जरा कडवट वाटत होते पण दोन दिवसांनी एक्स्पेक्टेड चव आली. धन्यवाद स्वाती.

पेशल तिखट मिरच्या आणून लोणचं घालण्यात आलेलं आहे. मव्हरी जी होती तीच घेतलीय. मिक्सर मध्ये चांगली फेसलीय. बायडी लोणचं ठेवलेल्या पातेल्यापासून दूर झाली झिनझीण्यांमुळे... फार फार टेस्टी झालेलं आहे. धन्यवाद पाकृ दिल्याबद्दल. हा फोटू...
IMG_20170604_194718941.jpg

रच्याकने, याच लोणच्यात मुळा मिरच्यांच्या साईज मध्ये कापून मीठ लावून पाणी काढून, कोरडा करून मग यात वापरला तर? सध्या लय फ्रेस मुळे आहेत मार्केटात म्हणून सुचलं...

एकदम लिथल काँबो होईल का? मुख्य म्हणजे टिकेल का?

Pages