गोविंदराव, आय मिस यू! - श्री. विनय हर्डीकर

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

साक्षेपी लेखक व संपादक श्री. गोविंदराव तळवलकर यांचं काल निधन झालं. गेल्या वर्षीच्या 'अंतर्नाद'च्या दिवाळी अंकात श्री. विनय हर्डीकर यांनी गोविंदरावांवर एक लेख लिहिला होता, तो इथे पुनर्प्रकाशित करत आहे.

श्री. गोविंदराव तळवलकर यांना मन:पूर्वक आदरांजली.

***

Hardikar-1.jpgHardikar-2.jpgHardikar-3.jpgHardikar-4.jpgHardikar-5.jpgHardikar-6.jpgHardikar-7.jpgHardikar-8.jpgHardikar-9.jpg

***

हा लेख मायबोली.कॉमवर प्रकाशित करण्यास अनुमती दिल्याबद्दल अंतर्नाद, श्री. भानू काळे व श्री. विनय हर्डीकर यांचे मनःपूर्वक आभार.

***
प्रकार: 

गोविंद तळवलकरांचे म.टातील अग्रलेख सरस असत. >>> अगदी खरं. बाबांनी मला अग्रलेख वाचत जा, असं शाळेत असताना सागितलं (आमच्याकडे पहिल्यापासून म टा च येतो). ते बरेच वर्ष डोंबिवलीत राहायचे.

वरचा लेख सावकाश वाचेन.

नक्की का मिस करतायत लेखक ते काही समजलं नाही. पुस्तकांची चर्चा मिस करतायत असं असावं. पण वैचारिक मतभेदाने शेवटची काही वर्षे टोक गाठलेले, त्यामुळे ती चर्चा ही होणे शक्य झाले नसतेच.
आजच्या काळात असा संपादक आणि अशी व्यक्ती अशा टाईपची भाबडी भावना लेखकाची नसावी. तशी असली तर मग, त्याच काळात फ्रेम करून व्हाटस अ‍ॅप .. जाउदे.
या लेखात तरी जे वाटतं तेच आणि सडेतोड लिहिलंय. उगाच शेंदूर फास लिखाण नाही ते फार आवडलं. लहानपणी घरी मटा च यायचा. नंतरही मैफल इ. मध्ये गोंविंद तळवलकर याचे लेख वाचले आहेत. ते इतकी अंध भक्ती करत असतील असं वाटलं न्हवत.

लेखातील पहिला भाग खूप आवडला. काही वर्षांपूर्वी म.टा. लोकसत्ता आणी इव्हन केसरी वगरेंचा जो दबदबा होता, त्यातील अग्रलेखांची, त्या लेखकांची चर्चा होत असे, ते दिवस आमच्या पिढीने थोडेफार बघितले. त्याची आठवण झाली. पुढचा अर्धा भाग मात्र कंटाळवाणा वाटला - मी असे म्हण्टलो, ते रागावले वगैरे.

गोविंद तळवलकर कोणतेतरी टोपण नाव वापरून काही छोटे सदर लिहीत असत अशी चर्चा मी ऐकली आहे. लक्षात नाही.

मी त्यांचे 'भारत आ़णि जग' हे एकच पुस्तक वाचलेले आहे. ते मात्र अत्यंत वाचनीय आहे. सुरूवातीच्या भागात नेहरूंबदल जरा भक्तिभाव जाणवतो, पण नंतर त्यांच्याच काळाची कठोर समीक्षाही केलेली आहे पुस्तकात.

लेख वाचला. लेखाबद्दल काय म्हणावे, ते नक्की लक्षात येत नाही. खूपच ओपिनियनेटेड व्यक्तीबद्दल खूपच ओपियनेटेड व्यक्तीने लिहिलेला आहे. पण हर्डीकरांचा जिव्हाळा चांगला दिसून येतो. आमच्याही घरी मटा यायचा, पण माझ्या लहानपणातच त्याचे ते सगळे रूप निघून गेले. त्यामुळे ह्या सर्व भूतकाळाविषयी मला अशा लेखांतूनच कळते. इथे दिल्याबद्दल धन्यवाद!

अंतर्नाद दिवाळी अंकातला हा लेख मला फारसा आवडला नव्हता. असे वाटले की उगाचच मते-मतांतरे आहेत. फारसे काही ठोस काहीच नाही.

उगाचच मत मतांतरे आहेत>>
हो. एवढेच नव्हे, हाय लेवलचे पण शेवटी गॉसिपच जास्त आहे.
मलाही लेख आवडला नाही.

अंतर्नादमध्ये वाचला होता. आधीच एवढा लांबलचक लेख आणि त्याचं प्रयोजनच कळलं नव्हतं. आता ते गेल्यावर तो लेख वाचताना कदाचित वेगळं वाटेल.
म टा कधीच वाचला नाही. (पिढीजाद लोकसत्ता) त्यामुळे तळवलकरांबद्दल ते भरपूर वाचणारे एक संपादक आहेत यापलीकडे काही माहीत नव्हतं. गेल्या एक दोन वर्षांतले त्यांचे लिखाण वाचून मात्र त्यांना आधीपासून वाचायला हवं होतं असं वाटलं.

