Submitted by सत्यजित... on 11 May, 2017 - 18:37
कसे या मनाला कसे जोजवावे?
जरा दुःखही शांत व्हावे,निजावे!
कुठे भागते आपलेही खरेतर?
सुखांनी सुखांना कितीदा गुणावे!
कधी ओल जाते कधी ऊल जाते
कळेना कसे या मनाला चिणावे!
किनारा कधी सांगतो का कुणाला?
किती सागराने दिले हेलकावे!
तिचे ओठ देतील तपशील नंतर
मुक्याने तिने जर तुला बोलवावे!
विसरणे तसे फार असतेच अवघड
उगां एकमेकां कधी गुणगुणावे!
(असे या मनाला,असे जोजवावे!)
—सत्यजित
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच!
छानच!
छान कविता फक्त चिणावे याचा
छान कविता फक्त चिणावे याचा अर्थ मला
माहीत नाही कृपया सांगाल का
तिचे ओठ देतील तपशील नंतर
तिचे ओठ देतील तपशील नंतर
मुक्याने तिने जर तुला बोलवावे!>>>मस्तच सत्यजित
आवडलि
मेघाजी,प्रमोदजी,पंडितजी
मेघाजी,प्रमोदजी,पंडितजी मनापासुन धन्यवाद!
प्रमोदजी,'चिणावे' हे '(भिंतीत) लिंपावे' अश्या अर्थाने आहे!
विसरणे तसे फार असतेच अवघड
विसरणे तसे फार असतेच अवघड
उगां एकमेकां कधी गुणगुणावे! ....
सही !!!!..........
अप्रतिम ...
अप्रतिम ...
कुठे भागते आपलेही खरेतर?
कुठे भागते आपलेही खरेतर?
सुखांनी सुखांना कितीदा गुणावे!
वाह! क्या बात है!