पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडून गेली

Submitted by विशाल कुलकर्णी on 4 May, 2017 - 03:19

रस्त्यास त्या बिचाऱ्या सांगाल काय काही ?
पथभ्रष्ट भास्कराला शिकवाल काय काही ?

सगळे खरेच आहे खोटे न येथ कोणी,
रचल्या चितेस सांगा बोलाल काय काही ?

'योगी' कितीक झाले, होतील लाख मुल्ला
ऐन्यास बोल थोडा लावाल काय काही ?

झोळी गळ्यात बांधुन दारात वाट पाहे
पुत्रास त्या 'बळीच्या' वाढाल काय काही ?

पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडून गेली
पाण्यास मार्ग आता दावाल काय काही ?

येतील दिवस तेही नांदू पुन्हा सुखाने
आशा चुकार वेडी रुजवाल काय काही ?

© विशाल कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान विशाल सर...
आपली नवीन कथा कधी येणार... बिलंदर फार आवडली होती...