गाता रहे मेरा फिल्मी दिल

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

गाता रहे मेरा फिल्मी दिल

दहावी पास होई पर्यन्त माझी चित्रपटीय ( भक्त म्हणून ) वाटचाल अगदीच अगाध होती. "तू एकदा दहावी पास हो मग तूला घरी केबल लावून देइन" हे आईने दिलेले आश्वासन मला दहावीची परिक्षा पास होण्यास पूरेसे होते. तो पर्य.न्त गाण्याच्या भेण्ड्यातील माझे योगदान हे " शेवटचे अक्षर "ळ" आल्यास " ल" घेता येइल का? किन्वा " आता म्हटलेले गाणे मागे म्हटले गेले होते काय यावर चर्चा करणे येथ पर्‍यन्त सिमीत होते. शाळेतली मुले गाण्याच्या अन्तरा बरोबर पूर्ण दोन-तीन कडवी म्हणताना पाहून मला अचम्बीत व्ह्यायला होई.

माझे चित्रपटातले करीयर हे खरे पहाता दहावी नन्तर सुरू झाले असे म्हणायला हरकत नाही. आणि मग पुढे जाउन चित्रपट हे माझ्या आयुष्याचा भाग होउन कधी बसले ते कळलेच नाही. ते तसेही अनेक जणान्च्या आयुष्याचा आणि चरितार्थाचा भाग आहेच.

चित्रपट आणि खाद्य जत्रा :
रस्त्यावरून चालताना मला कधी कधी शेन्गदाणे खायची हुक्की येते. शेन्गदाणे खात खात गाणे म्हणत रस्त्याने पुढे चालणार्‍या रणवीर राज कपूर सारखा मी कधी कधी चालत रहातो. कधी कधी गुरुदत्त पडूकोण सारखा एकदम दोन तीन दाणे तोन्डात उडवतो. कधी कधी आपल्या मराठमोळ्या राजाभाऊ परान्जपे सारखा रस्त्याने जाताना दाणे खात रहातो. रस्त्यात जर कधी दाणे पडले तर मागे कुणी मास्टर सचिन ते दाणे वेचत नाहीयेना हे आवर्जून पहातो (क्रुपया पहा : हा माझा मार्ग एकला)

कधी कधी मला पाणीपुरी खाण्याची इच्छा होते. पण पाणी पुरी खायच्या आधी खिशात पुरेशे पैसे आहेत ना हे मी तपासून पहातो. किम्बहुना आगाऊ पैसे देऊन टोकन घेतो. कारण माझ्या डोळ्या समोर 'अमर प्रेम' चित्रपटातील भरमसाट पाणी पुर्‍या हादडून झाल्यावर खिशात पैसे नसणारा ओम प्रकाश उभा असतो. त्याच्या सारखी अवस्था होऊन पुढे अडचण होऊ नये ही माफक अपेक्षा. पुढल्यास ठेच मागचा शहाणा नाही का

हॉटेलात हादडताना मी कधीही कुणाच्या टेबलावर आगन्तुक पणे बघत नाही. न जाणो कुणी एखादा चन्की पान्डे हा मामा बनवून " मुर्गीवालो अपनी मुर्गी सम्भालो" असे म्हणत आपले बील माझ्या माथ्यावर लादून निघून जायचा (चित्रपट माहीती असेलच नसला तर सान्गतो "तेजाब" )

चित्रपटातली गाणी आणि कुछ भुली बिसरी बिखरी यादे
' चित्रपटातील गाणी' हे हरवलेली नाती शोधण्याचे आणि दुखावलेली नाती जोडण्याचे एक 'टूल' आहे. सिनेमापटातली आई वडील मुलाना हे शुभम करोती, परवचा, सन्ध्या शिकवायच्या ऐवजी 'कोड' म्हणून काही ठरावीक गाणी शिकवून ठेवतात. पुढे बालक -पालक, भाऊ-भाऊ ,भाऊ-बहीण , बहीण-भाऊ, मित्र-मित्र, काका-पुतण्या, मावशी-भाचा अशी ताटातूट झाल्यावर ही गाणी खुप खुप उपयोगी पडतात. बिछडलेले नायक नायीका हे त्या त्या नात्यानूसार " वाय फाय डीव्हाईस" घेऊन फिरल्या सारखे लहान पणी पाठ केलेली गाणे म्हणत फिरतात. पुढे सोयीस्कर पणे एखादे कडवे विसरतात किन्वा चुकीचे म्हणतात जेणे करून दुसरा ते पूर्ण करतो आणै हरवलेले मित्र, भाऊ, माय लेक इत्यादी इत्यादी एकमेकाना शोधतात आणि स्वतः धन्य होऊन आम्हा प्रेक्षकाना उपक्रुत करतात. एखाद्या चित्रपटात जर सुरुवातीला जर असे "फेमेली गाणे" असेल तर त्या चित्रपटात आधी ताटातूट आणि मग पूनरभेट होणार हे खुशाल समजावे.

