Submitted by द्वैत on 6 March, 2017 - 23:27
मी तुला सांगू कसे
मी तुला सांगू कसे मी कोणत्या विश्वात आहे
चाळूनी प्रारब्ध बघतो मी हि त्या शोधात आहे
दीन ह्या प्रश्नांची मिळतील जी हवी ती उत्तरे
पण मर्म भेदायाची ऐपत कोणत्या प्रश्नात आहे
ग्रहदशा नक्षत्र सारे जाणतो जो सर्वज्ञानी
कुंडली वाचून अडतो तो कुठे निष्णात आहे
पोट भरूनी ह्या जगाचे पोट माझे का रिकामी
उकल ह्या कोड्याची हल्ली शोधतो फासात आहे
जन्म हि जणू वेदना अन मृत्यू देखील वेदना
वेदनांचे भास सारे सार ह्या भासात आहे
- द्वैत
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही कविताच आहे, गझल ह्या सदरात
ही कविताच आहे, गझल ह्या सदरात चुकून पोस्ट झाली
नेहमीप्रमाणेच छान!
नेहमीप्रमाणेच छान!
धन्यवाद
धन्यवाद
मस्त !!
मस्त !!
कविता म्हणा वा गझल.....खूप
कविता म्हणा वा गझल.....खूप छान !!
धन्यवाद शार्दूल, धन्यवाद मीनल
धन्यवाद शार्दूल, धन्यवाद मीनल जी