उन्हाळा स्पेशल प्रयोग आंबा लस्सी विथ व्हॅनिला आईसक्रीम!

Submitted by कृष्णा on 20 April, 2017 - 05:06

काल उन्हाळा स्पेशल प्रयोगात हा एक सफल प्रयोग झाला म्हणून सर्वांसाठी देतोय!

आंबा लस्सी विथ व्हॅनिला आईस्क्रीम!

लहाणपणी नगरला असताना आईस्क्रीम लस्सी बर्‍याचदा प्यायलेली ती आठवली मग ह्यातुन हा माझा प्रयोग!

साहित्य :

१. ताजे दही १ लिटर
२. एक मध्यम हापूस आंबा
३. व्हनिला आईस्क्रीम
४ साखर.

कृती :

१. दही छान फेटून घ्या.
२. आंब्याचा रस काढून दह्यात घालून एक जीव पुन्हा फेटून घ्या.
३. साखर आवश्यक तेवढी.. आपल्या जितके गोड आवडते तसे.
४. एक अर्धा तास फ्रीझ मध्ये थंड करायला ठेवा.
५. गार गार ग्लास मध्ये ओतुन वर छान आईसक्रीमचा गोळा टाका (हवा तेवढा)

पुढे फोटो काढा थोपु कस्स्काय अपडेट साठी आणि गट्टम करा चव घेत घेत!

Mango lassi.jpgmangolassi 2.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy मस्त लागते, जिभेला मेजवानी आणि भूक गायब. आंबा जास्त घातला तर साखर पण नाही लागायची.
आईस्कीम घालून मिल्कशेक माहिती आहे. लस्सी चाखायला पाहिजे कशी लागते.

आंबा लस्सी मागच्याच आठवड्यात केली होती. आता पाहू आईस्क्रीम पण टाकून Lol

नगरला द्वारकासिंगची आईस्क्रीम लस्सी बर्‍याच वेळेला खाल्लेली आहे. मस्त असते एकदम. लहानपणी मला आंबट लस्सी आवडायची नाही पण आईस्क्रीम लस्सी म्हटले की मी एकदम तयार असायचो Wink

मस्त दिसतोय प्रयोग! Happy

लहाणपणी नगरला असताना आईस्क्रीम लस्सी बर्‍याचदा प्यायलेली ती आठवली मग ह्यातुन हा माझा प्रयोग!>>>> सेम हियर. आईसक्रिम लस्सी हा प्रकार पहिल्यांदा नगर मध्येच ट्राय केला. नाशिक मध्ये घट्ट लस्सी मिळायची पण त्यात आईसक्रिम नसायचं.

मस्तच...मलाही नगरची द्वारकसिंग लस्सी आठवली.. लस्सीमधे आइस क्रीम मला नवीन नव्हते, पुण्यात त्याला मस्तानी म्हणतात हे मात्र नव्याने कळालेले.

पुण्यात त्याला मस्तानी म्हणतात हे मात्र नव्याने कळालेले. >> मस्तानी आणि आईस्क्रीम लस्सी वेगळी असते. मस्तानीत लस्सी नसते. ते मिल्क शेक सारखे असते.

मस्तानी म्हणजे वितळलेले आणि लवकरच वितळणार आईस्क्रीम मिक्स करून खाणे.
पुढच्यावेळी मॅन्गो लस्सी घरी घेऊन येणार आणि मग आईस्कीम टाकून मस्तानी बरोबर खाणार. Proud

धन्यवाद सर्वांना! Happy

नगरला द्वारकासिंगची आईस्क्रीम लस्सी बर्‍याच वेळेला खाल्लेली आहे. मस्त असते एकदम>>>
यस!! ती लस्सी मस्त एकदम! आणि दुसरी एक स्वीट होमची मला वाटते! नक्की आठवत नाही आता बरेच वर्षे झाली त्याला!

कृष्णा मस्तच.. पण ती आईस्क्रिम ची आईडिया नाहि पटली.. दोन्ही वेगळे स्वाद ते एकत्र कसे बरे लागतील?
मिहि हापुस एक आंबा दह्यामध्ये घालुन थोडी साखर, वेलची घालुन मिक्सरला लावुन घेवुन लस्सी बनवते अन मग वरुन ड्रायफ्रुट टाकते.. काजु बदाम वगैरे.. मस्त लागते. Happy

पण ती आईस्क्रिम ची आईडिया नाहि पटली.. दोन्ही वेगळे स्वाद ते एकत्र कसे बरे लागतील?>>>

भावना, एकदा ट्राय करुन बघ! खूप छान लागते! Happy

भावना, एकदा ट्राय करुन बघ! खूप छान लागते!>>>>> +१
आईसक्रिम टाकलेल्या लस्सी खुप घट्ट जरी नसल्या तरी स्मुथ बनवाव्या लागतात. म्हणजे जास्त आंबट नको आणि त्याही पेक्षा दह्याचे बारिक पार्टिकल्स असतात ते जाणवले नाही पाहिजेत. अशा स्मुथ लस्सी मध्ये थोडं वेगळ्या फ्लेवरचं आईसक्रिम फार मस्त लागतं!
नाशिक मध्ये पुर्वी नाशिकरोडला बादशहा म्हणून रेस्टॉरंट होतं. तिथे बादशहा स्पेशल लस्सी मिळायची. त्यात तीन वेगळ्या फ्लेवरचे आईसक्रिम टाकून द्यायचा तो. पुढचा मजकूर लिहिणे आता शक्य नाही.....
Lol

श्र्रीरामपूरच्या आमच्या दळवी सरांच्या हॉटेल पारिजात मधली मँगो लस्सी आठवली >>> अरेरे आम्ही नाही टेस्ट केली. बाकी आईस्क्रीम खायचो. आम्ही रहायचो त्या घरमालकांचे पारिजातवाले खास दोस्त त्यामुळे ओळखीचे होते, आमच्या घरीही यायचे. आता श्रीरामपुर सोडूनही अकरा वर्ष झाली.

Pages