दूरावलेले जीव जोडण्यासाठीही ही गाणी खुप महत्वाची असतात. आई बापाची ताटातूट झाल्यावर आगऊ पोट्टा हे असेच कुठलेतरी गाणे म्हणून आई बापाचा ब्लॉक झालेला पासवर्ड अनेक वर्षानी रीसेट करून देतो. म्नग त्यातून कुणी एक शशी कपूर हा शत्रुघ्न सिन्हाचा डोळा चुकवून शर्मिला टागोर ला सापडून जातो (गाणे " तेरा मुझसे है पहले का नाता कोई" चित्रपट "आ गले लग जा " आणि पोट्ट्याने विसरलेले कडवे " राते गयी बाते गयी" )

चित्रपटातली गाणी आणि काही हुकलेली मेडल्स आणि हत्या

भारताला उत्तम उत्तम शटलर्स मिळायच्या खुप खुप आधी (अपवाद प्रकाश पडुकोण आणिक सय्यद मोदी) भारताला रवी कपूर उर्फ जीतेन्द्र आणिक लीना चन्दावरकर उर्फ सौ किशोर कुमार अशी मिश्र जोडी उपलब्ध् होती. ही जोडी गाण्यावर शटल तटवण्यास वाकब्गर होती. अगदी सन्ध्याकाळच्या निरोपाची गाणी म्हणत म्हणत शटल तटावत बेक हेन्ड फोर्हेन्ड चालवत बरोबरीने तोन्डही चालवत नाईट बेडमीन्टन खेळताना दिसत. ही मन्डळी जर चिनी, मलेशीयन, युरोपीयन, इन्डोनेशीयन खेळाडूना तोन्ड देत तर नक्कीच पुरुष एकेरी, महिला एकेरी आणि मिश्र दुहेरी ह्या गटातील सुवर्ण पदके भारताला प्राप्त होत. "ढल गया दिन हो गयी शाम जाने दो जाना है" हे गाणे म्हणत समेवर येऊन टूक्क करून शटल तटवण्याचे त्यान्चे कसब हे अगदी अव्वल दर्जाचे होते" (चित्रपट हमजोली)

चित्रपट काराना कुठल्याही शर्यती आधील कष्ट, मेहेनत हे गाण्यातून दाखवणे सोपे जाते. नया दौर चित्र्पटातील " साथी हात बढाना साथी रे" असो किन्वा जो जिता वही सिकन्दर मधले " यहाके हम सिकन्दर" गाणे असो मेहेनत तयारी दाखवण्यासाठी गाण्या इतके दुसरे उत्तम माध्यम नाही. गाण्यातूनच एखादे टोळी युद्ध भडकते. गाणे सम्पेपर्यन्त बिचारे टोळीवाले हे आप आपली शस्त्रे पारजावून गाणे सम्पायची वाट बघत बसून रहातात. जणू काही चित्र्पटातील नायक, खलनायक, विरोधी टोळ्या ह्याना गाणे वाजेस्तोवर "ईम्म्युनीटी" प्राप्त असते. (चित्रपट आणि गाणी अनेक आहेत सान्गण्याची खोटी)

असो जाता जाता सान्गतो . दहावीची परीक्षा पास झाल्यावर मी पुढे चुकून माकून होईना पण बर्‍याच पदव्या मिळवल्या. पण माझा चित्रपटीय अभ्यासक्रम हा आजतागायत चालू आहे. माझे ह्या बाबतीतले हे शिक्षण हे अजूनही सम्पलेले नाही आणि कधी सम्पणार नाही. एका अभ्यासू, चिकीत्सक विद्यार्थ्याचे अगदी हेच लक्षण आहे. नाही का ?

शिक्षण भी बाकी है मेरे दोस्त शिक्षण अभी बाकी है.

विषय: 
प्रकार: 

छान. अजुन गाणी हवीत.

>>>> "ढल गया दिन हो गयी शाम जाने दो जाना है" हे गाणे म्हणत समेवर येऊन टूक्क करून शटल तटवण्याचे त्यान्चे कसब हे अगदी अव्वल दर्जाचे होते"
>>>गाण्यातूनच एखादे टोळी युद्ध भडकते. गाणे सम्पेपर्यन्त बिचारे टोळीवाले हे आप आपली शस्त्रे पारजावून गाणे सम्पायची वाट बघत बसून रहातात. जणू काही चित्र्पटातील नायक, खलनायक, विरोधी टोळ्या ह्याना गाणे वाजेस्तोवर "ईम्म्युनीटी" प्राप्त असते.

मस्तं.