आहात का तुम्ही रेंजमध्ये जेव्हा तुम्हाला रेंज नसते...

Submitted by अक्षय. on 13 February, 2017 - 14:26

आहात का तुम्ही रेंजमध्ये जेव्हा तुम्हाला रेंज नसते...

आहात का तुम्ही रेंजमध्ये जेव्हा तुम्हाला रेंज नसते...हल्ली स्मार्टफोन्स मुळे आपलं आयुष्य स्मार्ट झालय. अनेक सोशल नेटवर्किंग साइटस आलेत आपल्या रोजच्या आयुष्यात खळबळ माजवायला. घरातून निघाल्यापासून आपण अपडेट होतोय. आगदी traffic मध्ये अडकलो की 'Sick in traffic' किंवा 'Filling hungry with....''कुठे आहेस' पासून 'कुठे पर्यंत पोचलास' 'तिकिट कांउटर जवळ ये' 'गेटवर थांब ' समोरची व्यक्ती पुढे येऊन थांबे पर्यंत आपलं चालू आसतं. काही वेळा समोरचा offline आसतो मग यात काय होतं की, आपण आपल्या माणसाच्या सवयी, वेळा सगळ्या लक्षात ठेवतो, मग वाट पाहतो आणि अस्वस्थ होतो.आपण कधीतरी टुरवर वगैरे जातो आचानक येताना मोबाइलच चार्जिंग संपल की स्टेशन/विमानतळ/बस स्टँड वरुन बाहेर येताना मनामध्ये एक हुरहूर कोठेतरी लागून राहिली तो किंवा ती दिसेल अशी अपेक्षा करत बाहेर येणं, किंवा बाहेर उभा असणाऱ्या कोणत्या डोअर मधून बाहेर पडेल आणि केव्हा या काळजीत किती घट्ट प्रेम असतं त्या भेटण्यात...केवळ चुकामूक होऊ नये म्हणून एकाच जागी न हालचाल करता उभा राहणं आणि सावलीत उभा राहून 'पोचलास की फोन कर रे' यात किती फरक आहे.

मध्यंतरी माझा फोन खराब झालेला पण आमचं भेटण ठरलेल आधीच वेळ ठरलेली त्यामुळे तिनेही फोन केला नाही. अंधेरी स्टेशनला भेटू एवढेच काय ते आमचा संवाद. बर स्टेशनला कुठे म्हणजे तिकिट घराच्या इथे किंवा स्टेशन च्या बाहेर जंबोकिंगच्या इथे अस काहीच नाही. तरीही आम्ही भेटलो ठरलेल्या वेळी मी प्लाटफॉर्म चढून वरती आलो आणि मॕडम समोर उभ्या. किती मजा असते ना ह्यात आमच्यापैकी कोणाला रस्ता माहिती नाही अस न्हवतं की कोणतं महत्त्वाचे कामही न्हवत थांबलच पाहिजे अशी काहीही लिंक नसताना भेटण्याचा आनंद निराळाच. आमची चुकामूक होण्यासाठी खूप कारणं होती मी वेगळ्याच प्लाटफाॕर्म वरुन बाहेर पडलो किंवा ती वेगळीकडे उभी होती इ. पण भेटलो भारी वाटलं.

मला एखाद्या दिवशी वाटयचं की तिने पर्टिक्यूलर हाच ड्रेस घालून कॉलेजला यावं आणि तिने तोच ड्रेस घालून याव. किंवा मला आवडत म्हणून तिने dairy Milk आणावी आणि तीला आवडते म्हणून मी Kitkat म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी chocolate तिने आणलं तर Eclairs आणि मी आणलं तर Melody. आवडीनिवडी वेगळ्या असूनही न विसरता ही पाळल्या जायच्या. एखाद्या दिवशी फिरायला किंवा मुव्ही ला जावं आसं वाटत असताना तीने विचारणं 'मुव्ही??' 'देन लाँग ड्रायव्ह??' 'चालेल का??' 'थोडक्यात काय तर तु मला आणि मी तुला ओळखावं' घडत का आस काही तुमच्यासोबत ??

जसं स्मार्टफोन च्या दुनियेत आपण पटकन कोणालाही भेटतो पण न ठरवाता जमेल का आस ?? भेटतील का तो किंवा ती कॉलेजच्या गेटवर आपण जाऊ त्याच वेळी कँटिन मध्ये, स्टाॕपवर, स्टेशनवर ?? होईल का अस काही न सांगता तिने किंवा त्याने खूप दिवसापासून मागितलेले गिफ्ट घेऊन जाण. आहात का तुम्ही कनेक्टेड ?? आहात का तुम्ही रेंज मध्ये जेव्हा तुम्हाला रेंज नसते ??

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
जरा परिच्छेद वेगळे करुन लिहिले तर वाचायला सोपे जाईल.

धन्यवाद जिज्ञासा
जरा परिच्छेद वेगळे करुन लिहिले तर वाचायला सोपे जाईल. >>>> हो नक्कीच करीन प्रतिक्रिया आणि सूचनांसाठी धन्यवाद मानव पृथ्वीकर

छान लिहिलय...
फक्त मानवकाकान्नी सान्गितलेली सुचना लक्शात ठेवा...

Ssshhekhar, mr.pandit, मंजूताई, मीनल कुलकर्णी प्रतिक्रियासाठी मनापासून आभार.

छान !