'कासव'ला ६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ

Submitted by चिनूक्स on 7 April, 2017 - 03:40

६४व्या राष्ट्रीय चित्रपट-पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.

'कासव'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्णकमळानं गौरवण्यात आलं आहे.

https://www.youtube.com/watch?v=Hs5kdjwmizU

डॉ. मोहन आगाशे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांनी केलं आहे.

'व्हेंटिलेटर', 'दशक्रिया', 'सायकल' या मराठी चित्रपटांनाही यंदा पुरस्कार मिळाले आहेत.

सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन.

मायबोली.कॉम 'कासव'चे माध्यम प्रायोजक आहेत.

Kaasav-new poster.jpg
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कासव चित्रपटाच्या निर्मितीमागे असणार्‍या सर्वांचे हार्दिक अभिनंदन

अभिनंदन...
आता चित्रपट पाहावा लागेल..

हार्दिक अभिनंदन! मागच्या महिन्यात स्पेशल स्क्रीनिंग झालं नागपूरला मोहन आगाशेंच्या उपस्थितीत काही वैयक्तिक कारणामुळे पाहू नाही शकले ..

अभिनन्दन !

बऱ्याच साईट्सवर नीरजाला बेस्ट फिल्म मिळाला असं लिहिलंय आणि कासव चा साधा उल्लेखही नाहीये. मराठी द्वेष इतक्या टोकाचा? MSM खोटारडेपणाचे अजून एक उदाहरण. वास्तविक बेस्ट फिल्म अक्रॉस ऑल लँग्वेजेस इज ए बिग, बिग डील !

बऱ्याच साईट्सवर नीरजाला बेस्ट फिल्म मिळाला असं लिहिलंय आणि कासव चा साधा उल्लेखही नाहीये. मराठी द्वेष इतक्या टोकाचा?
>>>>>
हा द्वेष की काय कल्पना नाही, पण हो मी देखील दोन ठिकाणी हेच अनुभवले.
आपणच आता ही बातमी अभिमानाने व्हॉटसपवर फिरवावी लागणार.

अभिनंदन सर्वांचेच

अभिनंदन..

गेल्या काही वर्षात अनेक मराठी चित्रपट गाजले. माझ्यासाठी सिडीज आणि यू ट्यूब हे दोनच पर्याय आहेत पण या दोन्ही माध्यमात ते उपलब्ध नाहीत. सिडीज चे मार्केट तर जवळ जवळ संपल्यातच जमा झल्यासारखे वाटतेय.
त्यामूळे निदान परिचय / परिक्षण तरी उपलब्ध व्हावे.

कासवकरता अभिनंदन.

काही वर्तमान पत्रांतून दशक्रिया ला पारितोषिक मिळालंय असं वाचलं. नक्की काय आहे?

दशक्रिया सर्वोत्तम मराठी चित्रपट.
कासव सगळ्या भाषांतल्या चित्रपटांत विजेता. श्याभची आई, श्वास प्रमाणे.

Pages