चेहऱ्यावर चेहरा लावीत नाही...

Submitted by सत्यजित... on 5 March, 2017 - 14:59

चेहऱ्यावर चेहरा लावीत नाही...
मी मुळी त्या आरश्याला भीत नाही!

तू जरा हसताच माझा कत्ल व्हावा?
एवढीही स्वस्त माझी प्रीत नाही!

मी सुऱ्यांचे वार तर झेलीन अवघे...
पण फुलांचे पारडे तोलीत नाही!

आसवांचाही जणू दुष्काळ आहे...
मी सुगंधी पावसाचे गीत नाही!

मी जसा अाहे तसा सामोर आहे...
ही खरेतर या जगाची रीत नाही!
__________________________

ती पिलांना आस तर दावीत आहे...
एकही दाणा तिच्या चोचीत नाही!

—सत्यजित कऱ्हाळे

Group content visibility: 
Use group defaults

सत्यजित , तुमची ही गझलही आवडली. वेधक द्विपदी आहेत सा-या..
कत्ल आणि सामोर ही तडजोड बहुधा वृत्तासाठी असावी.

मस्त

अनेक धन्यवाद सपनाजी!
>>>कत्ल आणि सामोर ही तडजोड बहुधा वृत्तासाठी असावी>>>पहिल्या बाबतीत सहज पर्याय उपलब्ध असूनही तोच शब्द(impact साधावा म्हणून की काय) चपखल वाटला! दुसऱ्या बाबतीत ‘सामोरा जाणे' अश्या अर्थाने तो शब्द योजिला होता.(अजून विचार करतो त्यावर!)पुनश्च धन्यवाद!

प्रसन्नजी,मीनलजी आपलेही खूप धन्यवाद!