Submitted by सत्यजित... on 20 April, 2017 - 23:08
चोर तर आहेच वर शिरजोर आहे
काळजाचा घोर हा घनघोर आहे!
जाळतो आहे जिवाला रोज थोडे
पावसाचा जोर या कमजोर आहे!
ऐन दुःखाचा पसारा मांडला मी
वाह् वा झाली,म्हणाले..जोर आहे!
तू नको जावूस माझ्या शांततेवर
वेदने,मी वादळाचा पोर आहे!
जिंदगी एकाच दुःखावर उधळली
मी हिशोबी,फार काटेकोर आहे!
वाचण्याआधीच हे लक्षात घे तू
मी कुणी नाही कवी,चितचोर आहे!
—सत्यजित
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर. अप्रतिम गझल!!
सुंदर. अप्रतिम गझल!!
मस्त ! आवडली !
मस्त ! आवडली !
छान आहे
छान आहे
धन्यवाद अक्षयजी,ऋषभजी,अनुयाजी
धन्यवाद अक्षयजी,ऋषभजी,अनुयाजी!
जिंदगी एकाच दुःखावर उधळली
जिंदगी एकाच दुःखावर उधळली
मी हिशोबी,फार काटेकोर आहे
छान.
तू नको जावूस माझ्या शांततेवर
तू नको जावूस माझ्या शांततेवर
वेदने,मी वादळाचा पोर आहे!
जिंदगी एकाच दुःखावर उधळली
मी हिशोबी,फार काटेकोर आहे!
वाचण्याआधीच हे लक्षात घे तू
मी कुणी नाही कवी,चितचोर आहे!>>>>>>>
वाह.! ! अप्रतिम.......आवडली
क्या बात है !!!!
क्या बात है !!!!
अमितजी,मीनलजी,शशांकजी,
अमितजी,मीनलजी,शशांकजी, मनःपूर्वक धन्यवाद!
सुरेख !
सुरेख !
दत्तात्रयजी धन्यवाद!
दत्तात्रयजी धन्यवाद!