उत्तम लेख. आवडला. सर्व संदर्भ नीट व्यवस्थित आणि विस्तृत नोंदवल्यामुळे नीट कळला. त्या वेळची सामाजिक -राजकीय परिस्थिती वगैरे व्यवस्थित नोंदवली आहे. उगाच वाचकाला माहित असेल म्हणून सोडून दिली नाही.
किती व्यक्तिंचे स्मरण या एका लेखात आले आहे आणि खरोखर टिळक, आगरकर, रानड्यांबाबत सुद्धा आपल्याला किती जूजबी माहिती असते केवळ असे वाटून गेले.
भाषेलाही दाद ! 'साकल्याचे प्रदेश' , 'स्मृतीलेख' , 'शैलीविलास' वगैरे वाचून सणसणीत दाद दिली.
आणि हो
आपसांत आलेला दुरावा, ताणले गेलेले परस्पगेलेले, वैचारिक मतभेद वगैरे भलावण न करताही व्यवस्थित नोंदवले आहेत. ते आवडले.

चिन्मय- हा लेख इथे दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

तळवलकर यांच्यापेक्षा हर्डीकर यांनी स्वतःबद्दल च जास्त लिहिले आहे आहे वाटले. त्यांची काय मैत्री होती त्या पेक्षा दुरावा, अबोलाच जास्त ठसलाय.
इतका फाफट पसारा घालून शेवटी काय तर

मजा आली आणि वाईटही वाटले, ते अशाकरीता की राजकारण्यांवर असा आणि इतका प्रभाव टाकण्याची क्षमता आणि 'ओपिनिअन मेकर' हे बिरुद मिळालेले असतानाही महाराष्ट्राच्या राजकिय आणि सामाजिक अधोगतीला थांबवणे यांना शक्य झाले नाही. देऊळ चित्रपटातील प्रभावळकरांच्या व्यक्तिरेखेसारखे काहीतरी.

आगावा, ते माणूस होते. सुपरमॅन नव्हेत. त्यांना कितीही ओपिनियन मेकर असले तरी या अधोगतीला थांबवणं शक्य झालं नस्तं. तो त्यांचा स्वभावही नव्हता. पत्रकार जागल्या असतो, त्याला एका मर्यादेनंतर तटस्थच राहावे लागते....

मी लहानपणापासून मटा वाचत आले. केवळ आईबाबा वाचतात म्हणून अग्रलेख आणि त्याच्या आसपासचे लेख वाचायला लागले. ते कळायची अक्कल अर्थातच बरीच वर्षे नव्हतीच. पण थोडीफार जाण आल्यावर इतर मराठी अग्रलेख बरेचसे वरवरचे वाटू लागले. तळवलकरांसारखी खोली इतर कुठेच आढळली नाही. अधूनमधून त्यांची पुस्तकेही घरी आवर्जून येत असत. त्यातीलही काहीकाही वाचली आहेत. तळवलकरांच्या लेखनामुळे त्यांनी उद्धृत केलेली काही पुस्तके, काही लेखक वाचले गेले. मराठी वाचनवैचारिकविश्वातून किंवा त्यातल्याही एका मध्यमवर्गीय कोशातून बाहेरच्या जगाची वाट दाखवण्यात पुल आणि तळवलकर यांचा फार मोठा वाटा आहे....
आता वळून बघताना असं वाटतं की माझाही 'लेफ्टिस्ट-सेन्ट्रिस्ट-लिबरल' असा म्हणता येईल असा वैचारिक दृष्टीकोन तयार झाला त्यात इतर काही घटकांबरोबर मटा हाही घटक असणार/आहे.

हर्डीकरांचा लेख संमिश्र आवडला. त्यांचा शरद जोशींवरचा लेख जास्त भावला होता.

अप्रतिम लेख...

1989 मधे इथे अमराठी क्षेत्रातील लायब्ररीतील टेबलावर मला एक मथळा दिसला-‘अभी तो मैं जवान हूं...’

अख्खं पान भरुन लेख होता...बघितलं तर तो मटा हाेता...तो पूर्ण लेख वाचायला मला तीन दिवस लागले...(कारण अमराठी क्षेत्रात राहणारा असल्यामुळे मराठी वाचनात गती नव्हती...)

तर या तीन दिवसांत एके शनिवारच्या मनाेरंजन पुरवणीत अशोक कुमारच्या ‘बेवफा’ चित्रपटावरील प्रकाश जोशींचा लेख बघितला, तो देखील वाचून काढला. तो ‘यादें’ स्तंभ पाक्षिक होता...मी लाइब्रेिरयन कडून मटा चे जुने शनिवार चे अंक मिळविले...त्यांत अंदाज होता...

मग मी विचारपूस करुन मटा विकत घेऊ लागलो...सुरवातीला यादें साठीच घेत होतो...

पण पंधरा दिवसांत मला मटा चं वेगळेपण ठळकपणे जाणवलं...त्यातील अग्रलेख, पुरवणी मधील लेख, खूपच माहिती देणारे होते...

शिवाय हॉलीवूड, अंतरराष्ट्रीय घडामोडींवर तज्ञांचे विश्लेषणात्मक लेख असायचे...

मी मटा च्या प्रेमात पडलो...

रोज सकाळी मटाची वाट बघायचो...

89 ते 93 पर्यंत मी मटाचा नियमित वाचक होतो...

या दरम्यान मटामधे कधीच गोविंदरावांचा फोटो बघितल्याचं आठवत नाही... (‘ग्रंथांच्या सहवासात’ मधे त्यांनी जो लेख लिहिला होता त्यात त्यांचा फोटो होता असं आठवतं...पण तो लेख माझ्याकडून हरवला...)

झकास!
इतके दिवस इमेज फॉर्ममधला लेख वाचायचा जरा कंटाळा करत होते. पण वाचला फायनली. मजा आली.

(मजकुरात कॉपीरायटिंगच्या किती पोतंभर चुका आहेत. Uhoh )